जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
आंदोलन

…या पुतळ्याचे उपोषण सुटले,कोडे मात्र पडले !

न्यूजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
  
   कोपरगाव शहरातील आंदोलनकर्ते अर्जुन मरसाळे,नितीन साबळे,फकीरा चंदनशिव,रवींद्र डोलारे,शरद त्रिभुवन यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे पूर्णाकृती पुतळ्याचे वाजत गाजत उद्घाटन व्हावे यासाठी उपोषण केले होते आज दुसऱ्या दिवशी ते स्थानिक पदाधिकारी तथा नगराध्यक्ष पराग संघान यांचे शब्दाखातर संपून टाकून समाज बांधवांना कोड्यात टाकले असल्याचे मानले जात आहे.याबाबत कोपरगाव शहर आणि तालुक्यात उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे पूर्णाकृती पुतळ्याचे वाजत गाजत उद्घाटन व्हावे यासाठी उपोषण केले होते त्याची सांगता आज दुपारी संपन्न झाली आहे.

“कोपरगाव शहरात माजी मंत्री शंकरराव कोल्हे व शंकरराव काळे यांच्या पुढाकाराने व कै.वि.तू बागुल,कै.मच्छीन्द्र राक्षे आदींच्या परिश्रमाने अण्णाभाऊ साठे यांचा अर्धाकृती पुतळा बसवण्यात आला तथापि त्या नंतर,’अर्धाकृती ते पूर्णाकृती पुतळा’ या प्रवासात तालुक्याच्या प्रस्थापित नेत्यांनी मताचे गणित डोळ्यासमोर ठेऊन व तत्कालीन नगराध्यक्ष विजय वहाडणे यांना या कामाचे श्रेय मिळू नये यासाठी वारंवार समाज बांधवांची दिशाभूल केली होती.आजही शहरातील नागरिकांना याची प्रचिती येत असताना दिसून येत असल्याचे शहरात जोरदार चर्चा सुरू आहे.

   कोपरगाव शहरातील डॉ.अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा गेली अनेक दशके वादग्रस्त राहिला (नाही ठेवला) आहे.त्याला तत्कालीन नगराध्यक्ष विजय वहाडणे आणि आ.आशुतोष काळे यांनी मुहूर्त काढून त्याला बारा वर्षे छत्रपती संभाजीनगर येथील गोदामातून बाहेर काढले होते.त्याची साईबाबा कॉर्नर येथून मोठी मिरवणूक काढून स्थानापन्न केले होते.मात्र दिनांक 06 एप्रिल 2022 साली राज्याचे उपमुख्यमंत्री स्व.अजित पवार हे कोपरगाव शहरातील कोपरगाव पंचायत समिती,कोपरगाव शहर पोलीस ठाणे,राज्य परिवहन मंडळाचे कोपरगाव बस आगाराचे उदघाटनासाठी आले होते त्यावेळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे पूर्णाकृती पुतळ्याचे उद्घाटन करण्याचे ठरले होते.मात्र आज जे श्रेय घेण्यासाठी आटापीटा करत आहे.त्यांनी आपल्या हस्तकांना हाताशी धरून त्यावेळी तो बेत रद्दबदल ठरवून कार्यक्रम हाणून पाडला होता.त्याला उणेपुरे चार वर्षे झाली आहेत.ही घटना अनेकाना आठवत असेल.त्यावेळी उपमुख्यमंत्री येणार होते तर काल आ.काळे यांनी मुख्यमंत्री येण्याचे आश्वासन देऊनही त्याला ठोकर मारून स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या शब्दाखातर सदर आंदोलन कार्यकम रद्द केल्याने अनेकाना हे कोडे सुटलेले नाही.त्यावेळी गेली दोन दिवसापासून हा विषय ऐरणीवर आणला गेला आहे.काही कार्यकर्त्यांनी आंदोलन करून आज ते संपूनही टाकले असल्याची माहिती हाती आली आहे.

कोपरगाव शहरातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे पुतळ्याचे उपमुख्यमंत्री स्व.अजित पवार यांचे हस्ते लोकार्पण व्हावे यासाठी आ.आशुतोष काळे यांनी एप्रिल 2022 मध्ये भेट घेतली होती तो क्षण.

दरम्यान याबाबत आमच्या प्रतिनिधीने आंदोलनकर्ते फकिरा चंदनशिव याच्याशी संपर्क केला असता त्यांनी नगराध्यक्ष पराग संधान यांनी मुख्यमंत्री यांना आणण्याचा प्रयत्न करून न जमल्यास आ.आशुतोष काळे आणि आ.विवेक कोल्हे मिळून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळ्याचे लोकार्पण करू असे आश्वासन दिले असल्याच्या घटनेस दुजोरा दिला आहे.मात्र आ.काळे यांनी काल आंदोलनस्थळी भेट देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आणण्याचे आश्वासनास दुजोरा दिला नाही.

   कोपरगाव येथे गेल्या सोळा वर्षा पासून अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णकृती पुतळा व्हावा यासाठी समाजातील विविध संघटना नेते यांनी विविध पद्धतीने अर्ज,विनंत्या आंदोलने केली मागील साडे पाच वर्षांपूर्वी नियोजित जागेवर पुतळा बसवण्यात आला होता.मात्र कोपरगाव नगरपालिकेचे निवडणूकपूर्व विसर्जन झाल्याने पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण न करता पुतळा झाकून ठेवला होता.त्याबाबत समाज बांधवांचा उद्रेक होऊन 2022 साली एक पति पत्नीनी या धरसोड धोरणाच्या विरुद्ध जाऊन बंड पुकारून खुला केला होता त्याला बरीच वर्षे गेले तरी पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण केले नाही.कोपरगाव तालुक्यातील राजकीय नेत्यांनी निवडणुकीत समाजाच्या मतांवर डोळा ठेऊन समाज बांधवांची दिशाभूल केली गेली.राजकीय नेत्यांनी जाणीव पूर्वक समाज बांधवांमध्ये वाद तेवत ठेऊन पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण होऊ दिले नाही असा मातंग समाजातील कार्यकर्त्यांचा आरोप होता आजही तो खरा होताना दिसत आहे.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे पुतळ्याचे मोठे राजकारण झाल्याने संतापलेल्या महिलेने आणि तिच्या पतीने बंड करून लोकार्पण करून प्रस्थापिताना इशारा दिला होता तो क्षण.

दरम्यान आमच्या प्रतिनिधीने याबाबत ज्येष्ठ कार्यकर्ते विनोद राक्षे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी दिनांक 20 ऑगस्ट 2026 च्या लोकार्पण सोहळ्यास दुजोरा दिला आहे.त्यासाठी आ.काळे व आ.कोल्हे आदिना घेऊन मुख्यमंत्री यांना निमंत्रण देणार आहे.ते न आल्यास स्थानिक आ.आशुतोष काळे व आ.विवेक कोल्हे यांचे हस्ते हा लोकार्पण सोहळा संपन्न करणार असल्याचे सांगितले आहे.सन 2022 साली उपमुख्यमंत्री स्व.अजित पवार यांचे हस्ते लोकार्पण का केलं नाही यावर त्यांनी नियोजित दौऱ्यात हा कार्यक्रम नव्हता.ऐनवेळी सांगितल्याने अशा महामानवाचा कार्यक्रम ऐनवेळी घेणे उचित नव्हते म्हणून रद्द केला असल्याचे सांगितले आहे.

  “कोपरगाव शहरात माजी मंत्री शंकरराव कोल्हे व शंकरराव काळे यांच्या पुढाकाराने व कै.वि.तू बागुल,कै.मच्छीन्द्र राक्षे आदींच्या परिश्रमाने अण्णाभाऊ साठे यांचा अर्धाकृती पुतळा बसवण्यात आला तथापि त्या नंतर,’अर्धाकृती ते पूर्णाकृती पुतळा’ या प्रवासात तालुक्याच्या प्रस्थापित नेत्यांनी मताचे गणित डोळ्यासमोर ठेऊन व तत्कालीन नगराध्यक्ष विजय वहाडणे यांना या कामाचे श्रेय मिळू नये यासाठी वारंवार समाज बांधवांची दिशाभूल केली असून या प्रस्तापित नेत्यांमुळेच या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण लांबले असल्याचा आरोप ॲड.नितीन पोळ यांनी दिनांक 15 सप्टेंबर 2023 रोजी जाहीरपणे केला होता.आज तो दुर्दैवाने खरा ठरताना दिसून येत असल्याचे चर्चा शहरात जोर धरत आहे.

कोपरगाव तालुक्याच्या राजकारणाचा बळी ठरलेला हाच तो लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा.

  याबाबत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे वंशज सचिन साठे यांनी जाहीर प्रतिक्रिया दिली होती त्यात त्यांनी म्हटले होते की,”राजकारण्यांच्या नादी लागून आमचा झोपडीतील समाजबांधव अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा बंदिस्त किती दिवस ठेवणार,सदर विरोधी गटाच्या लोकांनी मंडपवाल्यांना विरोध करून हा कार्यक्रम हाणून पाडला आहे.त्यांनी आगामी काळात असा कार्यक्रम ठेवला तर त्याला तसेच उत्तर मिळू शकते त्यामुळे आगामी काळात आपण व आपले कोणी वंशज कधीही कोपरगाव शहरात येणार नाही”अशी घोषणा केली होती त्याचे स्मरण या निमित्ताने पुन्हा एकदा झाले आहे.त्यापासून ही मंडळी काही बोध घेणार आहे का हा खरा प्रश्न आहे.

  दरम्यान आज हे उपोषण सोडविण्यासाठी कोपरगाव नगरपरिषदेचे नगराध्यक्ष पराग संधान,माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे,विनोद राक्षे,राजेंद्र बागुल,विजय वाजे,प्रशांत कडू,आकाश वाजे,कैलास मंजुळ,फिरोज पठाण,दत्तू पगारे,सोमनाथ म्हस्के,रोहित कनगरे,शरद त्रिभुवन,उमेश धुमाळ,सतीश रानोडे,जयवंत मरसाळे आदी सह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
  

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close