जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
आंदोलन

कोपरगाव नगरपरिषद अधिकारी,कर्मचारी बेमुदत संपावर !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

जुनी पेन्शन योजनेसह विविध मागण्यांसाठी कोपरगाव नगरपरिषदेतील अधिकारी-कर्मचारी १४ मार्च पासून बेमुदत संपावर जाण्याबाबतचे निवेदन आज कोपरगाव नगरपरिषदेतील अधिकारी-कर्मचारी यांनी नगरपरिषदेचे उपमुख्याधिकारी ज्ञानेश्वर चाकणे यांना दिले आहे.त्यामुळे ऐन वर्षाखेर होत असताना हे आंदोलन पालिकेला चांगलेच अडचणीत आणणार असे दिसत आहे.

दरम्यान नगरपरिषदेने आर्थिक वर्ष संपत आले असताना वार्षिक पाणीपट्टी आणि घरपट्टी वसुली मोहीम कोपरगाव पालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक शांताराम गोसावी यांनी मोठ्या नेटाने सुरू ठेवली होती व त्याला बऱ्यापैकी गती आली असताना कर्मचाऱ्यांचा संप म्हणजे,’लढाईच्या वेळी घोड्याला सर्दी’ अशी नगरपरिषदेची अस्वस्था होणार असल्याचे दिसत आहे.त्यामुळे पालिकेचे सगळे मुसळ केरात जाण्याचा धोका निर्माण झाला असल्याचे मानले जात आहे.

राज्यातील बहुतेक सर्वच शासकीय विभागातील कर्मचारी जुन्या पेन्शन योजना लागू करण्यासाठी आक्रमक झाले आहेत.विरोधी पक्षांनी देखील सरकारकडे तशी मागणी केली आहे.त्यामुळे सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची बैठक बोलावली होती.मंगळवारपासून शासकीय कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरु होणार असून तत्पूर्वी,सरकारकडून सकारात्मक निर्णयाची घोषणा होवू शकत असताना या मोर्चाची घोषणा झाल्याने सरकार यातून काय मार्ग काढणार याकडे या कर्मचाऱ्यांचे लक्ष लागून आहे.कोपरगाव नगरपरिषदेचे अधिकारी आणि कर्मचारी त्याला अपवाद नाही.त्यांनीही संपाचा शंखनाद केला आहे.

त्यांनी मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,”राज्यातील नगरपरिषद,नगरपंचायत,राज्य संवर्ग कर्मचारी,स्थानिक नगरपरिषद कर्मचारी व रोजंदारी कर्मचारी यांच्या विविध मागण्यांबाबत वेळोवेळी मुंबई येथील नगरपरिषद प्रशासन संचालनालय यांना निवेदन दिलेले आहेत.तसेच नगरविकास मंत्री यांचे सोबत बैठक होवूनही अद्याप पर्यंत नगरपरिषद,नगरपंचायत व संवर्ग कर्मचारी यांच्या सोबत जोडलेल्या मागण्या प्रलंबित असल्याचा त्यांचा दावा आहे.या मागण्या संदर्भात वारंवार पाठपुरावा करूनही त्याकडे शासनाने त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे.त्यामुळे त्यांचा सरकारवर अच्छा-खांसा राग आहे.परिणामी सर्व संघटनांनी एकत्रित येवून महाराष्ट्र राज्य नगरपालिका महासंघ तयार केलेला आहे.व संबंधित मागण्यांवर जो पर्यंत कोणताही निर्णय होत नाही तो पर्यंत प्रथम दि.१३ मार्च रोजी पहिल्या दिवशी काळ्या फिती लावून निषेध व्यक्त करण्यात येणार आहे.व त्याची दखल घेतली नाही तर दि.१४ मार्च रोजी पासून कोपरगांव नगरपरिषदेचे सर्व कर्मचारी बेमूदत संपावर जाणार असल्याचा दावा केला आहे.

दरम्यान त्याबाबतचे निवेदन आज सकाळी अकरा वाजता कोपरगाव नगरपरिषदेतील अधिकारी-कर्मचारी यांनी नगरपरिषदेचे उपमुख्याधिकारी ज्ञानेश्वर चाकणे यांना दिले आहे.

सदर निवेदन देताना अ.नगर जिल्हा संवर्ग संघटना कार्याध्यक्ष श्रीमती पल्लवी सूर्यवंशी,नगरपरिषद संवर्ग संघटनेचे उपाध्यक्ष तुषार नालकर,अखिल भारतीय सफाई कामगार संघटनेचे अध्यक्ष पवन हाडा तसेच नगरपरिषदेचे सर्व अधिकारी व कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close