आंदोलन
सेनेचे…या शहरात सरकारविरुद्ध आंदोलन संपन्न !

न्यूजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
जमू काश्मीर मधील पहेलगाम येथे पाकिस्तानी अतिरेकी हल्ल्यात अनेक निरपराध पर्यटक मारले गेले अनेक महिलांचे कुंकू पुसले गेले देशाचे रक्षण करणारे जवान पाकीस्तानी अतिरेकी कारवायात धारातीर्थी पडत असताना केंद्र सरकार पाकिस्तान विरुद्ध क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेते याच जाब विचारण्यासाठी उत्तर अहिल्यानगर शिवसेना महिला आघाडीच्या वतीने ‘माझं कुंकू,माझा देश’ हे अभियान राबवून कुंकवाचा आहेर थेट पंतप्रधान यांना पाठविण्यात येणार असल्याची घोषणा माहिती सेनेच्या महिला आघाडीच्या संघटक व माजी नगरसेविका सपना मोरे यांनी आज दुपारी केलेल्या आंदोलनात केली आहे.

भारत पाकिस्तान या सामन्याविरोधात राज्यात तीव्र संताप पाहायला मिळत आहे.शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) राज्यभर ‘माझं कुंकू माझा देश’ या आंदोलनाद्वारे या सामन्याचा तीव्र विरोध करत आहे.त्याचे पडसाद कोपरगाव तालुक्यातील शहरात आणि तालुक्यात पहायला मिळत आहे.
भारताविरुद्ध सतत दहशतवादी कारवाया करणाऱ्या पाकिस्तानविरोधात भारतीय क्रिकेट संघानं सामने खेळू नये.यासाठी केंद्र सरकारनं ठोस भूमिका घ्यावी,अशी मागणी शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी मुंबईत पत्रकार परिषदेत नुकतीच केली होती.आशिया कप -२०२५ मध्ये आज रविवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना रंगणार आल्याच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन केले आहे.
सदर प्रसंगी कोपरगाव शहर शिवसेनेचे अध्यक्ष भरत मोरे यांचेसह महिला आघाडीच्या कोपरगाव शहर संघटक राखी मनोज विसपुते, संगिता गोंजारे,जुबेदा पठाण,रत्ना पाठक,माजी शहरप्रमुख अस्लम शेख,भंडारा जिल्हा संपर्कप्रमुख मनोज कपोते, युवासेना शहरप्रमुख पैलवान गनन हाडा,उपशहरप्रमुख बालाजी गोर्डै,भाऊ सैंदाने,वैभव शेलार,भैय्या वालझाडे,यश मोरे,बापू क्षिरसागर यांचेसह अनेक महिला कार्यकर्त्या,शिवसैनिक उपस्थित होते.