जाहिरात-9423439946
कला व सांस्कृतिक विभाग

डान्स कोपरगाव डान्स’मध्ये…या विद्यालयाचा द्वितीय क्रमांक!

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

     कोपरगाव येथील लायन्स क्लब आणि क्रेडाई कोपरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘एक्स्पो २०२६’ (वर्ष १३ वे) अंतर्गत ‘लिटिल चॅम्प’ या सांस्कृतिक कार्यक्रमात संत ज्ञानेश्वर इंग्लिश मिडीयम स्कूल कोपरगावच्या विद्यार्थ्यांनी आपल्या कलेचा आविष्कार सादर करत द्वितीय क्रमांकावर मोहोर उमटवली आहे.विजयी संघाचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

संत ज्ञानेश्वर इंग्लिश मिडीयम स्कूलचा विजयी संघ.

दरम्यान कार्यक्रमाची सुरुवातच संत ज्ञानेश्वर स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रभावी ‘गणेश वंदने’ने केली होती.विविध शाळांच्या चुरशीच्या स्पर्धेत संत ज्ञानेश्वर स्कूलच्या डान्स ग्रुपने द्वितीय क्रमांक पटकावला आहे.मान्यवरांच्या हस्ते शाळेला सन्मान चिन्ह आणि रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले आहे.

  कोपरगाव लायन्स क्लब,क्रेडाई आणि कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना यांच्या संयुक्त विद्यमाने १३ वा एक्स्पो २०२६ चे दि.१२ फेब्रुवारी ते १६ फेब्रुवारी रोजी महात्मा गांधी ट्रस्ट प्रदर्शन हॉल या ठिकाणी आयोजन करण्यात होते.त्यावेळी विविधी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.त्यात शालेय नृत्य स्पर्धांचे ‘डान्स कोपरगाव डान्स या मोठ्या उत्सवात संपन्न झाल्या आहेत.त्यात संत ज्ञानेश्वर इंग्लिश मिडीयम स्कूलने हा विजय मिळवला आहे.

   दरम्यान कार्यक्रमाची सुरुवातच संत ज्ञानेश्वर स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रभावी ‘गणेश वंदने’ने केली होती.विविध शाळांच्या चुरशीच्या स्पर्धेत संत ज्ञानेश्वर स्कूलच्या डान्स ग्रुपने द्वितीय क्रमांक पटकावला आहे.मान्यवरांच्या हस्ते शाळेला सन्मान चिन्ह आणि रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.हे यश स्वीकारताना शाळेचे मुख्याध्यापक सचिन मोरे,शिक्षिका वैष्णवी काळे,सई कापसे,रवी पवार व सर्व विजयी विद्यार्थी उपस्थित होते.

  दरम्यान विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल ‘संत ज्ञानेश्वर विद्या प्रसारक संस्थे’चे अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे व कार्यकारी विश्वस्त विशाल झावरे यांनी सर्व विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.या यशाबद्दल पालकांनी समाधान व्यक्त केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close