जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कला व सांस्कृतिक विभाग

…या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पटकावला प्रथम क्रमांक

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथे एस.एन.जे.बी.या महाविद्यालयात संपन्न झालेल्या जिल्हा युवा उत्सव-२०२३ या कार्यक्रमात कोपरगाव तालुक्यातील कोकामठाण येथील राष्ट्रसंत जनार्दन स्वामी फाऊंडेशन नर्सिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ‘साई श्रद्धा’ या संघामधून प्रथम क्रमांक पटकावला आहे.त्यांचा केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांच्या हस्ते केले सत्कार करण्यात आला आहे.

सदर कार्यक्रमात महाविद्यालयीन संघांनी सहभाग नोंदवला होता.राष्ट्रसंत जनार्दन स्वामी नर्सिंग कॉलेजच्या सेजल मौर्या,निहारिका विष्णूभक्त स्नेहल वाघमारे,श्वेता जाधव,आदित्य दिघे,अभिषेक बिडगर,अतुल भिसेन,श्रुती पाडवी,अमोशा कडू या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता.त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

नेहरू युवा केंद्र संघटना हे भारत सरकारच्या युवक व क्रीडा मंत्रालयाअंतर्गत असलेली स्वायत्त संस्था आहे.हिची स्थापना १९७२ साली झाली.या संस्थेचे मुख्यालय दिल्ली येथे आहे.ही संघटना युवकांमध्ये,विशेषतः ग्रामीण भागात राष्ट्रनिर्मिती व देशभक्तीच्या भावनेला जागृत करण्याचे कार्य करते.हिचे घोषवाक्य भविष्याचे सहप्रवासी असे केंद्राचे घोषवाक्य आहे.वर्षभरात २.२५ लाख कृती आयोजित करून संघटन एक कोटीहून जास्त युवकांपर्यंत पोहोचते. संघटनेने ८०,०००हून जास्त सक्रिय युवक मंडळांचे जाळे विणले असून देशाच्या सर्व जिल्ह्यांमध्ये लाखो कार्यकर्ते कार्यरत आहेत.प्रत्येक वर्षी १२००० कार्यकर्ते निवडून, प्रशिक्षण देऊन,रुजू करून घेतले जातात व देशाच्या प्रत्येक जिल्ह्यात २० ते ३० कार्यकर्ते विखरून ठेवले जातात.ग्रामीण युवकांना राष्ट्र उभारणीच्या प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी तसेच त्यांच्या व्यक्तिमत्व आणि कौशल्यांच्या विकासासाठी संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने करण्यात आली असून त्या निमित्ताने जिल्हा पातळीवर विविध स्पर्धा भरवून विद्यार्थ्यांना आपल्या कला गुणांना वाव निर्माण करून देण्यासाठी संधी दिली जाते.नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथे एस.एन.जे.बी.या महाविद्यालयात संपन्न झालेल्या जिल्हा युवा उत्सव-२०२३ हा महोत्सव नुकताच मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.त्यात नाट्य विभागातून कोपरगाव तालुक्यातील कोकामठाण येथील राष्ट्रसंत जनार्दन स्वामी फाऊंडेशन नर्सिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ‘साई श्रद्धा’ या संघामधून प्रथम क्रमांक पटकावला आहे.तात्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.सदर कार्यक्रमात विजेत्या संघाला केले सन्मानचिन्हाचे वितरण चांदवड येथे जिल्हा युवा उत्सव २०२३ या कार्यक्रमात मोठ्या उत्साहात करण्यात आले आहे.

सदर कार्यक्रमात महाविद्यालयीन संघांनी सहभाग नोंदवला होता.राष्ट्रसंत जनार्दन स्वामी नर्सिंग कॉलेजच्या सेजल मौर्या,निहारिका विष्णूभक्त स्नेहल वाघमारे,श्वेता जाधव,आदित्य दिघे,अभिषेक बिडगर,अतुल भिसेन,श्रुती पाडवी,अमोशा कडू या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता.कोरिओग्राफी प्रथमेश जाधव यांनी केली होती.या विद्यार्थ्यांना नर्सिंग कॉलेजचे प्राचार्य इरशाद अली व त्यांच्या सर्व शिक्षक वृंदांचे मार्गदर्शन लाभले होते.

सदर संघाचे राष्ट्रसंत जनार्दन स्वामी फाऊंडेशनचे अध्यक्ष चांगदेव कातकडे,सचिव प्रसाद कातकडे यांनी प्रथम क्रमांक मिळालेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे.यावेळी आमदार डॉ.राहुल आहेर,तहसीलदार मंदार कुलकर्णी,मोहम्मद अरिफ खान आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close