करमणूक
…यांनी वाढवला कोपरगावचा लौकिक-आ.काळे

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगावात उच्च दर्जाचे कलाकार आहेत त्याचबरोबर डॉ.मयूर तिरमेखेंनी अभिनयाबरोबरच चित्रपट निर्मितीमध्ये देखील पाऊल ठेवले हि संपूर्ण कोपरगावकरांसाठी अभिमानास्पद बाब असून त्यांनी मराठी चित्रपट सृष्टीत कोपरगावचा नावलौकिक वाढविला असल्याचे गौरवोदगार आ.आशुतोष काळे यांनी कोपरगावात एका कार्यक्रमात बोलताना काढले आहे.

“सेवा कोणतीही असो हि सेवा वैद्यकीय असो,हि सेवा रंगभूमीची असो किंवा जनसेवा असो.ज्यावेळी आपण सेवा स्वीकारतो त्यावेळी त्या सेवेसाठी स्वत:ला वाहून घेतो.त्यामुळे आपली सेवा सोडून दुसऱ्या सेवेसाठी वेळ देणारे क्वचितच असतात.त्यापैकी आ.आशुतोष काळे हे कलेची कदर करणारे नेते आहे”-अभिनेता सिद्धार्थ जाधव.
कोपरगाव शहरातील प्रसिद्ध डॉ.मयूर तीरमखे यांनी निर्मिती केलेल्या सुप्रसिद्ध मराठी अभिनेता सिध्दार्थ जाधव व प्रसिद्ध अभिनेत्री मयुरी देशमुख यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘लग्न कल्लोळ’ हा चित्रपट आज शुक्रवार दि.०१ रोजी सर्वत्र प्रदर्शित होत असून त्या पार्श्वभूमीवर या चित्रपटाच्या प्रीमियर शो प्रसंगी ते बोलत होते.
सदर प्रसंगी पुढे बोलताना ते म्हणाले की,”आजवर कलाकारांना नेहमीच प्रोत्साहन दिले असून कलाकारांच्या मागणीची दखल घेवून कोपरगाव शहरातील खुले नाट्यगृहाचे काम लवकरच पूर्ण करणार आहे.डॉ.मयुर तीरमखे वैद्यकीय सेवा देवून आपली कला जोपासत मराठी रंगभूमीची देखील सेवा करीत आहे.या दोन्ही क्षेत्रात त्यांनी नाव कमविले असून भविष्यात त्यांच्या माध्यमातून सिनेसृष्टीत कोपरगावचे देखील नाव मोठे होणार आहे.त्यामुळे या कलाकारांना उर्जा मिळावी यासाठी सर्वांनी आवर्जून चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट पहावा असे आवाहन आ.आशुतोष काळे यांनी यावेळी केले.व डॉ. मयुरजी तिरमखे तसेच ‘लग्न कल्लोळ’ चित्रपटाच्या सर्व कलाकारांना शुभेच्छा दिल्या.