जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
आंदोलन

…या ग्रामसभेचा ठराव होणार मंजूर,दुष्काळी भागात होणार बंड !

न्यूजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

  ग्रामसभेत मंजूर ठरावात हात उंचावून घेतलेल्या मतदानात बहुमत असलेली मते व विरोधी असलेली मतेच विचारात घेतली जात असून तटस्थ अथवा अलिप्त असलेल्या मतांची बेरीज गृहीत धरली जात नाही अशी प्रतिक्रिया कोपरगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप दळवी यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना नोंदवली असल्याने रांजणगाव देशमुख येथील नुकत्याच संपन्न झालेल्या ग्रामसभेत अन्य तालुक्यात जाण्याचा ठराव मंजूर झाला असल्याचे मानले जात आहे.

कोपरगाव तालुक्यातील नेते नादुरूस्त रस्त्याबाबत आपले तोंड उघडायला तयार नाही.उघडले तर ते केवळ औपचारिकता पूर्ण करण्यासाठी उघडतात.त्यामुळे या मार्गावरील रांजणगाव देशमुख,जवळके,शहापूर,पोहेगाव,बहादरबाद,अंजनापूर,धोंडेवाडी,वेस,सोयगाव,बहादरपूर, मनेगाव,काकडी,मल्हारवाडी आदी गावांत अच्छा-खांसा संताप आहे.अनेक कार्यकर्त्यांनी उत्तर नगर जिल्ह्यातील पुढाऱ्यांच्या आणि विशेषता कोपरगाव तालुक्यातील नेत्यांच्या विरोधात निषेधात्मक आंदोलने करूनही उपयोग झालेला नाही हे विशेष याचा संताप बाहेर पडला असल्याचे मानले जात आहे.विशेष म्हणजे संदीप गोर्डे हा कार्यकर्ता आ.काळे गटाचा निष्ठावान असल्याने हा घरचा आहेर मानला जात आहे.

  कोपरगाव तालुक्यातील उत्तर भारतीयांना पुण्यास जाण्यास सर्वात महत्वाचा आणि जवळचा ठरणाऱ्या तळेगाव दिघे मार्गे संगमनेर रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याने रांजणगाव देशमुख येथील संतापलेल्या ग्रामस्थानी नुकत्याच आयोजित ग्रामसभेत आम्हाला राहाता अथवा संगमनेर तालुक्यात सवाविष्ट करावे असा ग्रामसभेचा ठराव मंजूर केल्याने कोपरगावसह नगर जिल्ह्यात खळबळ उडाली होती.त्यावर आमचे प्रतिनिधीने कोपरगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप दळवी यांची प्रतिक्रिया जाणून घेतली त्यावेळी ते बोलत होते.त्यामुळे ग्रामसभा ठराव मंजूर समर्थक कार्यकर्ते सुनील गोंर्डे यांचेसह त्यांचे समर्थक कार्यकर्त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

  कोपरगाव तालुक्यातील नेते नादुरूस्त रस्त्याबाबत आपले तोंड उघडायला तयार नाही.उघडले तर ते केवळ औपचारिकता पूर्ण करण्यासाठी उघडतात.त्यामुळे या मार्गावरील रांजणगाव देशमुख,जवळके,शहापूर,पोहेगाव,बहादरबाद,अंजनापूर,धोंडेवाडी,वेस,सोयगाव,बहादरपूर, मनेगाव,काकडी,मल्हारवाडी आदी गावांत अच्छा-खांसा संताप आहे.अनेक कार्यकर्त्यांनी उत्तर नगर जिल्ह्यातील पुढाऱ्यांच्या आणि विशेषता कोपरगाव तालुक्यातील नेत्यांच्या विरोधात निषेधात्मक आंदोलन म्हणून खड्ड्यात “सत्यनारायण पूजा” केली,कोणी रस्त्यात झाडे लावली,कोणी होड्या सोडल्या,कोणी “रास्ता रोको” तर कोणी रस्त्यावरील खड्ड्यात चुली पेटवून ॲड.योगेश खालकर आदींनी आंदोलन केले.मात्र नेते आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग यायला तयार नाही.त्यामुळे याभागात मोठे बंड होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.याला तरुण कार्यकर्ता सुनील गोर्डे हे निमित्त ठरणार असे सार्वत्रिक चित्र दिसत आहे.

  दरम्यान आता आगामी काळात रांजणगाव देशमुख सह अन्य दुष्काळी गावे नेमकी काय भूमिका घेणार याकडे कोपरगाव तालुक्यातील ग्रामस्थांचे लक्ष लागून आहे.कोपरगाव तालुक्यातील ग्रामीण भागात रस्त्यांसह पायाभूत सेवा सुविधा देण्यात सत्ताधारी वर्गाला मोठे अपयश आल्याने अनेकांचे बळी जात असल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.ऐन जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वी हा संताप उफाळून आल्याने आगामी काळात मतदार नेमकी सत्ताधाऱ्यांविरोधात नेमकी काय भूमिका घेणार याकडे कोपरगाव तालुक्यातील जनतेचे लक्ष लागून आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close