आंदोलन
‘पठाण’ हा चित्रपट प्रदर्शित न करण्याची आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेची मागणी

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगांव शहरातील सुदेश या चित्रपटगृहात,’पठाण’ हिंदी चित्रपट प्रसारीत करु नये अशी मागणी आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद, राष्ट्रीय बजरंग दल कार्यकर्त्यांनी २६ डिसेंबर रोजी ‘सुदेश’ चित्रपट व्यवस्थापक यांना निवेदन देऊन नुकतीच केली आहे.त्यामुळे कोपरगाव शहरात उलतसुलतच चर्चेला उधाण आले आहे.
“शाहरुख खान यांच्या ‘पठाण’या चित्रपटात वादग्रस्त प्रसंग असून त्यामुळे हिंदूच्या भावना दुखावत आहेत.सिनेमा तील बेशरम या गाण्यातुन भगव्या रंगाचा अपमान होत आहे.शाहरुख खान या अभिनेत्याने या आधीही अनेकदा हिंदूच्या भावना दुखावल्या आहेत.तरी सदर चित्रपट कोपरगावात प्रदर्शित करू नये”-कृष्णा दळवी,बजरंग दल,कोपरगाव.
तब्बल चार वर्ष ब्रेक घेतल्यानंतर शाहरुख खान ‘पठाण’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.पाच महिन्यापूर्वी ‘पठाण’ चित्रपटाचा टिझर प्रदर्शित झाला होता.या व्हिडीओवरुन चित्रपटामध्ये शाहरुखसह दीपिका पदुकोण,जॉन अब्राहम असे कलाकार दिसणार असून टिझरमधून ‘पठाण’ हा अॅक्शनपट असल्याचे समजते.जून महिन्यात शाहरुखचा लूक असलेले मोशन पोस्टर शेअर केला गेला.त्यानंतर महिन्याभराच्या आत दीपिका पदुकोणचे पात्राचे पोस्टर सोशल मीडियावर पोस्ट केले गेले.आज जॉन अब्राहमचे मोशन पोस्टर निर्मात्यांनी प्रसिद्ध केले.मोशन पोस्टरनंतर आता काही दिवसात ‘पठाण’चा ट्रेलर प्रदर्शित झाला असून यावर विवाद निर्माण झाला आहे.कोपरगाव तालुका त्याला अपवाद नाही.येथेही हा वाद हिंदुत्ववादी संघटनांनी निर्माण केला आहे.
त्यांनी नुकतेच निवेदन दिले असून यात त्यांनी म्हटलं आहे की,”या चित्रपटात वादग्रस्त प्रसंग असून त्यामुळे हिंदूच्या भावना दुखावत आहेत.सिनेमा तील बेशरम या गाण्यातुन भगव्या रंगाचा अपमान होत आहे.शाहरुख खान या अभिनेत्याने या आधीही अनेकदा हिंदूच्या भावना दुखावल्या आहेत.तरी सदर चित्रपट प्रदर्शित न करण्याची मागणी संघटनेने ‘सुदेश’ चित्रपट ग्रहांच्या व्यवस्थापकास निवेदन देऊन केली आहे.
सदर प्रसंगी कृष्णा दळवी,शिवप्रसाद बढे,रोहन जोशी,केदार चोपडे,राकेश वाघ,सुरेश जाधव,सोनु सूर्यवंशी,विशाल बिडवे,ओमकार देवकर,नारायण कहार,विकी गाडेकर,दिनेश खडांगळे,प्रकाश आढाव,सोनू देवकर आदी उपस्थित होते.याबाबत कृष्णा दळवी यांनी आपण तहसीलदार आणि पोलीस ठाणे आदींना निवेदन देणार असल्याची माहिती आपमच्या प्रतिनिधीस दिली आहे.