सण-उत्सव
शिर्डीत पेटवली साई संस्थानच्या वतीने,’होळी’

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्थेच्या वतीने श्री गुरुस्थान मंदिरासमोर मोठ्या उत्साहात होळी पेटविण्यात आली आहे.यावेळी संस्थानचे प्र.मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव व त्यांची सुविद्य पत्नी कावेरी जाधव यांच्या हस्ते होळीची विधीवत पुजा करण्यात आली.
याप्रसंगी संस्थानचे प्रशासकीय अधिकारी सर्वश्री डॉ.आकाश किसवे, दिलिप उगले,संजय जोरी,संरक्षण अधिकारी आण्णासाहेब परदेशी,मंदिर विभाग प्रमुख रमेश चौधरी,मंदिर पुजारी,शिर्डी ग्रामस्थ व साईभक्त उपस्थित होते.