आयुर्वेद
कर्नाटक सरकार तर्फे कोपरगातील…या डॉक्टरांचा सन्मान
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कर्नाटक सरकार संचालित,सर्वात जुन्या समजल्या जाणाऱ्या श्री तारानाथ आयुर्वेद महाविद्यालय,बेल्लारी तर्फे नुकतीच भारतातील पहिली उत्तरबस्ती वरील राष्ट्रीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली या कार्यशाळेसाठी प्रमुख अतिथी म्हणून कोपरगाव येथील प्रसिद्ध वैद्य रामदास आव्हाड यांना निमंत्रित करण्यात आले होते त्यांना त्या ठिकाणी गौरविण्यात आले आहे.त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
उत्तर बस्ती ही नर व मादी या दोन्हीच्या जनु-मूत्र विकारांसाठी एक महत्वाची पंचकर्मा पद्धत मानली जाते.थेरपीमध्ये मूत्रपिंड किंवा गर्भाशयात विशिष्ट औषधी तेल,गर्रा किंवा डिकोक्शनचे व्यवस्थापन समाविष्ट असते.उत्तर बस्ती प्रति यूरेथ्रा बिनिग प्रोस्टेट वाढ,मूत्रमार्गात असंतुलन,मूत्रपिंडातील सक्तपणा,वारंवार मूत्रमार्गात रक्त संक्रमण (यूटीआय), मूत्राशय ऍटनी,ड्रिब्लींग परिपक्वता,सिस्टिटिस,पुरुष वांझपन,कमी शुक्राणूंची संख्या,नपुंसकत्व आदी मध्ये उपयुक्त मानली जाते.यात डॉ.रामदास आव्हाड हे निष्णात मानले जातात.
यापूर्वी भारतात विविध ठिकाणी आयुर्वेदातील विविध कर्मावर कार्यशाळा आयोजित केल्या होत्या.त्यात नियमानुसार अधिकतम तीस पदव्युत्तर वैद्य सहभागी झालेत.गर्भाशयागत व मूत्रगत विकारावर ‘स्त्री’ आणि ‘पुरुष’ मध्ये केली जाणारी उत्तरबस्ती चिकित्सा अत्यंत फलदायी व उपयुक्त असल्याचे सिद्ध झाले आहे.या उत्तरबस्तीचे प्रत्यक्ष कर्म दाखविणारी कार्यशाळा भारतात आजपर्यंत कुठेही झाली नव्हती.ते धाडसी काम कोपरगाव येथील वैद्य रामदास आव्हाड यांचे मार्गदर्शनाखाली प्रत्यक्ष कर्माद्वारे भारतातून आलेल्या २२० हुन अधिक पदव्युत्तर विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष बघता आले आले आहे.सर्व सर्जिकल काळजी घेत १८ उत्तरबस्ती विविध कष्टदायक आजार असलेल्या ‘स्त्री’ व ‘पुरुष’ रुग्णांमध्ये वैद्य रामदास आव्हाड यांनी ऑपेरेशन थिएटरमध्ये स्वतः करून दाखविले आहे.आजपर्यंत अशा प्रकारची कार्यशाळा २२० वैद्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत भारतात कुठेही झाली नाही हे विशेष ! त्यानंतर उत्तरबस्तीवर वैद्य आव्हाड यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान संपन्न झाले आहे.त्यानंतर प्रश्नोत्तरे संपन्न झाली आहेत.
सदर प्रसंगी वैद्य रामदास आव्हाड यांचा कर्नाटक सरकार तर्फे यथोचित ट्रॅडिशनल पद्धतीने सत्कार करण्यात आला आहे.त्यात शाल,कर्नाटकी पगडी,स्मृतिचिन्ह,मानपत्र देऊन सर्व महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य श्रीमती फातिमा मॅडम यांचे हस्ते मोठा सत्कार करण्यात आला आहे.त्यावेळी पंचकर्म विभागप्रमुख डॉ.राजेश सुगुर,भारत कौंसिल सदस्य डॉ.राजशेखर आदी मान्यवर उपस्थित होते .