जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
आयुर्वेद

जीवनशैलीमुळे निर्माण झालेल्या सर्व प्रश्नाचे उत्तर आयुर्वेदात -डॉ.कुटे

न्यूजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

  आज जगाला आयुर्वेदाचे महत्व पटले असून सर्व जग आयुर्वेदाकडे वळले आहे.वर्तमानात मनाची अशांतता दूर करण्यासाठी दोन पर्याय असून ते म्हणजे “अध्यात्म व आयुर्वेद”. आजच्या जीवनशैलीमुळे तयार झालेल्या सर्व प्रश्नाचे उत्तर आयुर्वेदामध्ये असल्याचे प्रतिपादन माजी आ.डॉ.संजय कुटे यांनी नुकतेच कोकमठाण येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना केले आहे.

“आयुर्वेद ही भारतातील ऋषीमुनींनी जगाला दिलेली जीवन पद्धती आहे.जीवनाचे ज्ञान म्हणजे आयुर्वेद आहे आणि जीवनाचे ज्ञान म्हणजे आत्मज्ञान आहे.आयुर्वेद शाश्वत असल्याने ते आज जगमान्य झाले असून आज जग भारताचे अनुकरण करत आहे”परमानंद महाराज,आत्मा मालिक ध्यानपीठ.

   कोपरगाव तालुक्यातील आत्मा मलिक ध्यानपीठ कोकमठाण येथे महाराष्ट्र राज्य अनुदानित आयुर्वेद युनानी महाविद्यालयीन अध्यापक संघ आयोजित ‘राष्ट्रीय आयुर्वेद ’
मोठ्या उत्साहात संपन्न झाली त्या वेळी ते बोलत होते.

  त्यावेळी पुढे बोलताना म्हणाले की,”आयुर्वेदामध्ये जीवनातील समस्यांचे निराकरण करण्याची क्षमता आहे.म्हणूनच आयुर्वेद हे समग्र व प्रगल्भ असे शास्त्र आहे असल्याचे शेवटी सांगितले आहे.

   सदर प्रसंगी धारावीचे आ.डॉ.ज्योती गायकवाड,कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.मिलिंद आवारे आत्मा मालिक ध्यानपीठाचे सद्गुरू परमानंद महाराज,विवेकानंद महाराज, विश्वानंद महाराज,उपाध्यक्ष बाळासाहेब गोर्डे, संघटनेचे अध्यक्ष अभय पाटकर,अध्यक्ष डॉ.सुरज ठाकुर,कार्यक्रमाचे सचिव प्रवीण पेटे, डॉ.नारायण जाधव,डॉ.वांगे सर,महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विघ्यापीठ अधिष्ठाता डॉ.सुरज पोदाडे आदी मान्यवर उपस्थित होते.

   या कार्यक्रम प्रसंगी आ.डॉ.ज्योती गायकवाड यांनी आयुर्वेदाची दखल जगाने घेतली आहे.आयुर्वेदास आणखी पुढे घेऊन जाण्यासाठी आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राध्यापक,विद्यार्थी व संघटनांनी असेच काम करत राहावे.आपण आयुर्वेद महाविद्यालयात १५ वर्षे नोकरी केली म्हणून तुमचे प्रश्न मला माहीत असून ते शासन दरबारी मार्गी लावण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

  आश्रमाचे परमानंद महाराज यांनी सांगितले की,आयुर्वेद ही भारतातील ऋषीमुनींनी जगाला दिलेली जीवन पद्धती आहे.जीवनाचे ज्ञान म्हणजे आयुर्वेद आहे आणि जीवनाचे ज्ञान म्हणजे आत्मज्ञान आहे.आयुर्वेद शाश्वत असल्याने ते आज जगमान्य झाले असून आज जग भारताचे अनुकरण करत आहे.

  यावेळी विश्वानंद महाराज,कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.मिलिंद आवारे आदींनी आपली मनोगते व्यक्त केली आहे.तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.संगीता निंबाळकर,वीणा दिघे यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रदर्शन संघटनेचे सचिव डॉ.सुरेश पोघाडे यांनी मांनले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close