आंदोलन
निळवंडे कालव्यांचे काम पुन्हा एकदा ठप्प,दुष्काळी भागात संताप

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
उत्तर नगर व नाशिक जिल्ह्यातील अवर्षण ग्रस्त असलेल्या १८२ गावांना वरदान ठरणाऱ्या निळवंडे प्रकल्पाच्या ५,१४४ कोटींच्या पंचम सुप्रमास राज्य सरकारने नुकतीच मंजुरी दिली असून त्याबाबत उत्तर नगर जिल्ह्यातील अनेक नेत्यांनी त्याचे श्रेय घेतले आहे.मात्र त्या बातम्यांची शाई वाळते न वाळते तोच अकोले तालुक्यात काही नागरिकांनी सदरचे काम पंधरा दिवसापासून बंद पाडले असून त्यावर प्रस्थापित नेत्यांनी व संबंधित अधिकाऱ्यांनी मौन पाळल्याबद्दल निळवंडे कालवा कृती समितीने संताप व्यक्त केला आहे.
“निळवंडे कालवा काम बंद बाबत माहिती मिळवली असता,अकोले तालुक्यात ऊर्ध्व प्रवरा डावा कालवा (निळवंडे) कि.मी.०२ ते २८ मध्ये काम प्रगतीपथावर असताना दि.१४ फेब्रुवारी रोजी विजय गणपत हासे या शेतकऱ्याचा कालव्यात ट्रॅक्टर पलटी होऊन मृत्यू झाला असून त्या बाबत तेथील काही नागरिकांनी दि.१५ फेब्रुवारी रोजी जलसंपदाचे वाहन अडवून त्यास घेराव घालून वाहन चालक यांना धक्काबुक्की केली असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.मात्र नेते आणि संबंधित अधिकारी यांनी याबाबत सोयीस्कर रित्या मौन पाळल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,”उत्तर नगर जिल्ह्यातील अवर्षणग्रस्त १८२ गावांना वरदान ठरणाऱ्या निळवंडे प्रकल्पाचा डावा उजव्या कालव्यासाठी ५२ वर्ष उलटली असून हा प्रकल्प ७.९३ कोटीवरून ५ हजार १७७.३८ कोटींवर गेला असल्याने आता जलसंपदा विभागाला कालव्यांच्या कामास कोणतीही वाढीव मुदत मिळणार नाही व न्यायालयाच्या पूर्व परवानगीशिवाय आता कोणतीही वाढीव आर्थिक तरतूद करता येणार नसल्याचे प्रतिपादन उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठाचे न्या.रवींद्र घुगे व न्या.संजय देशमुख यांच्या खंडपीठाने दि.१८ जानेवारी २०२३ रोजी अड.अजित काळे यांच्या मार्फत विक्रांत काले व पत्रकार नानासाहेब जवरे यांनी दाखल केलेल्या निळवंडे कालवा कृती समितीच्या याचिकेत (क्र.१३३/२०१६) नुकतेच बजावले होते.त्यामुळे आता वेळकाढूपणा न करता या विभागाला डावा कालवा मार्च अखेर तर उजवा कालवा हा जून अखेर पूर्ण करणे क्रमप्राप्त ठरले आहे.त्यावरही प्रस्थापित नेते अजूनही या कामात अडथळा आणण्याची एकही संधी सोडत नसल्याचे दिसत आहे.आता अकोले तालुक्यात किरकोळ कारणातून काम बंद केल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
याबाबत आमच्या प्रतिनिधीने संबंधित अधिकारी यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी अकोले तालुक्यात ऊर्ध्व प्रवरा डावा कालवा (निळवंडे) कि.मी.०२ ते २८ मध्ये काम प्रगतीपथावर असताना दि.१४ फेब्रुवारी रोजी विजय गणपत हासे या शेतकऱ्याचा कालव्यात ट्रॅक्टर पलटी होऊन मृत्यू झाला असून त्या बाबत तेथील काही नागरिकांनी दि.१५ फेब्रुवारी रोजी जलसंपदाचे वाहन अडवून त्यास घेराव घालून वाहन चालक यांना धक्काबुक्की केली असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.त्यांनी याबाबत संबंधित शेतकऱ्यास मोठी भरपाई मागितली असून त्या विरोधात आंदोलन सुरु केले असल्याची माहिती आहे व जो पर्यंत सदरची भरपाई मिळत नाही ती पर्यंत पण काम चालू होऊ देणार नाही अशी भूमिका घेतल्याची महिती प्राप्त झाली आहे.या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांनी संगमनेर येथील प्रांताधिकारी डॉ.शशिकांत मंगरुळे याना निवेदन देऊन सदर काम सुरु करण्यासाठी मदत मागितली असताना अद्याप त्यावर कार्यवाही केली नाही त्यामुळे दुष्काळी व प्रस्तावित लाभक्षेत्रातील १८२ गावातील शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.व जिल्ह्याचे पालक मंत्री,जिल्हाधिकारी,व प्रांताधिकारी आदींनी त्यात सहभाग नोंदवून सदरचे काम तातडीने सुरु करावे अशी मागणी निळवंडे कालवा कृती समितीचे संस्थापक नानासाहेब जवरे,अध्यक्ष रुपेंद्र काले,कार्याध्यक्ष-गंगाधर रहाणे,उपाध्यक्ष-एस.यू.उऱ्हे सर,व संजय गुंजाळ,सचिव-कैलास गव्हाणे,संघटक-संदेश देशमुख,सुधाकर शिंदे,वामनराव शिंदे,संघटक नानासाहेब गाढवे,उपाध्यक्ष संजय गुंजाळ,दत्तात्रय चौधरी,विठ्लराव देशमुख,संतोष तारगे,बाबासाहेब गव्हाणे,रंगनाथ गव्हाणे,भाऊसाहेब गव्हाणे,माधव गव्हाणे,रामनाथ ढमाले सर,तानाजी शिंदे,ज्ञानदेव शिंदे गुरुजी,सुधाकर शिंदे,विक्रम थोरात,राजेंद्र निर्मळ,भरत शेवाळे,कौसर सय्यद,दौलत दिघे,आप्पासाहेब कोल्हे,अड.योगेश खालकर,सचिन मोमले,महेश लहारे,रावसाहेब मासाळ,नवनाथ शिरोळे,सोमनाथ दरंदले,वाल्मिक नेहे,नामदेव दिघे,संतोष गाढवे,अशोक गांडूळे,शरद गोर्डे,शिवाजी जाधव,दत्तात्रय आहेर,शिवनाथ आहेर,गोरक्षनाथ शिंदे,दत्तात्रय थोरात,वसंत थोरात,रावसाहेब सु.थोरात,अशोक गाढे,ज्ञानदेव पा.हारदे,बाळासाहेब चि.रहाणे,बाळासाहेब सोनवणे,आबासाहेब सोनवणे,नरहरी पाचोरे,रामनाथ पाडेकर,दगडू रहाणे,भाऊसाहेब चव्हाण,वाल्मिक नेहे,अलिमभाई सय्यद,शब्बीरभाई सय्यद आदींनीं केली आहे.