जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव शहर वृत्त

…या शहरात संकल्प यात्रेचे जोरदार स्वागत

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

केंद्र व राज्य शासन आयोजित विकसित भारत संकल्प यात्रा रथाचे ठिक सकाळी १० वा.कोपरगाव शहर येथे आगमन झाले असून या यात्रेचे शहरात जोरदार स्वागत करण्यात आले आहे.

“शहरातील वंचित पात्र लाभार्थ्यांनी सहभाग नोंदवून सदर यात्रेत केंद्र-राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा”-शांताराम गोसावी,मुख्याधिकारी तथा प्रशासक,कोपरगाव नगरपरिषद.

भारत सरकारच्या फ्लॅगशीप योजनाचे लाभ लक्ष्यित लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहोचावे या दृष्टीने केंद्र शासनाने राज्य-केंद्र शासित प्रदेशांच्या सहकार्याने माहे एप्रिल,मे-२०१८ तसेच माहे जून,ऑगस्ट २०१८ या कालावधीत विविध अभियान राबविले आहे.अद्यापही ज्या योजनांचे लाभ लक्ष्यित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचलेले नाहीत.अशा लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने विकसित भारत संकल्प यात्रा या नावाची देशव्यापी मोहीम केंद्र शासनाकडून दिनांक १५ नोव्हेंबर २०२३ ते २६ जानेवारी २०२४ या कालावधीत आखण्यात आलेली आहे.त्यानुसार कोपरगाव नगरपरिषदेच्या हद्दीतील तहसील मैदान व तुळजाभवानी मंदिर परिसर येथे राबविण्यात आली आहे.

त्या रथ यात्रेचे शहरातील तुळजाभवानी मंदिर परिसर  येथे रथाचे आगमन झाल्यानंतर सर्वप्रथम कोपरगाव विधानसभा प्रथम महिला माजी आ.स्नेहलता कोल्हे यांच्या हस्ते फित कापून संकल्प यात्रेचे उद्घघाटन केले आहे.

सदर प्रसंगी बचत गटातील महिलांच्या मार्फत यात्रा रथाचे पूजन करण्यात आले.रथासोबत असलेल्या कर्मचारी यांचे कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक शांताराम गोसावी,उपमुख्याधिकारी मनोजकुमार पापडीवाल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आहे.  

याप्रसंगी कोपरगाव शहरातील अगस्ती नदी समन्वयक आदिनाथ ढाकणे ह्यांचा नगर परिषदेतर्फे सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला आहे.

  सदर प्रसंगी मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांनी,”शहरातील वंचित पात्र लाभार्थ्यांनी सहभाग नोंदवून सदर यात्रेत केंद्र-राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.

   यावेळी उपस्थित विविध योजनेतील लाभधारकांना लाभाचे वितरण करण्यात आले.त्यात पीएम- स्वनिधी, प्रधानमंत्री आवास योजना,आयुष्मान कार्ड योजना,उज्वला गॅस योजना,आधार अद्यावतीकरण तसेच दुरुस्ती आदी योजनांची माहिती देत पात्र लाभार्थी यांची नावे नोंद करण्यात आले.सदर प्रसंगी शहरातील नागरिकांनी  मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रतिसाद दिला असल्याचा दावा केला आहे.

   सदर प्रसंगी  नगरपरिषदेचे कार्यालय अधीक्षक ज्ञानेश्वर चाकणे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर आभार प्रदर्शन शहर अभियान व्यवस्थापक रामनाथ जाधव यांनी केले.कार्यक्रम यशस्वीततेसाठी कोपरगाव नगरपरिषदेचे उपमुख्याधिकारी मनोजकुमार पापडीवाल यांचेसह अधिकारी कर्मचारी यांनी परिश्रम घेतलेह होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close