ऊर्जा विभाग
…या उद्योग समूहाची ऊर्जा क्षेत्रासाठी ७० अब्ज डॉलरची गुंतवणूक
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
मुंबईः देशातले सर्वात श्रीमंत उद्योगपती गौतम अदानी यांनी ऊर्जाक्षेत्रात सत्तर अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्याचं जाहीर केलं आहे.भारतात तयार होणारी हरित ऊर्जा निर्यात करण्याचं त्यांचं उद्दिष्ट आहे.
नवीन ऊर्जा व्यवसायात ७० अब्ज डॉलर गुंतवणुकीची घोषणा भारताला कच्च्या तेलाच्या आयातदारापासून ग्रीन हायड्रोजनच्या निर्यातदारामध्ये बदलण्यास मदत करेल. अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड (जीईएल),समूहाची अक्षय ऊर्जा कंपनी, २०३० पर्यंत ४५ गीगावॉट अक्षय ऊर्जा क्षमता साध्य करण्याचं उद्दिष्ट ठेवत आहे.
नवीन ऊर्जा व्यवसायात ७० अब्ज डॉलर गुंतवणुकीची घोषणा भारताला कच्च्या तेलाच्या आयातदारापासून ग्रीन हायड्रोजनच्या निर्यातदारामध्ये बदलण्यास मदत करेल. अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड (जीईएल),समूहाची अक्षय ऊर्जा कंपनी, २०३० पर्यंत ४५ गीगावॉट अक्षय ऊर्जा क्षमता साध्य करण्याचं उद्दिष्ट ठेवत आहे.यासाठी,दर वर्षी दोन गीगावॉट सौर क्षमता विकसित करण्यासाठी २० अब्ज डॉलरची गुंतवणूक करत आहे.उर्वरित रक्कम ग्रीन हायड्रोजनच्या उत्पादनासाठी सुविधा निर्माण करण्यासाठी वापरली जाईल.नूतनीकरणीय ऊर्जेतली ताकद ग्रीन हायड्रोजनला भविष्यातलं इंधन बनवण्यास मदत करेल असं अदानी म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, तेल आणि वायूच्या आयातीवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असलेल्या भारताला स्वच्छ ऊर्जेचा निव्वळ निर्यातदार बनवण्याच्या उपक्रमात आम्ही आघाडीवर आहोत.आम्ही भारतात गुंतवणूक करण्यापासून कधीही मागे हटलो नाही. देशात पायाभूत सुविधा निर्माण करणं,रस्तेबांधणीचे मोठे करार जिंकणं,बंदरं आणि लॉजिस्टिक्सपासून वीज पारेषण आणि वितरण आणि शहर गॅस पुरवठ्यापर्यंत व्यवसायांचा विस्तार करत समूहाचा विकास होत आहे.
अदानी समूह देशातल्या विमानतळांचा सर्वात मोठा ऑपरेटर म्हणून उदयास आला आहे.होलसिमच्या अधिग्रहणासह समूहाने आता सिमेंट व्यवसायातही प्रवेश केला आहे.अदानी समूहाची सुरुवात १९८८ मध्ये कमॉडिटी व्यवसायाने झाली.या समूहातल्या सूचीबद्ध कंपन्यांचं मार्केट कॅप २०० अब्जापेक्षा जास्त असून अदानी ग्रुपच्या सहा कंपन्या स्टॉक एक्स्चेंजवर सूचीबद्ध आहेत आणि त्यांचं बाजार भांडवल २०० बिलियन ओलांडत आहे.अदानी समूहाने पोर्टफोलिओमध्ये ऑपरेशनल उत्कृष्टतेवर लक्ष केंद्रित केल्याने कमाई २६ टक्क्यांनी वाढण्यास मदत झाली आहे.