आयुर्वेद
…या वैद्यकांना पुण्यात पुरस्कार प्रदान !
न्युजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
कोपरगाव येथील आयुर्वेद तज्ञ डॉ.रामदास आव्हाड यांना नुकतेच तेलंगणाचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या हस्ते व पुणे येथील भारतीय आयुर्वेद संस्थेद्वारे आयोजित आयूर्वेद संभाषा परिषद-२०२४ च्यावतीने सुमंत मुळगावकर सभागृहात,’आयुर्वेद गौरव पुरस्काराने’ गौरविण्यात आले असल्याने त्यांचे राज्यात सर्वत्र अभिनंदन होत आहे.
पुणे येथील भारतीय आयुर्वेद संस्थेद्वारे आयोजित आयूर्वेद संभाषा परिषद-२०२४ च्यावतीने धन्वंतरी पुरस्कार सोहळा व आयुर्वेद संभाषा परिषद व सर्व आयुर्वेद संघटनांना एकत्रित करून,”आयुर्वेदाची दिशा आणि भविष्याचा वेध” या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते.त्यावेळी कोपरगाव येथील आयुर्वेदाचे राष्ट्रीय गुरू व तज्ञ डॉ.रामदास आव्हाड यांचा हा गौरव करण्यात आला आहे.
सदर प्रसंगी सदर संस्थेचे अध्यक्ष व खा.डॉ.अमोल कोल्हे,कार्याध्यक्ष डॉ.प्रशांत दौंडकर आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान सदर प्रसंगी स्व.विलास नानल सर यांना मरणोत्तर आयुर्वेद रत्न हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.शिवाय डॉ.सदानंद सरदेशमुख,समीर जमदग्नी,श्रुती जमदग्नी,विनय वेलणकर,विनायक टेंभुर्णीकर आदींना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.दरम्यान डॉ.रामदास आव्हाड यांचे नगर जिल्ह्यासह सर्वत्र अभिनंदन होत आहे.