आंदोलन
माजी मंत्री पाटील यांचे योगदान राज्यासह नगर जिल्ह्याला माहिती-वर्पे

न्यूजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
राज्याचे माजी मंत्री व ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांचे जलसंपदा मंत्री असताना निळवंडे कालव्यांसाठी दिलेले योगदान मोठे असून पश्चिमेचे पाणी वळविण्यासाठीही ते कमी नसून आ.पडळकर यांनी कितीही खालच्या पातळीवर जाऊन टीका केली नाही तरी काहीही फरक पडणार नाही असे प्रतिपादन जिल्हा राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष संदिप वर्पे यांनी आज कोपरगाव येथे आयोजित केलेल्या आंदोलन प्रसंगी केले आहे.

सदर प्रसंगी त्यांनी कोपरगाव चे तहसीलदार महेश सावंत यांना भेटून आपल्या मागण्यांचे निवेदन दिले आहे.त्यावेळी प्रवेशद्वारात त्यांनी आ.पडळकर यांचे विरुद्ध घोषणा देत परिसर दणाणून सोडला होता.
भाजपाचे आ.गोपीचंद पडळकर आणि वाद हे समीकरण राज्याला नवे नाही.पडळकर यांनी याआधी अनेकदा आपल्या विधानांनी वाद ओढवून घेतलेला आहे.नुकत्याच पार पडलेल्या विधिमंडळ अधिवेशनात गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या कार्यकर्त्याला मारहाण केली होती.त्यानंतर आता पडळकर यांनी माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जंयत पाटील यांच्या पालकांबाबत वादग्रस्त आणि अश्लाघ्य विधान केले असून त्याचे राजकीय वाद ओढवून घेतला आहे.या वादानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली असून त्यावर संदीप वर्पे यांनी आज कोपरगाव येथे तहसील समोर पडळकर यांना “जोडे मारो”आंदोलन आयोजित केले होते त्यावेळी हा समाचार घेतला त्यावेळी ते बोलत होते.

सदर प्रसंगी ॲड.दिलीप लासुरे,राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष बापू रांधवणे,कार्याध्यक्ष तानाजी जाधव,सुरेश आसने,ॲड.रमेश गव्हाणे,सुनील वर्पे,दिनेश पवार,स्वप्नील पवार,रिंकू मगर,माजीद पठाण,शुभम शिंदे,विजय खोमणे,ओंकार वढणे,आदींसह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”उत्तर नगर जिल्ह्यातील अवर्षणग्रस्त सात तालुक्यातील १८२ गावांना वरदान ठरणाऱ्या निळवंडे धरणासाठी निळवंडे कालवा कृती समितीचे संस्थापक नानासाहेब जवरे,अध्यक्ष रूपेंद्र काले यांच्या मागणीनुसार व माजी खा.प्रसाद तनपुरे यांच्या सहकार्याने मंत्रालयातील २९ ऑक्टोबर २०२० च्या बैठकीनंतर दोन वर्षात ०१ हजार ०५६ कोटी रुपयांचा सर्वाधिक निधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारच्या काळातील जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिला आहे.त्यानंतर कालव्यानां गती आली होती.परिणामी ३१ मे २०१३ रोजी त्याचे जलपूजन झाले होते.त्यांनीच सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरील पाणी दुष्काळी पूर्व भागात आणण्यासाठी स्वतंत्र प्राधिकरण स्थापन केले होते.त्यासाठी स्वतंत्र मुख्य अभियंता यांची नाशिक येथे नेमणूक केली होती.त्यामुळे आगामी काळात नगर नाशिक पाण्याचा वाद मिटणार आहेच पण मराठवाड्याचा पाणी प्रश्न मिटण्यास मदत होणार आहे.माजी मंत्री जयंत पाटील यांचे योगदान राज्याला माहिती आहे.त्यामुळे त्यांचेवर कोणी खालच्या पातळीवर टीका केली तरी काही फरक पडणार नाही.

“उत्तर नगर जिल्ह्यातील अवर्षणग्रस्त सात तालुक्यातील १८२ गावांना वरदान ठरणाऱ्या निळवंडे धरणासाठी निळवंडे कालवा कृती समितीचे संस्थापक नानासाहेब जवरे,अध्यक्ष रूपेंद्र काले यांच्या मागणीनुसार व माजी खा.प्रसाद तनपुरे यांच्या सहकार्याने मंत्रालयातील २९ ऑक्टोबर २०२० च्या बैठकीनंतर दोन वर्षात ०१ हजार ०५६ कोटी रुपयांचा सर्वाधिक निधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारच्या काळातील जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिला आहे”-संदीप वर्पे,कार्याध्यक्ष,राष्ट्रवादी काँग्रेस,शरद पवार गट.
माजी मंत्री जयंत पाटील यांच्या विरोधात खालच्या दर्जाचे वक्तव्य करणाऱ्या भाजपचे आ.गोपीचंद पडळकर याचा कोपरगाव शहर व तालुका सष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने जोडे मारत जाहीर निषेध करत आहे.संपूर्ण देशात सुसंस्कृतपणा व सभ्यता यासाठी महाराष्ट्र राज्य ओळखले जाते.मात्र त्या संस्कृतीला त्यांनी मातीमोल केले आहे.
परतु २०१४ पासून या आपल्या सुसंस्कृत राज्यात पडळकर,राणे,राणा,सदावर्ते,कंभोज, वाघ अशा अनेक लोकांना राजश्रय व पाठबळ देऊन विरोधी पक्षाच्या नेत्यांवर खालच्या पातळीवर टीका केली जाते.याला महाराष्ट्र राज्याचे सुसंकृत म्हणवणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पायबंद घालावा.त्यांनी बेताल आ.पडळकर यांचे कौतुक करून पाठीशी घालण्याचे पाप करू नये.यापुढे विरोधी पक्षाच्या नेत्यांबद्दल खालच्या पातळीवर व भावना दुखावणारी वक्तव्य झाली तर तीव्र आंदोलन केले जाईल व निर्माण होणाऱ्या कायदा व सुव्यास्थेची जबाबदारी संबंधित वादग्रस्त वक्तव्य करणारी व्यक्ती व शासनाची राहील असा इशारा वर्पे यांनी शेवटी दिला आहे.