जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव शहर वृत्त

पवित्र गोदावरी नदीस स्वच्छ ठेवा-…यांचे आवाहन 

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोणत्याही प्रकारचा कचरा,निर्माल्य,पूजेचे साहित्य तसेच देवी-देवतांचे फोटो नदीपात्रात टाकू नये व गोदामाईस स्वच्छ ठेवावे असे आवाहन  कोपरगाव नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांनी नुकतेच एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.     

“स्वच्छतेसाठी अनेक जनआंदोलने सुरू झाली.त्यापैकी सर्वात व्यापक आणि महत्त्वपूर्ण जनआंदोलन म्हणजे स्वच्छ भारत अभियान असून त्याचा पुढील टप्पा,”स्वच्छता हि सेवा हा आहे.आणि भारतातील सर्व शहरे,ग्रामीण भागातील रस्ते,रस्ते स्वच्छ करून सर्वांसाठी मूलभूत स्वच्छतेची सोय सुनिश्चित करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे”-शांताराम गोसावी,मुख्याधिकारी तथा प्रशासक,कोपरगाव नगरपरिषद.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून २ ऑक्टोबर हा दिवस “स्वच्छ भारत दिवस” म्हणून साजरा केला जातो.यावर्षी “स्वच्छ भारत दिवस २०२३” च्या निमित्ताने १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत “स्वच्छता ही सेवा” हा उपक्रम स्वच्छ भारत मिशन ग्रामीण व शहरी यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणार असून,दिनांक १ ऑक्टोबर २०२३ रोजी देशभरात प्रत्येक गावात,शहरात व्यापक स्वरूपात “एक तारीख- एक तास” स्वच्छतेसाठी श्रमदानातून स्वच्छता मोहीम राबविण्यात येत असून कोपरगाव शहरात आज सकाळी हा उपक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे त्यावेळी ते बोलत होते.

सदर प्रसंगी स्व.नामदेवराव परजणे विधी महाविद्यालयाचे अध्यक्ष हिरालाल महानुभव,गोदामाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष आदिनाथ ढाकणे,बाळासाहेब रुईकर,संतोष गंगवाल,तुषार विध्वंस तसेच नगरपरिषदेचे सर्व अधिकारी-कर्मचारीवृंद,स्व. नामदेवरावजी  परजणे पाटील लॉ कॉलेज व नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थी व शिक्षकवृंद,के.जे.एस.सोम्मैया महाविद्यालयाच्या एन.एस.एस.शाखेचे विद्यार्थी,शहरातील इतर मान्यवर आदी उपस्थित होते.    

त्यावेळी पुढे बोलताना म्हणाले की,”स्वच्छतेसाठी अनेक जनआंदोलने सुरू झाली.त्यापैकी सर्वात व्यापक आणि महत्त्वपूर्ण जनआंदोलन म्हणजे स्वच्छ भारत अभियान असून त्याचा पुढील टप्पा,”स्वच्छता हि सेवा हा आहे.आणि भारतातील सर्व शहरे,ग्रामीण भागातील रस्ते,रस्ते स्वच्छ करून सर्वांसाठी मूलभूत स्वच्छतेची सोय सुनिश्चित करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे.स्वच्छ भारत मिशनचे ध्येय अभियान राबवून भारत स्वच्छ करणे गरजेचे असल्याचे मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांनी शेवटी म्हटले आहे.

सदर स्वच्छता अभियान यशस्वी करण्यासाठी कोपरगाव नगरपरिषदेचे उपमुख्याधिकारी ज्ञानेश्वर चाकणे,स्वच्छता निरीक्षक सुनिल आरण,नोडल ऑफिसर तथा संगणक अभियंता भालचंद्र उंबरजे,शहर समन्वयक प्रविण मोरे,तसेच नगरपरिषदेच्या सर्व अधिकारी कर्मचारी यांनी परिश्रम घेतले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close