आंदोलन
साखर कारखान्यांची अवैध ऊस वाहतूक बंद करावी-मागणी

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
गेल्या काही वर्षापासून साखर कारखान्यांनीं आपल्या आर्थिक फायद्यासाठी ट्रक ऐवजी ट्रॅक्टर,डबल ट्रॉली,जुगाड आदींच्या सहाय्याने ऊस वाहतूकीचे प्रमाण अवैधरित्या मोठ्या प्रमाणावर वाढवलेले आहे त्यामुळे ट्रक वाहतूक दारांनी सरकारला कर भरूनही त्यांचे अतोनात नुकसान होत आहे.या विरोधात परिवहन विभागाने कारवाई करावी अशी महत्वपूर्ण मागणी कोपरगाव तालुका मोटार वाहन चालक-मालक संघटनेचे तालुकाध्यक्ष आयुब कच्छी यांनी केली आहे.त्यामुळे अवैध वाहतुकदारांत खळबळ उडाली आहे.
दरम्यान या प्रकरणी श्रीरामपूर परिवहन अधिकाऱ्यानी या बाबत ऊस कारखान्यांना एक पत्र काढले असून हि अवैध ऊस वाहतूक बंद करण्याचे निर्देश काढले असल्याची विश्वसनीय माहिती प्राप्त झाली आहे.त्यामुळे अवैध वाहतूक दारांत खळबळ उडाली आहे.आता साखर कारखानदार काय भूमिका घेतात याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे.
साधारणत: ट्रक किंवा ट्रॅक्टरमधून ऊसाची वाहतूक केली जाते.पण अनेक ठिकाणी बैलगाडीही वापरली जाते.परंतु बैलगाडीतून क्षमतेपेक्षा जास्त ऊसाची वाहतूक केल्याने अपघातांनाही निमंत्रण मिळतं.याशिवाय बैलांना होणारा त्रास वेगळेचा.बऱ्याच घटनांमध्ये अशी वाहतूक करण्यासाठी बैलगाडीला जुंपणाऱ्या बैलांचा जीव गेल्याचं पाहायला मिळालं आहे.त्यामुळे नसतं धाडस आणि पैजांमुळे मुक्या प्राण्यांना त्रास होतो किंवा त्यांचा नाहक बळी जातो.अलीकडील काळात तर कहर झाला असून ट्रक ऐवजी ट्रॅक्टरला दोन-दोन जुगाड जोडून उसाची वाहतूक केली जात असून प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरु आहे.व परिवहन विभागाने हाताची घडी तोंडावर पट्टी बांधून घेतली आहे.त्यामुळे अपघात वाढल्याचे चित्र दिसत आहे.परिवहन विभाग व ऊस साखर कारखाने आदीनी नागरिकांच्या जिवाशी खेळणे थांबवावे अशी मागणी ट्रक मालक-चालक वहातूकदारांनी श्रीरामपूर येथील परिवहन अधिकाऱ्यांकडे नुकतीच एका निवेदनाद्वारे केली आहे.
त्यांनी आपल्या निवेदनात म्हटलं आहे की,”गेल्या काही वर्षापासून साखर कारखान्यांना ट्रक ऐवजी ट्रॅक्टर,डबल ट्रॉलीने ऊस वाहतूकीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहे.’मोटार व्हेईकल अँक्ट’ नुसार ट्रॅक्टर हे वाहन नसून ते शेतकऱ्यांच्या सोयीसाठी बनविलेले शेत औजार आहे.त्याचा वापर फक्त शेतीसाठी करावा.त्यांना पब्लिक रोड आणू नये असे प्रावधान आहे.परंतू गेल्या काही वर्षात चाळीसगाव ‘बीड’ नांदेड इत्यादी भागातील शेतकरी साखर कारखान्यांना डबल टॉली-टॅक्टरने अवैध ऊस वाहतूक करतात.
साखर कारखाने सुद्धा ट्रकवाल्यांसाठी ऊस वाहतूक अनुदान आपल्याला मिळावे म्हणून ट्रक ऐवजी डबल टॅक्टर टॉलीचे प्रति टन पर किलोमीटर अवैध करार करताना आढळत आहे.त्यांमुळे शासनाला मोठ्या प्रमाणावर महसूल देणारा ट्रक उद्योग व व्यावसाईक संपत चालले आहे.त्याला साखर कारखाने व परिवहन विभाग जबाबदार आहे.मोठ्या प्रमाणात टेपचा आवाज ‘अप्रशिक्षित चालक’मागील पुढील वाहनाकडे जाणीव पूर्वेक दुर्लक्ष यामुळे अपघाताचे प्रमाण वाढून अनेक निरपराध सर्वसामान्य नागरिकांना मृत्यू तसेच काहींना कायमचे अपंगत्व आलेले आहे.
नुकतीच साईबाबा चौफुली,कोपरगाव शहरात समता पतसंस्थेसमोर आदी ठिकाणी रस्त्याच्या मधोमध ऊस ट्रॉली क्षमतेपेक्षा जास्त माल भरल्यामुळे तिचे चाक तुटून पल्टी झाली सुदैवाने कोणतीही जीवीत हानी झाली नाही.या रस्त्यावर शाळा ‘महाविद्यालय,अभियांत्रिकी महाविद्यालय’ साईमंदीर तसेच दिल्ली-बंगलोर राष्ट्रीय महामार्ग आहे.कोपरगाव ट्रक वाहतूकदार संघटनेतर्फे श्रीरामपूर परिवहन विभागाला दि.२८ सप्टेंबर रोजी निवेदन दिलेले आहे तरी देखील परिवहन खाते साखर सम्राटांच्या दबावाखाली कार्यवाही करीत नाही.याबाबत या संघटनाकडून सरकारला वेळीवेळी निवेदन दिलेले आहे.
तरी श्रीरामपूर वहातून नियंत्रकानी अवैध ओव्हरलोड,डबल ट्रॅक्टर-ट्रॉलीवर कार्यवाई करून बंदी न आणल्यास आम्हाला रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल याला परिवहन विभाग जबाबदार राहिल असा इशारा कोपरगाव तालुका मोटार वाहन चालक-मालक संघटनेचे तालुकाध्यक्ष आयुब कच्छी यांनी दिला आहे.
दरम्यान या प्रकरणी श्रीरामपूर परिवहन अधिकाऱ्यानी या बाबत ऊस कारखान्यांना एक पत्र काढले असून हि अवैध ऊस वाहतूक बंद करण्याचे निर्देश काढले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.त्यामुळे अवैध वाहतूक दारांत खळबळ उडाली आहे.