करमणूक
कलाक्षेत्र हे आनंद मिळवण्याचं क्षेत्र-पोटभरे

न्युजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
कलाक्षेत्र हे आनंद मिळवण्याचं ठिकाण असून आपल्या आयुष्याची वृद्धी करायची असेल तर कलाकारांचे जीवन जगणे हे अतिशय महत्त्वाचं आहे कलाकारांचे जीवन जगलेल्या माणसाचे जीवनमान उंचावत जात असल्याचा आपल्याला विश्वास असून हीच प्रेरणा सगळ्या कलाकारांना मिळो असे प्रतिपादन कलारंजन थिएटरचे ज्येष्ठ रंगकर्मी,नाटककार भाऊसाहेब पोटभरे यांनी नुकतेच एका ठिकाणी व्यक्त केले आहे.

सदर प्रसंगी राज्य नाट्य स्पर्धेमध्ये कोपरगावाचे प्रतिनिधित्व करणारे डॉ.मयूर त्रिरमखे,प्रा.किरण लद्दे,पिंगळे,गणेश सपकळ,सुमित खरात यांचे ज्येष्ठ नाट्यकर्मींच्या हस्ते सत्कार करण्यात आला आहे.
कलासागर व कलारंजन नाट्यसंस्थेतील कलाकारांच्या भेटीगाठीच्या निमित्ताने स्नेह मेळाव्याचे आयोजन कोपरगाव शहरातील जोर्वेकर हॉस्पिटल या ठिकाणी करण्यात होते त्यावेळी ते बोलत होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साहित्यिक प्रा.बाबुराव उपाध्या हे होते.
सदर प्रसंगी राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे तर प्रमुख पाहुणे प्रा.सुताळे,प्रा.बारगळ सर होते.प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून,नटराजाचे पूजन करण्यात आले होते.
यावेळी शंकरराव जोर्वेकर सर,सुधाकर काळे,वाल्मीक तुरकणे,अण्णासाहेब तुरकणे,गिरीश देशपांडे,संजय भावसार,विलास नाईक,श्रीमती अशालता कुलकर्णी,श्रीमती स्वाती मुळे,श्रद्धा जवाद,गोविंद जवाद,हर्षदा गोसावी,अंजली कुलकर्णी,शैलेश शिंदे,सीमा देशमुख,अरुण चंद्र,प्रसाद ठोंबरे,प्रभाकर कांडेकर,सुरेखा पोटभरे,गणेश दाणे,नासिर खान पठाण,अमीर शेख,श्रीकांत कुलकर्णी,मनिशा गोसावी,गायत्री देशपांडे,डॉ.मयूर जोर्वेकर आदीसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
यावेळी उपस्थित नाट्यकर्मींनी आपल्या आठवणींना उजाळा देत नाटकातील गमतीजमती सांगितल्या आहेत.या वेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक शंकर जोर्वेकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार संजय भावसार यांनी मानले आहे.