आंदोलन
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या-…यांची मागणी

न्यूजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
परतीच्या पावसाने पूर्व भागासह कोपरगाव तालुक्यात झालेल्या परतीच्या पावसाने खरीप पिकांना मोठा फटाका बसला आहे.या पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.शेत शिवारामध्ये रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी ओसंडून वाहत होते.शेतीसह वाहतुकीवरही याचा विपरीत परिणाम झाला.यामुळे शेती नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे यांनी तहसीलदार महेश सावंत यांना निवेदन देऊन केली आहे.

“वर्तमानात पावसाने नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान केले आहे.पशुधनाचे नुकसान झाले आहे.अद्याप पाऊस थांबण्याची चिन्हे नाही त्यामुळे भाजप युती सरकारने आपल्या जाहीरनाम्यात सरसकट कर्जमाफिचे आश्वासन दिलेले आहे ते पाळण्याची वेळ आली आहे.ते न पाळल्यास शेतकऱ्यांत मोठा असंतोष पसरेल”- संदीप वर्पे,कार्याध्यक्ष,राष्ट्रवादी काँग्रेस,शरद पवार गट.
कोपरगाव तालुक्यामध्ये अतिवृष्टी व ढगफुटी सदृश्य वादळ वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांची दैना उडाली असून सोयाबीन,मका,ऊस,कापूस,फळबागा आदी पिकांचेमोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांच्या पिकात अद्यापही मोठ्या प्रमाणावर पाणी असून अद्याप पाऊस थांबण्याची चिन्हे नाही त्यामुळे शेतकऱ्यांची त्यामुळे चिंता वाढली असून प्रशासनाने नुकसान भरपाई देण्यासाठी आजच सकाळी बैठक घेतली असून या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आज तहसीलदार महेश सावंत यांची भेट देऊन आपल्या मागण्या केल्या आहेत.

त्यात त्यांनी पुढे म्हंटले आहे की,’शेतकऱ्यांच्या ऊस,फळबागा व हंगामी पिके मोठ्या प्रमाणावर बाधित झाली आहेत.वर्तमान नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या ह्या नुकसानी इतक्या प्रचंड आहेत की शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे.या अतिवृष्टीमुळे कांदा,सोयाबीन,मका,टोमॅटो तसेच इतर हंगामी व भाजीपाल्याच्या पिकांना मोठे नुकसान आले असून काही ठिकाणी पिके पूर्णपणे नष्ट झाली आहेत.शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास हिसकावला गेला असून त्यांची संपूर्ण आर्थिक घडी विस्कळीत झाली आहे. शेतकरी हा या देशाचा कणा असून तोच समाजाच्या पोशिंदा आहे.अशा वेळी सरकार व प्रशासनाने शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून आधार देणे अत्यंत गरजेचे आहे. म्हणून सरकारने तालुक्यात तात्काळ सरसकट पंचनामे करून त्वरित नुकसान भरपाई मंजूर करावी व दिवाळीपूर्वी ती शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी.
कोपरगाव तालुक्यातील बाधित शेतकऱ्यांना हेक्टरी किमान ५० हजार रुपये इतकी नुकसानभरपाई मिळावी,ज्यांची पिके पूर्णपणे नष्ट झाली आहेत,अशा शेतकऱ्यांना विशेष आर्थिक मदत देण्यात यावी,महाराष्ट्र सरकारने कर्जमाफीसंबंधी त्वरित निर्णय घेऊन शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी जाहीर करावी,शेतकरी वर्गाची अवस्था अत्यंत बिकट आहे.म्हणून आपण तातडीने याबाबत योग्य ती कार्यवाही करावी अन्यथा आम्हाला आंदोलन व उपोषणाचा मार्ग अवलंबा लागेल असा इशारा वार्पे यांनी शेवटी दिली आहे.या निवेदनावर राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बापूसाहेब रांधवणे, ऍड.दिलीप लासुरें,ऍड.रमेश गव्हाणे,दुष्काळी भागातील युवा कार्यकर्ते सुनील वर्पे,सुरेश आसने आदींच्या सह्या आहेत.
दरम्यान याबाबत संदीप वर्पे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना म्हंटले आहे की,’वर्तमानात पावसाने नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान केले आहे.पशुधनाचे नुकसान झाले आहे.अद्याप पाऊस थांबण्याची चिन्हे नाही त्यामुळे भाजप युती सरकारने आपल्या जाहीरनाम्यात सरसकट कर्जमाफिचे आश्वासन दिलेले आहे.ते पाळण्याची वेळ आली आहे.ते न पाळल्यास शेतकऱ्यांत मोठा असंतोष पसरेल असा इशारा दिला आहे.
————————–
*नियमित विश्वसनीय बातम्यासाठी ‘न्यूजसेवा’ वर क्लिक करा आणि खालील लिंकवर क्लिक करून ग्रुप’मध्ये सामील व्हा*.
*न्यूजसेवा* डिजिटल युग डिजिटल बातमी.