जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
आंदोलन

…तो वादग्रस्त पाझर तलाव ग्रामपंचायतीच्या ताब्यात

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव -(नानासाहेब जवरे)
 

   कोपरगाव तालुक्यातील शहापूर येथील जुने देवगाव अर्थातच ओस पांढरी पाझरतलावावरून वाद निर्माण झाला असताना व सिन्नर तालुक्यातील पाथरे येथील शेतकऱ्यांनी आश्चर्यकारकरित्या सांडवा चुकीचा ठरवल्याने व त्यात नाशिक आणि नगर जिल्ह्यातील आमदार आणि खासदार आदींनी भाग घेतल्याने मोठा वाद उद्भवला होता.तर शहापूर ग्रामपंचायतीने हा तलाव आमच्या ताब्यात नसल्याचा दावा केला होता.मात्र तो सपशेल खोटा ठरला असून तो तलाव ग्रामपंचायतीच्या ताब्यात असल्याचे उघड झाले आहे.

सर्व फोटो संकल्पित.

दरम्यान या १२५ मिटर सांडव्याद्वारे सदरचे पाणी सिन्नर तालुक्यातील पाथरे ग्रामपंचायत हद्दीतून पुढे ईशान्य दिशेने नैसर्गिक ओढ्याने पोहेगाव शिवारात काढून रस्त्यातील म्हसोबापर्यंत जावून गोदावरी कालव्यांच्या तीन मोऱ्यांखालून जात होते.त्यावेळी या परिसरात काटवन नावाचे जंगल होते.पुढे शेतीसाठी शेतकऱ्यांनी ते जंगल काढून पुढे त्या ठिकाणी सुपीक जमीन तयार केली होती.मात्र आता त्यावरून वाद होत आहे हे विशेष !

  याबाबत सविस्तर वृत्त असे की,”कोपरगाव तालुक्यातील दुष्काळी असलेल्या शहापूर हद्दीतील जुने देवगाव तथा ओस पांढरी येथील सन-१९८२ साली बांधण्यात आलेला पाझर तलावाचा सांडवा काही असामाजिक तत्वांनी जे.सी.बी.च्या सहाय्याने अडवला असून त्यामुळे या पाझर तलावाच्या लाभक्षेत्रात खाली असलेल्या शेतकऱ्यांचे नुकसान होण्याबरोबरच बंधारा फुटून लोकवस्तीचे नुकसान होऊ शकणार असल्याची गंभीर तक्रार शहापूर येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच योगिता रमेश डांगे यांनी एका निवेदनाव्दारे आ.आशुतोष काळे यांचेकडे केली असल्याने खळबळ उडाली होती.तसेच त्यात निळवंडे धरणाचे पाणी अडविण्यासाठी विरोध केल्याने पंचावन्न वर्षांनी पाणी येऊन ही शेतकरी दुर्दैवी ठरले होते.त्यामुळे या अवर्तनात तो रिकामाच राहिला होता.त्यामुळे जवळके,बहादरपुर,शहापूर,बहादराबाद,सिन्नर तालुक्यातील पाथरे आदी दुष्काळी शेतकऱ्यांनी मोठा संताप व्यक्त केला होता.याबाबत शहापुर ग्रामपंचायतीने हा पाझर तलाव आमच्या ताब्यात नसल्याचा व तसे कागदपत्रे उपलब्ध नसल्याचा खुलासा केला होता.व आ.आशुतोष काळे यांचेकडे तक्रार केली होती.तर या उलट नगर जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे कोपरगाव उपविभागाने तो ग्रामपंचायतीच्या ताब्यात दिला असल्याचा दावा केला होता.त्यामुळे उलटसुलट चर्चेला उधाण आले होते.

  

दरम्यान हा पाझर तलाव हा दि.२० नोव्हेंबर २००३ रोजी सरपंच गणपतराव पाचोरे हे असताना व ग्रामसेवक नेताजी भाबड हे असताना जिल्हा परिषद अहिल्यानगर यांच्या लघु पाटबंधारे विभागाच्या ताब्यातून शहापूर ग्रामपंचायतीने आपल्या ताब्यात घेण्यात आला आहे.त्यामुळे आता हे सहभाग घेणारे राजकीय नेते आणि शेतकरी पुढे काय भूमिका घेणार याकडे तालुक्याचे लक्ष लागून आहे.

   दरम्यान याबाबत आमच्या प्रतिनिधींनीने या बाबत पोलखोल करण्यासाठी अधिकची माहिती घेतली असता तो दावा फोल निघाला असून सदर तलाव हा सन-१९८२ साली बांधून पूर्ण झाला असून त्याची पाणी साठवण क्षमता ही १३.९२ द.ल.घ.फूट इतकी आहे.या पाझर तलावाची उंची६.५ मीटर आहे.तर या पाझर तलावाची लांबी ही १०६० मीटर असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.त्याचे पाणलोट क्षेत्र हे ४.३६ चौरस मैल आहे.त्याचा महत्तम पूर विसर्ग ह ७ हजार ६५० क्युसेक्स आहे.त्याची अप्रत्यक्ष सिंचन क्षमता ८३ हेक्टर दर्शवली आहे.त्या कामावर जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने रोजगार हमी योजनेतून ४.७१ लक्ष खर्च करण्यात आला आहे. या तलावाच्या सांडव्याचा प्रकार ड्रॉनड टाईप असून त्याची लांबी १२५ मिटर असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.या सांडव्याद्वारे सदरचे पाणी सिन्नर तालुक्यातील पाथरे ग्रामपंचायत हद्दीतून पुढे ईशान्य दिशेने ओढ्याने पोहेगाव शिवारात काढून रस्त्यातील म्हसोबापर्यंत जावून गोदावरी कालव्यांच्या तीन मोऱ्यांखालून जात असल्याची विश्वसनीय माहिती आहे.त्यावेळी या परिसरात काटवन नावाचे जंगल होते.पुढे शेतीसाठी शेतकऱ्यांनी ते जंगल काढून पुढे त्या ठिकाणी सुपीक जमीन तयार केली होती.पुढे त्यावेळी मात्र त्यालाच काही शेतकऱ्यांनी अर्धवट माहितीद्वारे सन-२०२२ पासून हरकत घेतली होती.व त्याबाबत वर्तमान कृषिमंत्री माणिकराव कोकाटे,नाशिकचे खा.राजाभाऊ वाजे,कोपरगावचे आ.आशुतोष काळे आदिंकडे लेखी तक्रार केली होती.त्यामुळे मोठा गोंधळ उडाला होता.


  
  दरम्यान हा पाझर तलाव हा दि.२० नोव्हेंबर २००३ रोजी सरपंच गणपतराव पाचोरे हे असताना व ग्रामसेवक नेताजी भाबड हे असताना जिल्हा परिषद अहिल्यानगर यांच्या लघु पाटबंधारे विभागाच्या ताब्यातून शहापूर ग्रामपंचायतीने आपल्या ताब्यात घेण्यात आला आहे.त्यामुळे आता हे सहभाग घेणारे राजकीय नेते आणि शेतकरी पुढे काय भूमिका घेणार याकडे अधिकाऱ्यांचे आणि शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close