आयुर्वेद
…या आयुर्वेद तज्ञांचा नाशिक येथे सत्कार !
न्युजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी )
नाशिक येथील आयुर्वेद सेवा संघाच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त आयुर्वेद सेवा संघाच्या वतीने महर्षी चरक जयंतीचा निमित्ताने नाशिक आयुर्वेद महाविद्यालयाच्या वतीने कोपरगाव येथील राष्ट्रीय आयुर्वेद तज्ञ डॉ.रामदास आव्हाड यांना,’राष्ट्रीय धन्वंतरी पुरस्कार’ मिळाल्याबद्दल त्यांचा मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला आहे.
कोपरगाव येथील आयुर्वेद तज्ञ डॉ.रामदास आव्हाड यांनी गतवर्षी केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या वतीने देण्यात येणारा राष्ट्रीय धन्वंतरी आयुर्वेद पुरस्कार जाहीर झाला होता.त्यांचे सर्वत्र अभिनंदन झाले होते.त्यांच्या या पुरस्काराची दखल घेऊन नाशिक येथील आयुर्वेद सेवा संघाने महर्षी चरक जयंतीचे औचित्य साधत डॉ.रामदास आव्हाड यांचा सत्कार आयोजित केला होता.
सदर प्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष डॉ.आशुतोष यार्दी,सचिव डॉ.अभय कुलकर्णी,डॉ.रजनी गोखले,माधव परांजपे आदी प्रमुख मान्यवरांसह महाविद्यालयाचे प्राध्यापक वैद्य,विद्यार्थी व बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.
सदर प्रसंगी डॉ.आव्हाड यांचे या निमित्ताने,’दैनंदिन चिकित्सेत पंचकर्माचे महत्त्व’ या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते.
त्यावेळी बोलताना ते म्हणाले की,”आजपर्यंत आपल्याला मिळालेल्या पुरस्कारापेक्षा मातृसंस्थेने दिलेला पुरस्काराचे मोल सर्वाधिक असल्याचे सांगितले आहे.आपण याच महाविद्यालयातून शिक्षण घेतल्याचे त्यांनी गौरवाने सांगून महर्षी चरक यांच्या जयंती निमित्ताने आपला आपण शिक्षण घेतलेल्या आयुर्वेद सेवा संघासारख्या मातृसंस्थेकडून सत्कार होणे हा दुग्धशर्करा योग असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले आहे.संस्थेच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.