आयुर्वेद
मुतखडा मुक्तीसाठी आयुर्वेदिक उपचार काळाची गरज-डॉ.शेळके
न्यूजसेवा
कुंभारी-(प्रतीनिधी)
मुतखडा आजाराला न घाबरतात वेळेवर आयुर्वेदिक पद्धतीने उपचार घेतले तर रुग्ण सहजपणे कंबर दुखी पोटदुखी लघवीच्या होणाऱ्या त्रासातून मुक्त होऊ शकतो मात्र त्यासाठी वेळेवर उपचार जर घेतले तर शस्त्रक्रियेची देखील गरज भासत नसल्याचे प्रतिपादन आयुर्वेद तज्ज्ञ डॉ.रवींद्र गोरक्षनाथ शेळके हे शिर्डी येथे आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते.
“खराब असणारे क्षारयुक्त पाणी त्याबरोबरच अति दुग्धजन्य पदार्थांचे सेवन आहारात टोमॅटो,भेंडी,पालक याचा अति प्रमाणात समावेश होणे त्याबरोबर अवेळी जेवण व शरीरात वाढलेले दोष अशा बाबी मुतखडा होण्यासाठी कारणीभूत होत असतात.कंबरदुःखी,पोटदुखी,लघवी यासारखे त्रास सुरू झाले की अनेकांना मुतखडा झाला आहे असा समज होतो मात्र अशा वेळी रुग्ण व नातेवाईकानी घाबरून न जाता आयुर्वेदिक पद्धतीने उपचार घेतले तर त्यातून सहजपणे मुक्ती मिळू शकते”-डॉ.शेळके रवींद्र,कोपरगाव.
शिर्डी येथे आयुर्वेद आणि मुतखडा या विषय यावर डॉ.रवींद्र शेळके यांचे व्याख्यान आयोजित केले होते त्यावेळी ते बोलत होते.सदर प्रसंगी बबन सांगळे,बंटी ठाकरे,किशोर पाटणी,गहिनीनाथ घुले,अशोक वंसाडे,गोरक्षनाथ शेळके,नानासाहेब भारती,महेंद्र रोहमारे,सदाशिव निकम, बाबासाहेब गायकवाड,बाबासाहेब रहाणे,रमन गायकवाड आदीसह विविध मान्यवर उपस्थित होते.
त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”खराब असणारे क्षारयुक्त पाणी त्याबरोबरच अति दुग्धजन्य पदार्थांचे सेवन आहारात टोमॅटो,भेंडी,पालक याचा अति प्रमाणात समावेश होणे त्याबरोबर अवेळी जेवण व शरीरात वाढलेले दोष अशा बाबी मुतखडा होण्यासाठी कारणीभूत होत असतात.कंबरदुःखी,पोटदुखी,लघवी यासारखे त्रास सुरू झाले की अनेकांना मुतखडा झाला आहे असा समज होतो मात्र अशा वेळी रुग्ण व नातेवाईकानी घाबरून न जाता आयुर्वेदिक पद्धतीने उपचार घेतले तर त्यातून सहजपणे मुक्ती मिळू शकते असा विश्वास व्यक्त केले.आयुर्वेदिक उपचाराच्या माध्यमातून अनेक रुग्णांना मोठ्या प्रमाणावर मुतखडा आजारातून आपण अनेक रुग्ण मुक्त केल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले आहे.मुतखडा रुग्णांची वाढती संख्या देखील चिंता करणारी आहे.यावेळी कार्यक्रमात मुतखडा आजार उपचार व मार्गदर्शक व शंका निरसन देखील करण्यात आले आहे.
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्तविक बबन सांगळे यांनी केले तर उपस्थितांचे आभार ग्रामविकास अधिकारी गोरक्षनाथ शेळके यांनी मानले आहे.