आयुर्वेद
…या वैद्यकांचा जागतिक आयुर्वेद परिषदेत गौरव !

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कर्नाटकातील बंगळुरु येथे नुकतीच जागतिक आयुर्वेद परिषद मोठ्या उत्साहात संपन्न झाली असून यात सलग ३८ वर्षे आयुर्वेदावर काम करून हजारो विद्यार्थ्यांना प्रशिक्षित केल्याबद्दल कोपरगाव येथील आयुर्वेद तज्ञ डॉ.रामदास आव्हाड यांना ‘विश्वरत्न आयुर्वेद रत्न’ पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.त्यांचे राज्यभरातून अभिनंदन होत आहे.

या आयुर्वेद परिषदेत जगभरातून सहा हजारहून अधिक आयुर्वेद तज्ञ यात सहभागी झाले होते.त्यात महत्वाच्या सत्रामध्ये महाराष्ट्रातून कोपरगाव येथील प्रसिद्ध आयुर्वेदाचार्य डॉ.रामदास आव्हाड यांना,’ पुरुष वंध्यत्व’ या विषयावर व्याख्यानासाठी निमंत्रित करण्यात आले होते त्यावेळी हा गौरव करण्यात आला आहे.त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
जागतिक आयुर्वेद परिषद ही आयुर्वेदाद्वारे आयुर्वेदाचा जागतिक स्तरावर प्रचार करण्यासाठी आयोजित केली जाणारी द्वैवार्षिक परिषद आहे,ज्यात जगभरातील तज्ञ एकत्र येऊन आयुर्वेदाच्या प्रगतीवर चर्चा करतात.मागील वर्षी ती डिसेंबर २०२४ मध्ये डेहराडून येथे १० वी परिषद “डिजिटल हेल्थ: अॅन आयुर्वेद पर्सपेक्टिव्ह” या पार्श्वभूमीवर संपन्न झाली होती.तर यावर्षी अकरावी जागतिक आयुर्वेद परिषद ही कर्नाटकची राजधानी बंगळुरू या ठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे.त्यात जगभरातून सहा हजारहून अधिक आयुर्वेद तज्ञ यात सहभागी झाले होते.त्यात महत्वाच्या सत्रामध्ये महाराष्ट्रातून कोपरगाव येथील प्रसिद्ध आयुर्वेदाचार्य डॉ.रामदास आव्हाड यांना,’ पुरुष वंध्यत्व’ या विषयावर व्याख्यानासाठी निमंत्रित करण्यात आले होते.

या जागतिक परिषदेच्या निमित्ताने भारत व विदेशात आयुर्वेद प्रचार प्रसार कार्य करणाऱ्या वीस वैद्यांचा सत्कार करण्यात आला आहे.त्यात कोपरगाव येथील वैद्य(डॉ.) रामदास आव्हाड यांचे आयुर्वेदातील ३८ वर्षाचे योगदान व त्यांनी प्रशिक्षित केलेल्या हजारो विद्यार्थ्यांचे इच्छेनुसार त्यांचा उत्स्फूर्तपणे,”आयुर्वेद विश्वरत्न पुरस्कार” देऊन सन्मान करण्यात आला आहे.त्यात त्यांना शाल व सन्मान चिन्हांचा समावेश आहे.

सदर प्रसंगी उडुपी मठाधिपती श्री विश्वप्रसन्न तीर्थ व कर्नाटक सरकारमधील मंत्री शोभा कमजान उपस्थित होत्या.डॉ.रामदास आव्हाड यांचा हा ५४ वा सन्मान पुरस्कार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.विविध सांस्कृतिक कार्यक्रम,रुग्णचिकित्सा,साठहून अधिक रोगांवरील विविध वैद्यांची व्याख्याने,चर्चासत्र,आयुर्वेद आहार स्टॉल,दोनशेहून अधिक कंपन्यांचे औषधी,स्टॉल,मान्यवरांची उपस्थिती,सन्मान असा चार दिवस कार्यक्रम प्रथमच संपन्न झाला आहे.या कार्यक्रमात डॉ.आव्हाड सन्मानित होणे हि कोपरगावसह आयुर्वेद जगताच्या दृष्टीने समाधानाची बाब मानली जात आहे.



