आंदोलन
…या आमदारांविरुध्द गुन्हा दाखल करा-कोपरगावात मागणी

न्युजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
ख्रिचन समाजाबाबत आणि पाद्रिबाबत बाबत वादग्रस्त वक्तव्य करणारे भाजपचे आ.गोपीनाथ पाडळकर यांचे विरुध्द सरकारने तात्काळ गुन्हा दाखल करा अशी मागणी आर.पी.आय.चे माजी शहराध्यक्ष जितेंद्र रणशुर यांनी केली आहे.

“महाराष्ट्रातील व भारतातील सर्व ख्रिस्ती धर्मगुरुंना संरक्षण मिळावे ख्रिस्ती धर्मगुरूंचा आमदार पडळकर यांच्या या वत्कव्यामुळे ख्रिस्ती धर्मगुरूंचा घात झाल्यास त्यास पुर्ण पणे महाराष्ट्र शासन जबाबदार राहिल”-राजन त्रिभुवन,अध्यक्ष,कोपरगाव तालुका ख्रिचन समाज संघटना.
सांगलीतील यशवंतनगर येथे धर्मांतरासाठी तगादा लावलेल्या सासरच्या मंडळींच्या छळाला कंटाळून ऋतुजा राजगे या सात महिन्यांच्या गर्भवतीने नुकतीच आत्महत्या केली होती.त्यामुळे धर्मांतर बंदी कायदा लागू करावा,तसेच तिला धर्म परिवर्तन करण्यास भाग पाडणाऱ्या पादरीचा जो कुणी सैराट करेल त्याला ११ लाखांचे बक्षीस जाहीर करा असं वादग्रस्त वक्तव्य भाजपचे आ.गोपीचंद पडळकरांनी केलं होतं.धर्मांतरण करण्यासाठी ऋतुजा राजगे या सात महिन्यांच्या गरोदर महिलेला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्यांना कडक शिक्षा करा मागणी केली होती त्यावर राज्यात वाद निर्माण झाला आसुन आज कोपरगाव शहरातील ख्रिश्चन समाजाने तहसील कार्यालयावर मुकमोर्चाचे आयोजन केले होते.त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी संघटनेचे अध्यक्ष राजन त्रिभुवन म्हणाले की,”आ.गोपीचंद पडळकर यांनी ख्रिस्ती धर्मगुरुंना ठार मारल्यास माझ्याकडून ११ लाख रुपयांचे बक्षीस देईल या वादग्रस्त वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील व भारतातील ख्रिस्तीधर्मगुरु यांच्या जिवताला धोका निर्माण झाला आहे.आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर गुन्हा नोंद होऊन दाखल करुण या आमंदाराचे सदस्यत्व रद्द करावे.महाराष्ट्रातील व भारतातील सर्व ख्रिस्ती धर्मगुरुंना संरक्षण मिळावे ख्रिस्ती धर्मगुरूंचा आमदार पडळकर यांच्या या वत्कव्यामुळे ख्रिस्ती धर्मगुरूंचा घात झाल्यास त्यास पुर्ण पणे महाराष्ट्र शासन जबाबदार राहिल असे जाहीर केले आहे.यावेळी तहसिलदार महेश सावंत यांनी उपस्थित आंदोलनकर्ते यांचे निवेदन स्वीकारले आहे.त्यावेळी नायब तहसीलदार चंद्रशेखर कुलथे हे ही उपस्थित होते.
सदर प्रसंगी कोपरगाव तालुका ख्रिचन समाज संघटनेचे अध्यक्ष राजन भास्करराव त्रिभुवन,उपाध्यक्ष फ्रेडी फर्नांडिस,सचिव रवी सोनवणे,अनिल धीवर,अशोक नायडू,ताराचंद सात्राळकर,जॉन मोरे,सुरेश घोडके,रवींद्र वाघमारे,मॅन्युअल बोर्डे,सुनील बोरुडे,अगुस्तीन शिनगारे, र्टी.एम.जॉय,सुनील लोंढे आदीसह बहुसंख्येने नागरिक व महिला उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांना कोपरगाव तालुका ख्रिचन समाज संघटनेचे अध्यक्ष राजन भास्करराव त्रिभुवन,उपाध्यक्ष फ्रेडी फर्नांडिस,सचिव रवी सोनवणे आदींनी उपस्थितांना मार्गदर्शन केले आहे.