आंदोलन
नव्वद कोटी गेले परत,तळेगाव मार्गे संगमनेर रस्त्याची लागली वाट,ग्रामस्थ हैराण
न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
उत्तर भारतीयांना पुणे आणि दक्षिण भारताला जोडण्यात अहंम भूमिका निभावणाऱ्या तळेगाव मार्गे कोपरगाव संगमनेर रस्त्याचा आशियायी विकास बँकेचा सुमारे ९० कोटींचा निधी मंजूर होऊनही त्याची स्थानिक राजकीय नेत्यांनी वाट लावली असून त्यामुळे या रस्ता मोठ्या प्रमाणावर नादुरुस्त झाला असून सदर रस्त्याचे काम त्वरित चालू करा अन्यथा जवळके आणि परिसरातील नागरिक आंदोलन करतील असा इशारा जवळके येथील जनमंगल ग्रामविकास संस्थेचे कार्यकर्ते गोरक्षनाथ शिंदे आणि कार्यकर्त्यांनी दिला आहे.
आशियायी विकास बँकेने या रस्त्यासाठी राज्याचा ३० टक्के हिस्सा व या बँकेचा ७० टक्के निधी देण्याच्या बोलीवर तळेगाव मार्गे कोपरगाव तालुक्यातील झगडेफाटा ते वडगाव पान फाटा या ३० कि.मी.रस्त्यासाठी सुमारे ९० कोटी रुपयांचा निधी सन-२०१८ साली मंजूर केला होता.सदर मंजुरीत कायम खराब होणारा सखल भागातील रस्त्याचे काँक्रिटीकरण व अनेक ओढे,नाले,आणि रस्त्यावर मोठे पूल,प्रत्येक गावात चार पदरी रुंद रस्ता आदीं कामांचा समावेश होता.सदर रस्त्याची रुंदी सिन्नर शिर्डी रस्त्याच्या रुंदी इतकी ऐसपैस होती.त्यामुळे गर्दीच्या ठीकाणी अपघात कमी होण्यास मदत मिळणार होती.मात्र संगमनेर,राहाता आदी तालुक्यात मुख्यमंत्री पदाचे दावेदार केवळ पोकळ दावे सांगायलाच असल्याचे निष्पन्न झाले आहे.त्याना शेजारच्या तालुक्यातील माजी मंत्री छगन भुजबळ मागावून येऊन भारी पडले असल्याचे दिसून आले आहे.सदरचा निधी परत गेल्याने सगळे मुसळ केरात गेले आहे.
आशिया व अतिपूर्वेकडील देशांच्या आयोगाने (इकॅफे) पुरस्कारिलेली ही बँक डिसेंबर १९६६ मध्ये कार्यान्वित झाली.इकॅफे प्रदेशामधील व बाहेरील मिळून ४४ देश व प्रदेश या बॅंकेचे सदस्य आहेत (३० एप्रिल १९७४).या देशांतील खाजगी व सरकारी भांडवलगुंतवणुकीस प्रोत्साहन देणे,त्यांच्या विदेश व्यापाराची,विशेषतः आंतरप्रदेशीय व्यापाराची,वाढ व्हावी म्हणून आर्थिक व तांत्रिक साहाय्य पुरविणे,कृषिउद्योग आणि सार्वजनिक प्रशासन विषयक राष्ट्रीय वा प्रदेशीय पातळीवर कार्य करीत असलेल्या संस्थांच्या वाढीसाठी किंवा पायाभूत सुविधा निर्मिती,नवीन संस्थांच्या स्थापनेसाठी तांत्रिक साहाय्य देणे आणि सदस्य-देशांतील साधनसामग्रीचा अधिक चांगल्या प्रकारे उपयोग करून आर्थिक विकासास हातभार लावणे ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी बँकेची स्थापना झाली.सदर बँकेने राज्याचा ३० टक्के हिस्सा व या बँकेचा ७० टक्के निधी देण्याच्या बोलीवर तळेगाव मार्गे कोपरगाव तालुक्यातील झगडेफाटा ते वडगाव पान फाटा या ३० कि.मी.रस्त्यासाठी सुमारे ९० कोटी रुपयांचा निधी सन-२०१८ साली मंजूर केला होता.सदर मंजुरीत कायम खराब होणारा सखल भागातील रस्त्याचे काँक्रिटीकरण व अनेक ओढे,नाले,आणि रस्त्यावर मोठे पूल आदींचा समावेश होता.सदर रस्त्याची रुंदी सिन्नर शिर्डी रस्त्याच्या रुंदी इतकी ऐसपैस होती.प्रत्येक गावात चार पदरी रुंद रस्ता होणार होता.त्यामुळे गर्दीच्या ठीकाणी अपघात कमी होण्यास मदत मिळणार होती.या शिवाय या रस्त्यामुळे उत्तर भारतीयांना दक्षिण भारतात आणि पुण्यास जाण्यासाठी हा रस्ता नाशिक-पुणे या राष्ट्रीय महामार्गास जोडणार होते.तर कोपरगावच्या बाजार हा जुना मुंबई-नागपूर या रस्त्यास जोडला जाणार होता.त्यामुळे हा रस्ता मोठा वेळ आणि पैसा वाचविणारा ठरणार होता.मात्र हा रस्ता दुष्काळी भागातून जात असल्याने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले होते.व राज्याचा हिस्सा भरण्यास कोणाही नेत्याने पुढाकार घेतला नाही त्यामुळे या रस्त्याची वाट लागली आहे.वर्तमानात या रस्त्यावरून जाणे म्हणजे आपल्या जीवाची बाजी लावण्यासारखे ठरत आहे.अनेक वर्ष शिर्डीची अवजड व अतिरिक्त वाहतूक (बाह्य वळण रस्ता त्यावेळी तयार नसल्याने) या मार्गाने होत असल्याने या रस्त्याची वाट लागली होती.आता कोणीही नेता या रस्त्याकडे पहाण्यास तयार नाही.त्यामुळे झगडे फाटा ते संगमनेर हद्द म्हणजे भागवतवाडी पर्यंत हा रस्ता मृत्यूची खाई ठरला आहे.
पोहेगाव ग्रामपंचायत हद्दीत गणेश मंदिराजवळ व पोहेगाव येथील माजी आ.स्व.के.बी.रोहमारे यांची वस्ती,बहादराबाद,शहापूर,जवळके,धोंडेवाडी,रांजणगाव देशमुख आदी ठिकाणी अवजड वहाने अपघात ग्रस्त होऊन अनेकांना आपले जीवित व वित्तीय हानी सोसावी लागली आहे.दैनंदिन वापरासाठी या नजीकची खेडी या रस्त्यामुळे बेजार झाली आहे.त्याना आपला शेतीमाल अन्यत्र नेणे हि मोठी शिक्षा ठरत आहे.मात्र कोणाही नेत्याने या रस्त्याच्या ३० टक्के राज्याच्या वाट्याच्या निधीसाठी प्रयत्न केला नाही त्यामुळे सदरचा ९० कोटी रुपयांचा निधी परत गेला आहे.त्यामुळे या रस्त्यांनजीक असलेले व्यापारी,नागरी वस्ती,घरे आदी परिसरात नागरिकांना वावरणे कठीण बनले आहे.घरात धुळीचे लोट मावत नाही त्यामुळे संताप व्यक्त होत आहे.याला जबाबदार कोण असा सवाल नागरिकानी केला आहे.वर्तमानात गत हप्त्यात या रस्त्यासाठी सुमारे आठ कोटींच्या मंजूर निधीची निविदा निघाली असून ती रक्कम अत्यंत तोकडी असून त्यातून सखल भागात रस्ता पुन्हा पूर्ववत नादुरुस्त होण्यास वेळ लागणार नाही.त्यामुळे सदर ९० कोटींचा निधी आ.आशुतोष काळे यांनी परत मिळवावा अशी मागणी केली आहे.
सदर मागणी जनमंगल ग्रामविकास संस्थेचे अध्यक्ष उत्तम थोरात,गोरक्षनाथ शिंदे,गंगाधर रहाणे,बाळासाहेब रहाणे,बहादरपूरचे सरपंच गोपीनाथ रहाणे,उपसरपंच रामनाथ पाडेकर,माजी सरपंच माणिक दिघे,विश्वनाथ थोरात,आप्पासाहेब कोल्हे,रावसाहेब मासाळ,अड्.योगेश खालकर,नानासाहेब शेंडगे,माजी सरपंच वसंत थोरात,बंडोपंत थोरात,डी.के.थोरात,जवळके ग्रामपंचायतीचे उपसरपंच विजय थोरात,ग्रामपंचायत सदस्य प्रकाश थोरात,बंडोपंत देशमुख,रावसाहेब सु.थोरात,वाल्मिक नेहे,नानासाहेब नेहे,बाळासाहेब दरेकर,शिवाजी रोहमारे,सचिन औताडे,नरहरी पाचोरे,माजी सरपंच गणपत पाचोरे,रामनाथ घारे,शिवाजी सदाफळ,नवनाथ थोरात,महेश थोरात,रामनाथ थोरात,विश्वनाथ शिंदे,आदींनी केली आहे.