कोपरगाव शहर वृत्त
…या शहरात संत रविदास जयंती उत्साहात संपन्न
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
रा। ष्ट्रीय चर्मकार महासंघ संचालित शहर व तालुका चर्मकार संघ यांचे संयुक्त विद्यमाने कोपरगाव येथे श्री संत शिरोमणी गुरू रविदास महाराज यांची ६४७ वी जयंती मोठया उत्साहात संपन्न झाली आहे.
संत रविदास इ.स.१५ ते १६ व्या शतका दरम्यान भक्ती चळवळीचे भारतीय रहस्यंवादी कवी होते.रविदासांच्या भक्तिगीतांचा भक्ति चळवळीवर पंजाब,उत्तर प्रदेश,राजस्थान,महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या प्रदेशात गुरू (शिक्षक) म्हणून कायमचा प्रभाव पडला आहे.ते कवी-संत,समाजसुधारक आणि आध्यात्मिक व्यक्तिमत्त्व होते.त्यांची जयंती कोपरगाव सह राज्यात मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे.कोपरगावात ती राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने संपन्न झाली आहे.
सदर प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ श्री संत शिरोमणी गुरू रविदास महाराज यांची भव्य अशी प्रतिमा उभारून प्रतिमा पूजन व पालखी पूजन सौ.श्री.किसनराव कानडे यांचे हस्ते करण्यात आले.शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करुन पुष्पहार घालून पालखी मिरवणुक काढण्यात आली होती.या मिरणुकीत चर्मकार महिलांचे ढोल पथक आणि कु.अक्षरा गणेश कानडे या चिमुकलीने सादर केलेले लाठीकाठी प्रात्यक्षिक हे प्रमुख आकर्षण ठरले होते.
सदर मिरवणूक डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा,बसस्थानक लोकशाहीर अण्णाभाऊ साठेपुतळा चौक गोदावरी पेट्रोल पंप,मार्केट यार्ड,जुना टाकळी नाका,समाजमंदिर या मार्गाने संपन्न झाली.त्यानंतर समाज मंदिर येथे ह.भ.प. मनसुख महाराज दहे यांनी श्री संत रविदास महाराज यांच्या कार्याचे महत्व प्रवचनाद्वारे विषद केले.
सदर प्रसंगी खा.सदाशिव लोखंडे,आ.आशुतोष काळे, संजीवनी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे,माजी आ.भाऊसाहेब कांबळे,शिर्डीचे माजी खा.वाकचौरे यांच्या धर्मपत्नी सरस्वती वाकचौरे,राष्ट्रीय चर्मकार महासंघ उपाध्यक्ष एम.डी.कानडे,उत्तर महाराष्ट्र महीला आघाडी अध्यक्षा मनिषा पोटे,माजी तहसीलदार डी.आर. दुशिंग,भाऊसाहेब कानडे,कोकमठाण सरपंच उषाताई दुशींग,रवंदा सरपंच शोभा भवर,रवंदा उपसरपंच ऋषिकेश कदम,वसंत थोरात, शिवसेना तालुका अध्यक्ष रावसाहेब थोरात,अँड नितीन पोळ,शरद त्रिभुवन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कृष्णा आढाव, चंद्रशेखर म्हस्के,आकाश डागा,फकीर कुरेशी,राजेंद्र वाकचौरे,विरेन बोरावके,अनिरुद्ध काळे,संतोष बनसोडे,रुपाली बनसोडे,राजेंद्र वाघ,रामदास वाघ,राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दिलीप कानडे,आदर्श ग्रामसेवक पुरस्काराने सन्मानित संजय दुशिंग आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.या वेळी मान्यवरांचा समाज भूषण म्हणून गौरव करण्यात आला आहे.
सदर कार्यक्रमाचे प्रास्तविक चर्मकार महासंघाचे जिल्हाध्यक्ष अशोक कानडे यांनी तर सूत्रसंचालन संजय दुशिंग यांनी केले.तर आभार तालुका अध्यक्ष माधवराव पोटे व शहर अध्यक्ष गणेश ज्ञानेश्वर कानडे यांनी मानले आहे.