आंदोलन
कोपरगावात…या अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांचा संप सुरु

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
काल मध्यरात्रीपासून देशभरातले वीज कर्मचारी संपावर जाणार असल्याची घोषणा केली होती.त्यात वीज कंपन्यांचं खासगीकरण आणि विभाजनाच्या विरोधात हा संप पुकारण्यात आला होता.वीज कर्मचारी,अधिकारी,अभियंते आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या ३९ संघटना संपावर ठाम असून कोपरगाव शहर व तालुक्यातील संघटना या संपात सहभागी झाल्या आहेत.
काल मध्यरात्रीपासून देशभरातले वीज कर्मचारी संपावर जाणार असल्याची घोषणा केली होती.त्यात वीज कंपन्यांचं खासगीकरण आणि विभाजनाच्या विरोधात हा संप पुकारण्यात आला होता.वीज कर्मचारी,अधिकारी,अभियंते आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या ३९ संघटना संपावर ठाम आहेत.जवळपास ८५ हजार कर्मचाऱ्यांनी ही संपाची हाक दिली असून राज्यातल्या प्रमुख शहरांमधील वीज कंपनीच्या कार्यालयासमोर कर्मचारी सहभागही घेतला आहे.दरम्यान वीज कर्मचाऱ्यांना संपावर जाण्यास राज्य सरकारनं मनाई केली आहे.संपावर गेल्यास मेस्मा अंतर्गत कारवाई करण्याचा इशारा सरकारनं दिला असतानाही कोपरगाव शहरातील महावितरण कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांनी या संप केला असून कोपरगाव शहरात त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
त्यांनी केलेल्या मागणीत,”सरकारने सुरु केलेले खाजगिकरणास विरोध,केंद्र सरकारने विद्युत (संशोधन) बिल २०२१ या सरकारच्या धोरणाविरुद्ध,जलविद्युत केंद्र खाजगी उद्योजकांना देणे,तिन्ही कंपन्यांचे रिक्त पदे भरण्यास होत असलेली दिरंगाई.तिन्ही कंपन्यांचे अधिकारी,कर्मचारी,अभियंते,अधीकांऱ्यांचा बदल्यांचा एकतर्फी निर्णय,तिन्ही कंपन्यांच्या अनावश्यक एकतर्फी भरतीचा निर्णय व त्यातील राजकीय हस्तक्षेप,व कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेची साठ वर्षापर्यंत सेवा शाश्वती आदी मागण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले आहे.त्याला विद्युत कर्मचाऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे.