जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निवडणूक

शेतकऱ्यांच्या समस्या बनलेले नेते हटविण्याची हीच वेळ-आवाहन

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतील शेतकऱ्यांची आर्थिक लूट थांबवायची असेल व तालुक्यातील शेतकऱ्यांत सुबत्ता आणायची असेल तर आता सर्व विरोधाचा बनाव करणारे नेते बाजार समितीच्या निवडणुकीत एका रेषेत व दोरीत आले असून या निवडणुकीत त्यांना आस्मान दाखविण्यासाठी शेतकऱ्यांनी व बाजार समितीच्या सभासदांनी परिवर्तन पॅनलला बहुमताने विजयी करावे असे आवाहन उद्धव शिवसेना गटाचे उत्तर जिल्हा प्रमुख प्रमोद लबडे यांनी आज कोपरगाव येथील एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

“कोपरगाव तालुक्यात आगामी काळात उसाचे वजन काट्यांची मारामारी,ऊस उतारा,सहकारी संस्थांच्या जमिनी हडप करण्याचे थांबवायचे असेल तर परिवर्तन पॅनल हाच पर्याय शेतकऱ्यांपुढे आहे.त्यामुळे सत्ताधारी गटाने आपल्या पॅनलचे चिन्ह आपल्या स्वभावाप्रमाणे घेतले आहे.व शेतकऱ्यांपुढे गाजर दाखवले आहे”-शिवाजी ठाकरे,अध्यक्ष,उद्धव शिवसेना उद्धव ठाकरे,कोपरगाव तालुका.

कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांची कामधेनू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत नामनिर्देशन अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी १०४ पैकी ६३ उमेदवारांनी मागे घेतले असून ०३ जागा बिनविरोध झाल्या असून १५ जागेसाठी आता रिंगणात ३८ जण आपले भविष्य आजमावत असून यात शिवसेनेने आपल्या सहकाऱ्यांसह ११ उमेदवार रिंगणात ठेवल्याने त्यांनी प्रस्थापित काळे-कोल्हे,परजणे युतीला आव्हान निर्माण केले आहे त्यामुळे आता ही दुरंगी लढत तब्बल १५ वर्षांनी रंगणार असून आज सायंकाळी ५.३० वाजता जेष्ठ व्यापारी अजित लोहाडे यांच्या हस्ते उद्धव सेना,काँग्रेस,स्वाभिमानी शेतकरी संघटना,वंचित बहुजन आघाडी आदींच्या,’परिवर्तन पॅनल’चा विघ्नेश्वर मंदिरात प्रचाराचा नारळ फोडण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अजित लोहाडे हे होते.

सदर प्रसंगी उद्धव सेनेचे जिल्हा प्रमुख प्रमोद लबडे,तालुका प्रमुख शिवाजी ठाकरे,कोपरगाव शहर प्रमुख सनी वाघ,माजी शहर प्रमुख भरत मोरे,अस्लम शेख,प्रविण शिंदें,ऍड.दिलीप लासुरे,राहुल होन,रावसाहेब टेके,भाजपचे माजी शहर प्रमुख प्रभाकर वाणी,काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस नितीन शिंदे,वंचितचे जिल्हाध्यक्ष शरद खरात,काँग्रेसचे आकाश नागरे,अनिल सोनवणे,पंचायत समितीचे माजी सदस्य अशोक कानडे,रंगनाथ गव्हाणे,मधुकर दंडवते,दगु पाटील गुडघे,विष्णू पाडेकर,बाजीराव गव्हाणे आदी मान्यवरांसह बहुसंख्य शेतकरी,सभासद उपस्थित होते.

त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”शेतकऱ्याचे नाव घेऊन आता पर्यंत खूप मोठी लूट प्रस्थापित नेत्यांनी केली आहे.आता हे थांबवायचे असेल तर आता या नेत्यांचा बंदोबस्त करण्याची वेळ आली आहे.यांनी आता पर्यंत शेतकऱ्यांना खुप छळले आहे.आता बाजार समिती वाचवायची असेल व खाजगी बाजार समित्या रोखायच्या असतील तर शेतकऱ्यांना या ‘परिवर्तन पॅनल’ला मतदान करावे लागणार आहे.आपण या नेत्यांचे राजकारण जवळून पाहिले आहे.त्यामुळे या निवडणुकीत हे अनिष्ठ राजकारण थांबायचे व तालुक्यातील सहकारी संस्थांचे खाजगीकरण रोखायचे असेल तर हि निवडणूक मतदारांनीं संधी म्हणून पाहायला हवे असे शेवटी आवाहन प्रमोद लबडे यांनी केले आहे.

सदर प्रसंगी शिवाजी ठाकरे यांनी उपस्थितांना संबोधित करताना म्हटले आहे की,”शिवसेनेला प्रतिनिधित्व दिले असते तर बाजार समिती विकली असती का ? असा सवाल करून उद्धव सेनेचे जिल्ह्याचे,तालुक्याचे प्रतिनिधी आम्ही असताना कोणी तरी ईशान्य गडाच्या मांडीवर जाऊन बसणाऱ्यांना सेनेचे कसे समजले जाते व त्यांना बाजार समितीच्या दोन जागा कशा दिल्या जाऊ शकतात ? असा सवाल करून माजी आ.अशोक काळे,स्नेहलता कोल्हे,आदींना आम्ही व तालुक्याच्या सेनेने आमचे नेते उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने मदत केली आहे पण त्यांना देण्याची वेळ येते तेंव्हा ही मंडळी नाक खाजवून दाखवत असल्याचा आरोप केला आहे.व शेतकऱ्यांची लूट होत असल्याबाबद टिका केली आहे.व सत्ताधारी केवळ शेतकऱ्यांना केवळ चहाचा नैवद्य दाखवत असल्याचा आरोप करून आगामी काळात उसाचे वजन काट्यांची मारामारी,ऊस उतारा,सहकारी संस्थांच्या जमिनी हडप करण्याचे थांबवायचे असेल तर परिवर्तन पॅनल हाच पर्याय शेतकऱ्यांपुढे आहे.त्यामुळे सत्ताधारी गटाने आपले पॅनलचे चिन्ह हे शेतकऱ्यांपुढे कपबशीचे गाजर असून त्यांच्या पॅनलचे चिन्ह त्याला अनुसरून घेतले असल्याचा आरोप केला आहे.

कोपरगाव तालुक्यातील नेत्यांनी पक्ष शिल्लक ठेवलेले नाही.मात्र सेनेला मानणारा मोठा वर्ग असून किमान २५ हजार मतदार असल्याचा दावा ठोकला आहे.कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्याच्या उसाला भाव मिळावा म्हणून शेतकरी संघटना आंदोलन करतात पण ज्यांना भाव मिळणार त्यांना हे नेते कारखाना परिसराच्या आत वडे आणि शिरा खाऊ घालतात यातून काय संदेश देत आहे व ज्यांना भाव मिळणार आहे त्याच्या लाचार पित्यांचा त्यांनी कठोर शब्दात समाचार घेतला आहे.व त्यानां या अक्षम्य कृतीचा सवाल विचारला आहे.त्यामुळे तालुक्यात परिवर्तन पॅनलच क्रांती करू शकतो व आगामी कोपरगाव नगरपरिषद निवडणुकीत तिसरा पॅनल निर्माण करून शह देऊ शकतो असा इशारा दिला आगामी राजकीय दिशा स्पष्ट केली असल्याचे मानले जात आहे.

सदर प्रसंगी ऍड.दिलीप लासुरे यांनी ही लढाई प्रस्थापितांविरुद्ध सामान्य शेतकरी यांची असून
आजवर शेतकऱ्यांच्या नावावर प्रस्थापित सहकार नेत्यांनी शेतकऱ्यांना लुटून स्वतःच्या कुटुंबाचा विकास केला आहे.अनेक संस्थांच्या जमिनी स्वतःच्या खिशात घातल्या असल्याचा आरोप केला आहे.तर काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस नितीन शिंदे यांनी तालुक्यातील नेते हीच समस्या बनली असून त्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडण्याऐवजी तालुक्याच्या शेती सिंचनाच्या पाण्याचे निळवंडे करून टाकले असल्याचा आरोप केला आहे.व जो प्रश्न ते हातात घेण्याचा आव आणतात तो प्रश्न सुटल्याचे दिसत नाही तर तो आणखी जटिल झालेला दिसत असल्याचा शेवटी नितीन शिंदे यांनी म्हटले आहे.

सदर प्रसंगी व्यापारी नेते अजित लोहाडे,अनिल सोनवणे,नितीन शिंदे,ज्ञानेश्वर भगत आदींनी प्रस्थापितां विरुद्ध टीकेचे आसूड ओढले आहे.

सदर प्रसंगी प्रारंभी मान्यवरांच्या उपस्थितीत विघ्नेश्वर मंदिरात परिवर्तन पॅनलचा नारळ अजित लोहाडे यांच्या शुभहस्ते नारळ फोडण्यात आला आहे.

कार्यक्रमाचे प्रास्तविक यांनी केले तर सूत्रसंचालन भरत मोरे यानी केले आहे.तर उपस्थितांचे आभार रावसाहेब टेके यांनी मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close