आंदोलन
राष्ट्रीय महामार्गावर नागरिकांचे बळी,मनसेचे अनोखे आंदोलन

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव-अ.नगर हा महामार्ग हा भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग झालेला असताना त्या कडे प्राधिकरणाने अक्षम्य दुर्लक्ष केले आहे परिणामस्वरूप या रस्त्यावर खड्डे पडून त्यावर अनेक नागरिकांचे बळी गेले आहे.त्याकडे लक्ष वेधण्यासाठी कोपरगाव शहर मनसेने आज सकाळी या रस्त्यावर यमराज आणि चित्रगुप्त नाटिका सादर करून प्राधिकरणाचे लक्ष वेधून घेतले आहे.त्यामुळे तालुक्यात याबाबत उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे.
कोपरगाव-अ.नगर हा महामार्ग काही वर्षांपूर्वी राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने राष्ट्रीय महामार्गाकडे वर्ग करण्यात आला आहे.मात्र यावर कायम खड्ड्यांचे साम्राज्य नांदत असून अनेक नागरिकांचे बळी गेले आहे.आजही हि संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे.मात्र यावर ना राजकीय नेत्यांनी उपाय शोधला ना त्यावर कारवाई झाली.त्यामुळे राजकीय नेत्याविरुद्ध व प्राधिकरणाविरुद्ध नागरिकांचा आक्रोश वाढत आहे.हा मार्ग साक्षात मृत्युचा सापळा ठरला आहे म्हणून त्याकडे संबंधित विभागाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज अनोखे आंदोलन करून लक्ष वेधून घेतले आहे.
राष्ट्रीय महामार्ग (रा.म.) हे भारतातील मुख्य रस्ते आहेत.राष्ट्रीय महामार्गांचे जाळे भारतभर ६६,५९० कि.मी.पसरले आहे.भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण ही भारत सरकारच्या नवव्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत १९९५ साली स्थापन केलेली एक संस्था आहे.ही राष्ट्रीय महामार्गांच्या विकास,बांधकाम तसेच देखभालीसाठी जबाबदार आहे.भारताच्या एकूण रस्त्यांच्या फक्त २ टक्के रस्ते रा.म.आहेत,पण एकूण रस्ता वाहतुकीच्या ४० टक्के वाहतुकीसाठी ते कारणीभुत आहेत.कोपरगाव-अ.नगर हा महामार्ग काही वर्षांपूर्वी राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने राष्ट्रीय महामार्गाकडे वर्ग करण्यात आला आहे.मात्र यावर कायम खड्ड्यांचे साम्राज्य नांदत असून अनेक नागरिकांचे बळी गेले आहे.आजही हि संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे.मात्र यावर ना राजकीय नेत्यांनी जालीम उपाय शोधला ना त्यावर कारवाई झाली.त्यामुळे राजकीय नेत्याविरुद्ध व प्राधिकरणाविरुद्ध नागरिकांचा आक्रोश वाढत आहे.हा मार्ग साक्षात मृत्युचा सापळा ठरला आहे म्हणून त्याकडे संबंधित विभागाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष अनिल गाडे,कार्यकर्ते बापू काकडे,सुरेश सुपेकर,संजय जाधव,नवनाथ मोहिते,राजेंद्र जाधव,अजिंक्य काकडे,अनिल सुपेकर,अजिंक्य काकडे,सचिन सुपेकर,सुनील रोशन पवार,सचिन गरकल सुनिल कौले,अनिल शहा आदींनी सहभाग घेऊन नाटिका वटवली असून त्याकडे प्राधिकरण व प्रवासी, नागरिकांचे लक्ष वेधून घेतले आहे.यावर दाखल न घेतल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा त्यांनी शेवटी दिला आहे.
या आंदोलनाबाबत सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे.या आधी माहिती अधिकार संजय काळे यांनी राष्ट्रीय रस्ते विकास प्राधिकारणाविरुद्ध सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.त्यामुळे हा प्रश्न ऐरणीवर आला आहे.आता प्राधिकरण व राजकीय नेते काय भूमिका घेतात याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे.