कोपरगाव शहर वृत्त
माजी मंत्री आव्हाडांसारख्या दानवाला प्रभू रामचंद्रासमोर नमावे लागले-…या आमदारांची टिका
न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली अयोध्येत उभ्या राहिलेल्या राम मंदिर प्राण प्रतिष्ठा कार्यक्रमास अकोलेसह सर्वत्र सर्व धर्मियांनी मानवंदना दिली असून माजी मंत्री जितेंद्र आव्हाडांसारख्या दानवाला सुद्धा प्रभू रामचंद्रासमोर नमावे लागले असल्याची टीका अकोलेचे आ.डॉ.किरण लहामटे यांनी नुकतीच कोपरगाव येथील एका कार्यक्रमात बोलताना केली आहे.
कोपरगावसह राज्यातील अजित राष्ट्रवादी संघटक बळकट करण्यासाठी आज कृष्णाई मंगल कार्यालयात युवक राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत युवक राष्ट्रवादीचा मेळावा आयोजत केला होता त्यावेळी ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ.आशुतोष काळे हे होते.
सदर प्रसंगी युवकांचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार,कर्मवीर काळे सहकारी कारखान्याचे उपाध्यक्ष डॉ.मच्छीन्द्र बर्डे,गौतम बँकेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब कोते,किशोर बकाल,शिर्डीचे निलेश कोते,संदीप सोनवणे,कोपरगाव तालुकाध्यक्ष माधवराव खिलारी,शहराध्यक्ष सुनील गंगुले,उपाध्यक्ष अशोक आव्हाटे,युवकांचे तालुकाध्यक्ष चारुदत्त सिनगर,मधुकर टेके,माजी गटनेते विरेंन बोरावके,माजी नगरसेवक मंदार पहाडे,नवाज कुरेशी,विठ्ठल आसने,चंद्रशेखर मस्के,आकाश डागा,बबन वाळूज,आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
त्यावेळी ते उपमुख्यमंत्री अजित दादांचा पहाटेच्या शपथविधी बाबत बोलताना ते म्हणाले की,”त्यांचा शपथ विधी घडून आणण्यामागे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार होते हे समजायला आम्हाला तीन वर्षे लागले.(हशा) आम्ही राष्ट्रवादीत गेलो पण शरद पवार गटाने आम्हाला साधे विचारले नाही.तीच बाब खा.सुप्रिया सुळे बाबतही घडली असल्याचा गौप्यस्फोट करून त्यांनी त्याबाबत त्यांनी खेद व्यक्त केला.व आपला राजकीय जीवन पट उपस्थितांसमोर उलगडून दाखवला.आपण सुरुवातीस काँग्रेसमध्ये गेलो,मग राष्ट्रवादिचे काम केले आहे.२००६ ला राज साहेबांनी मनसे काढली आपण मनसेत गेलो.जिल्हा परिषद लढलो पण थोड्या मतांनी पडलो.त्यावेळी माझे नळ कनेक्शन तोडायला माजी आ.वैभव पिचड यांनी माणूस पाठवला होता.मात्र त्याला समज दिल्यावर तो परत गेला होता.आर्थिक स्थिती बाबत बोलताना ते म्हणाले की,”एका पेपरचे नाव घेऊन म्हणाले की,” त्या पेपरला मतदारानीं केलेल्या भरघोस मताबाबत आभार मानण्याची पट्टी प्रसिद्धीस द्यायला सांगितले तर त्यांनी (आपली पत नसल्याचे अप्रत्यक्ष निदर्शनास आणून) आधी १५ हजार मागितले पण ते सुद्धा आपल्याकडे नव्हते.कधी कधी वाटायचे उगीच कशाला लढायचे व या भानगडीत पडायचे.काही लोक म्हणायचे हा रिकामटेकडा धंदा करू नका.तेही पटायचे.माझ्या बरोबर चालक नसायचा,आला तर त्याच्यावर अकोलेचे सत्ताधारी ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करायचे त्यामुळे तर शेवटी एकट्यालाच फिरायला लागायचे.त्यामुळे त्या कठीण काळी आपल्याला फारच कसरत करावी लागली असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
त्या दिवसाबद्दल पुढे बोलताना ते म्हणाले की,”एक दिवस विखेंकडे गेलो ते म्हणाले,”पिचड भाजपमध्ये येणार “मग,” मी म्हणालो मी विजयी होणार.एकदा तर एक सामान्य माणसाने हि खंत व्यक्त केल्यावर त्याने मग तुम्ही राष्ट्रवादीत जा असा मोलाचा सल्ला दिला आणि तो आपण शिरसावंद्य मानला आणि खरेच यशस्वी झालो.उद्धव ठाकरेंनी सांगितले,” ती’ (अकोलेची) जागा भाजपला जाणार ; “तेंव्हा आम्ही शिवसेनेकडून तुम्हाला उमेदवारी देऊ शकत नाही”अशी असमर्थता दर्शवली होती.व “तुम्हाला जिकडे जायचे तिकडे जा” असा सल्ला दिला असल्याची आठवण करून दिली आहे.दरम्यान आपल्याला ती उमेदवारी अखेर राष्ट्रवादीकडून मिळाली होती.त्यावेळी किती खर्च करणार मित्राने सांगितले तीन कोटी बिनधास्त सांगा आहे.माझ्याकडे काहीच नव्हते.पण तो सल्ला लाखमोलाचा ठरला होता.पण धाडस केल्याने व जनतेने विश्वास दाखवल्याने आपण सन-२०१९च्या विधानसभा निवडणुकीत तब्बल ५८ हजारांच्या मताधिक्याने निवडून आलो.दरम्यान त्या काळी जनतेचा प्रतिसाद मिळत गेल्याने आपण जो जेथे दिसेल तेथे कोणालाही हात वर करायचो; फक्त पिलर दिसला तर हातास खाली करायचा आदेश द्यायचो (हशा).आपल्या मतदार संघात विविध रस्ते आणि योजना यासाठी अक्षरशः निधीचा पाऊस पडला.तो केवळ उपमुख्यमंत्री अजित पवारांमुळे अशी प्रांजळ कबुली त्यांनी दिली आहे.निळवंडे धरणाच्या वरील बाजूस एक मोठ्या रकमेचा पूल बांधला आहे.अकोले तालुक्यातील ८०-९० टक्के रस्ते अजित पवारांमुळे झाले.४०-५० टक्के शाळा खोल्या आपल्या निधीतून.नाहीतर लोक मागतात,’ समाजमंदिर’,’मंदिरासमोर सभामंडप’,देव कधी अभ्यास करतो का ? शाळा खोल्या सोडून अन्य कारणासाठी निधी मागणे कार्यकर्त्यानी सोडले पाहिजे असा प्रांजळ सल्ला त्यांनी दिला आहे.आपल्याला कॉ.अजित नवले व अन्य सहकाऱ्यांनी मोठी मदत केली असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले आहे.अकोले तालुक्यातील बहुतांशी गावात आपण दारू,गुटखा बंदी केली आहे.आपले कार्यकर्ते बिगर व्यसनी आहेत.तालुक्यातील गावात ७-८ हजार जातीचे दाखले स्वतःच्या गाडीत घेऊन गावोगाव वाटले.गाव आपले वाटले पाहिजे.दहावे तेरावे जातीने केले आहे.त्यासाठी जनतेची सर्व कामे केली आहे.आपले समाज प्रबोधनाचे काम ह.भ.प.इंदोरीकर महाराज चांगले करतात असे गौरवोद्गार काढले.मला आता अनेक ठिकाणी बूथ लावायचे काम ठेवले नाही.मतदारसंघात आपण रस्ता काम तोंड पाहून केले नाही.माजी आ.पिचड यांच्या गावास जाणाऱ्या रस्त्यास निधी आणला तर बाकी विरोधी लोक त्या रस्त्याने जाणार नाही असे होत नाही.त्यामुळे विरोधकांचे काम सुद्धा जातीने करा असे आवाहन त्यांनी उपस्थित नेत्याना केले आहे.राज्यात गतीने काम करणारा नेता म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ओळख आहे राष्ट्रवादीच्या कोणाही नेत्याने द्वेषाचे राजकारण करू नये असे आवाहन आ.डॉ.लहामटे यांनी केले आहे.
त्यावेळी त्यांनी आ.आशुतोष काळे यांची एक आठवण सांगताना म्हटले आहे की,एकदा मला आ.काळेंचा फोन आला त्यावेळी त्यांनी तुमच्या कारखान्याचे काय चालू आहे.त्यावेळी आम्ही म्हणालो आमचा अगस्ती कारखाना सलायनवर आहे.तुमचे कारखाने बरे आहेत.
सदर प्रसंगी आ.आशुतोष काळे बोलताना म्हणाले की,”अजित दादांच्या विचारांच्या मागे राहिल्याने पिण्याचे पाणी,रस्ते आदीसाठी जवळपास तीन हजार कोटी रुपयांची कामासाठी निधी मिळाला आहे.त्यामुळे अजित पवार यांचे हात बळकट करायचे आहे.घटक पक्षांना मदत झाली पाहिजे असे काम करावे लागेल.युवकांना व्यासपीठ राष्ट्रवादीने दिले आहे.युवकांनी नोकरीबरोबर आणखी व्यवसाय उदीम करावे.संघटनेचे काम सातत्याने करावे असे आवाहन शेवटी केले आहे.
सदर प्रसंगी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण बोलताना म्हणाले की,”राष्ट्रवादीची वेगळी भूमिका घेतली त्यावर मुंबईत उहापोह झाला आहे.वेगळ्या भूमिकेमुळेच आज कोपरगाव शहराला निधी उपलब्ध झाला त्याच साठी आपण सत्तेत गेलो आहे.२०१९ला भाजप सेनेच्या विरुद्ध भूमिका घेतली होती तरी सेनेशी जुळवून घेतले आहे.कट्टर सेनेशी एकत्र आलो मग घटक पक्ष म्हणून गेलो आजही तीच भूमिका घेतली तरी टीका का केली जात आहे.आसामला आपण भाजपशी गरज नसताना व मागीलता नसताना पाठींबा दिला मात्र राज्यात टीका केली जाते ही विसंगती राष्ट्रवादीच्या जुन्या नेत्यांकडून का केली जाते असा सवाल विचारला आहे.मराठा आरक्षणाबाबत बोलताना ते म्हणाले की,” कोणाचे आरक्षण कमी न करता ते द्यावे हीच भूमिका आजही आहे.राजभवनात आम्ही असताना आ.काळे यांचे विमान उशिरा लँड झाल्याने अजित पवारांबरोबर आहे असा गौप्यस्फोट त्यांनी केला आहे.राष्ट्रवादीच्या मंत्र्यात सर्वसमावेशक मंत्री आहेत.सर्व जाती जमातीला स्थान दिले जाते तरी माजी मंत्री जितेंद्र आव्हाड व आ. रोहित पवार टीका करतात हे आक्रीत असल्याचे म्हटले आहे.टीका करताना आधी आपले तोंड आरशात पहा मग बोला.त्यामुळे त्यांच्या टिकेला काही किंमत उरत नसल्याचा दावा शेवटी केला आहे.
सदर प्रसंगी प्रास्तविक युवकांचे जिल्हाध्यक्ष कृष्णा आढाव यांनी केले आहे.तर उपस्थितांना मार्गदर्शन करताना अण्णासाहेब कोते यांनी वाकडीत ५.५० कोटी रुपयांचा निधी दिल्याचे त्यांनी सांगितले आहे.तर कैलास गोर्डे,सुनील गंगले,विठ्ठल दातीर यांनी केले आहे त्यावेळी शिर्डीचे निलेश कोते यांनी कोपरगावचा विकास केला आता शिर्डीत लक्ष घाला असे आवाहन आ.काळे यांना केले आहे.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ओ.बी.सी.सेलचे जिल्हाध्यक्ष रमेश गवळी यांनी केले आहे तर उपस्थितांचे आभार युवकचे शहराध्यक्ष नवाज कुरेशी यांनी मानले आहे.