जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
आंदोलन

… या तालुक्यात महसूल विभाग पुन्हा भ्रष्टाचाराच्या विळख्यात ?

न्युजसेवा

कोपरगाव -(नानासाहेब जवरे)

   कोपरगाव तालुक्यातील नागरिकांना कोपरगाव तहसीलमध्ये आपले काम करून घेताना दलालांचा मोठा सुळसुळाट झाला असून अधिकाऱ्यांचे हात ओले केल्याखेरीज नागरिकांचे एकही काम होत नसल्याचा आरोप भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष खा.स्व.सूर्यभान वहाडणे यांचे चिरंजीव व माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी आज आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना केला आहे.त्यामुळे कोपरगाव तालुक्यातील सत्ताधारी अजित गटाचे आ.आशुतोष काळे यांना हा घराचा आहेर मानला जात आहे.

“या आधी आ.आशुतोष काळे यांनी अधिकाऱ्यांना कानपिचक्या देऊनही उपयोग झालेला नाही.तहसीलदार महेश सावंत यांना ही बाब माहिती नाही का ? असा तिखट सवाल विचारून आता आमची आणि कार्यकर्त्यांची सहनशीलता संपली तर हाती दांडके घेतले तर त्याला अधिकारी जबाबदार राहतील”-विजय वहाडणे,भाजपचे माजी नगराध्यक्ष.

   एकीकडे देशभर भ्रष्टाचारविरोधी वातावरण पसरले असताना सरकारी खात्यांतील भ्रष्टाचाराची गंगा मात्र खळाळून वाहत असते.अहिल्यानगर जिल्ह्यात लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने केलेल्या एकूण कारवायांचा तपशील पाहता गेल्या काही महिन्यांत महसूल खात्याने पोलिस खात्याला मागे टाकत पहिला क्रमांक मिळवला असल्याचे वारंवार उघड झाले आहे.त्यातच महसुल महत्त्वाच्या विभागाची प्रतिमा उंचावण्यासाठी यापुढे ‘भ्रष्टाचार बंद’ असे खणखणीत धोरण राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी फेब्रुवारीत जाहीर केले होते मात्र महसूल मंत्र्यांची हि घोषणा कोपरगाव तहसील विभागाने कचऱ्याच्या डब्यात टाकून दिली असल्याचे उघड झाले आहे.त्यातच कोपरगाव तालुक्यातील तहसील तथा महसूल कार्यालय हे भ्रष्टाचाराचे आगार मानले जाते.मागील उन्हाळ्यात वाढलेल्या भ्रष्टाचारावरून मोठा गाजावाजा झाल्यावर आ.काळे यांनी जनता दरबार आयोजित करण्यास प्रारंभ केला होता.पहिल्या जनता दरबारात नागरिकांच्या तक्रारींचा महापूर आला होता.त्यात सर्वाधिक तक्रारी या महसूल विभाग त्या खालोखाल महावितरण कंपनी,पोलिस, नगरपरिषद,जलसंपदा विभागांच्या होत्या.

आ.आशुतोष काळे.

“कोपरगाव शहरातील विविध शासकीय कार्यालयात सर्वसामान्य नागरीकांची शासकीय कामात अडवणूक केली जात असून काही शासकीय अधिकाऱ्यांकडून पैशाची मागणी केली जात असल्याची कबुली देत हा प्रकार गंभीर आहे.सर्वसामान्य नागरिकांची कोणत्याही शासकीय कार्यालयात होणारी आर्थिक पिळवणूक सहन केली जाणार नाही”-  आ.आशुतोष काळे,कोपरगाव.

त्यानंतर त्यांनी विभागनिहाय बैठका सुरू केल्या होत्या.त्यातही त्याचीच पुनरावृत्ती झाली होती.तरीही त्यापासून सत्ताधारी वर्गाने कोणताही बोध घेतल्याचे दिसून आले नाही. थोडे स्थिरस्थाव झाले की पुन्हा एकदा अधिकारी आणि कर्मचारी आपली ‘ हात की लीला’ दाखविण्यास प्रारंभ करतात असे दिसून येत आहे.आता तर कोपरगाव तालुक्यातील अजित पवार राष्ट्रवादीचे आ.आशुतोष काळे यांचा सहकारी पक्ष असलेल्या निष्ठावान भाजपचे
(वहाडणे गट)माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनीच वसंत स्मृती येथे आज सकाळी ११ वाजता एक पत्रकार परिषद घेऊन महसूल विभागाच्या भोंगळ कारभारावर हल्लाबोल केला आहे.त्यामुळे कोपरगाव,नगरसह राज्यात खळबळ उडाली आहे.

 

अहिल्यानगर जिल्ह्यात लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने केलेल्या एकूण कारवायांचा तपशील पाहता गेल्या काही महिन्यांत महसूल खात्याने पोलिस खात्याला मागे टाकत पहिला क्रमांक मिळवला असल्याचे वारंवार उघड झाले आहे.त्यातच महसुल महत्त्वाच्या विभागाची प्रतिमा उंचावण्यासाठी यापुढे ‘भ्रष्टाचार बंद’ असे खणखणीत धोरण राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी फेब्रुवारीत जाहीर केले होते मात्र महसूल मंत्र्यांची हि घोषणा कोपरगाव तहसील विभागाने कचऱ्याच्या डब्यात टाकून दिली असल्याचे उघड झाले आहे.

   देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या विकासकामांची मोठमोठी उड्डाणे घेत असताना
दिव्याखाली अंधार उक्ती प्रमाणे कोपरगाव तालुक्यातील नागरिकांची अवस्था झाली असून् याचा मोठा फटका शहर आणि तालुक्यातील जनतेला बसतआहे.त्याचा आज विजय वहाडणे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोभाटा झाला इतकेच म्हणता येईल.

  त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”देशात नरेंद्र मोदी यांच्या सारखा निष्कलंक नेता देशाला लाभला आहे.त्यांनी आपले नेतृत्व जागतिक पातळीवर सिद्ध केले आहे.केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी पायाभूत सुविधा अमेरिकेपेक्षा पुढे नेऊन ठेवल्या आहे.देशाची संरक्षण सिद्धता वाढत आहे.त्याची चव पाकिस्तान सारख्या कट्टर शत्रू देशाला चाखवली आहे.चीन सारख्या मोठ्या देशाला मागे सरकायला भाग पाडले आहे.तर कोपरगाव सारख्या ठिकाणी मात्र महसूल विभागाचे अधिकारी चिरीमिरी घेतल्याशिवाय जनतेचे कोणतेही काम करताना दिसत नाही हा मोठा विरोधाभास निर्माण झाला आहे. त्यामुळे जनतेने मोठ्या विश्वासाने निवडून दिलेल्या सरकारवर लोकप्रतिनिधींवर आणि त्यांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.विशेष म्हणजे या चिरीमिरीत महिला अधिकारी मागे नसल्याचे उघड होत आहे.त्यामुळे आता चिरीमिरी करणारे अधिकारी नेमके कोण आहेत याची शहरात आणि तालुक्यात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.

  दरम्यान भाजपचे माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी या आधी आ.आशुतोष काळे यांनी अधिकाऱ्यांना कानपिचक्या देऊनही उपयोग झालेला नाही.तहसीलदार महेश सावंत यांना ही बाब माहिती नाही का ? असा तिखट सवाल विचारून आता आमची आणि कार्यकर्त्यांची सहनशीलता संपली तर हाती दांडके घेतले तर त्याला अधिकारी जबाबदार राहतील असा इशारा शेवटी दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close