जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
आंदोलन

…’त्या’ तरुणाला न्याय द्या’ मागणीसाठी कोपरगावात मोर्चा

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरात सोमवार दि.१२ जून रोजी सकाळी ११ वाजता नांदेड जिल्ह्यातील अक्षय भालेराव या युवकाची हत्या केल्या प्रकरणी राग धरून असामाजिक तत्वांनी हत्या केल्याच्या घटनेसह विविध चार मागण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक ते कोपरगाव तहसील कार्यालयापर्यंत आंबेडकरी चळवळीच्या वतीने,’जनआक्रोश मोर्चा’चे आयोजन केले होते त्यात सुमारे दीड हजार नागरिक आणि महिलांनी सहभाग घेतला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

नांदेड जिल्ह्यातील अक्षय भालेराव या युवकाची हत्या केल्या प्रकरणी दलित समाजामध्ये या हत्येचा तीव्र प्रक्षोभ दिसून येत आहे.समाजमाध्यमांवरही या हत्येवरुन तीव्र भावना व्यक्त केल्या जात आहेत.त्याचे पडसाद कोपरगाव शहरात उमटले असून त्या विरोधात तहसील कार्यालयावर आज सोमवार दि.१२ जून रोजी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास,’जनआक्रोश मोर्चा’ आयोजित केला होता.त्याला आंबेडकरी जनतेने मोठा प्रतिसाद दिला असल्याचे दिसून आले आहे.

नांदेड जिल्ह्यातील बोंडर हवेली गावातील दलित तरुण अक्षय भालेराव याची हत्या करण्यात आली आहे.लग्नाच्या वरातीत ०१ जून रोजी हा प्रकार घडला आहे.गावातील तरुणांनी ‘गावात भीम जयंती साजरी करता का ?’ असा सवाल विचारत काही असामाजिक तत्त्वांनी त्यास लाठ्या-काठ्यांनी मारहाण केली.त्यानंतर खंजर आणि तलवारीच्या सहाय्याने अक्षय याची भोसकून हत्या करण्यात आल्याचा आरोप आहे.अक्षय याच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरुन नांदेड ग्रामिण पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.

पोलिसांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीमध्ये,वरातीत नाचण्यावरुन झालेल्या वादातून हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती असल्याचे म्हटले आहे.दरम्यान,अक्षयच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी अॅट्रोसिटी अॅक्टअंतर्गत गुन्हे दाखल केले असून ०७ आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.या प्रकरणातील आणखी दोन आरोपींचा शोध सुरु आहे.दरम्यान दलित समाजामध्ये या हत्येचा तीव्र प्रक्षोभ दिसून येत आहे.समाजमाध्यमांवरही या हत्येवरुन तीव्र भावना व्यक्त केल्या जात आहेत.त्याचे पडसाद कोपरगाव शहरात उमटले असून त्या विरोधात तहसील कार्यालयावर आज सोमवार दि.१२ जून रोजी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास,’जनआक्रोश मोर्चा’ आयोजित केला होता.त्याला आंबेडकरी जनतेने मोठा प्रतिसाद दिला असल्याचे दिसून आले आहे.

सदर प्रसंगी आर.पी.आयचे उत्तर विभागाचे प्रमुख दिपक गायकवाड,माजी शहराध्यक्ष जितेंद्र रणशूर,प्रकाश दुशिंग,शांताराम रणशूर,नितीन शिंदे,सिद्धार्थ मेहरखांब,सविता विधाते,शरद खरात,माजी नगरसेविका मायदेवी खरे,विलास अहिरे,संपतराव भारूड,सुरेश भालेराव,दिनेश निकम,संजय दुशिंग,आदी सह बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.

सदर मोर्चा डॉ.आंबेडकर स्मारकापासून सुरु होऊन तो विघ्नेश्वर चौक,गुरुद्वारा रोड मार्गे तहसील कार्यालयाकडे रवाना झाला होता.त्यावेळी मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले असून या तरुणास न्याय मिळवून दयावा अशी मागणी केली आहे.त्यावेळी विविध घोषणा करण्यात आल्या आहेत.दरम्यान उपस्थित मुलीच्या हस्ते कोपरगाव तहसीलदार यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले आहे.दरम्यान कोपरगाव शहर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

सदर कार्यक्रमाचे प्रास्तविक जितेंद्र रणशूर यांनी केले तर उपस्थितांना मार्गदर्शन दिपक गायकवाड,प्रकाश दुशिंग,शांताराम दुशिंग,मायदेवी खरे,विलास अहिरे आदींनी केले आहे.उपस्थित नागरिकांचे आभार विजय त्रिभुवन यांनी मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close