जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
आंदोलन

गोदावरी तुटीचे खोरे विपुल खोऱ्यात रूपांतर करण्यासाठी आता संघर्ष समिती !

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव- (प्रतिनिधी)
 
   उर्ध्व गोदावरी खोरे तुटीचे गणले जाते त्या पाण्याच्या उपलब्धतेच्या मर्यादा लक्षात घेता पश्चिम वाहिनी नद्यांचे कोकणात वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्याशिवाय पर्याय नाही.मात्र सरकार आणि उत्तर नगर जिल्ह्यातील प्रस्थापित नेते निवडणुका पाहून घोषणा करण्यापलीकडे काहीही कृती करत नसल्याचे वारंवार उघड होत आहे.त्यामुळे हे पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्यासाठी,’उर्ध्व गोदावरी जल पुनर्स्थापना संघर्ष समिती’ स्थापन करण्याचा निर्णय झाला असल्याची माहिती निळवंडे कालवा कृती समितीचे कार्याध्यक्ष गंगाधर रहाणे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.

दरम्यान गोदावरी हे तुटीचे खोरे विपुल खोऱ्यात रूपांतरण करण्यासाठी या लढ्यासाठी शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष ऍड.अजित काळे हे आपली विधीसेवा मोफत पुरवणार असल्याची माहिती जलतज्ञ राजेंद्र खीलारी यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.

  सदरचे सविस्तर वृत्त असे की,”उत्तर कोकणातील नार-पार,अंबिका औरंगा,दमणगंगा,वैतरणा व उल्हास नदी उपखोऱ्यात ३१७ टीएमसी अतिरिक्त पाणी शिल्लक आहे.पश्चिम वाहिनी खोऱ्यातील (कोकण) अतिरिक्त पाणी मराठवाड्यात वळवण्यासाठी प्राथमिक अभ्यास करण्यासाठी राज्य सरकारने २००१ व २०१९ रोजी समिती स्थापन केली होती.या समितीच्या अहवालानुसार कोकणातील नार-पार,दमणगंगा,वैतरणा,उल्हास नदी खोऱ्यातून गोदावरी खोऱ्यात प्रवाही वळण योजनांद्वारे; तसेच उपसा नदीजोड,वळण योजनांद्वारे एकूण ८९.९२ टी.एम.सी.पाणी वळविण्याबाबत आखणी करून त्याबाबत शिफारस केली आहे.त्यानुसार जवळपास ७.४ टी.एम.सी.पाणी प्रवाही वळण योजनांद्वारे; तर १५.५ टी.एम.सी.पाणी प्रमुख उपसा वळण योजनांद्वारे असे एकूण मिळून २२.९ टी.एम.सी. पाणी वळविण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे.विविध दोन समित्यांचे अहवाल शासनाकडे प्राप्त असून त्यात एक समिती उर्ध्व गोदावरी खोऱ्यात ५५ तर दुसरी समिती ६५ टी.एम.सी.पाणी उपलब्ध असल्याचा दावा करत आहे. व सदरचे संपूर्ण पाणी मराठवाड्यात नेण्यासाठी वारंवार घोषणा करत आहे.मात्र नगर नाशिक जिल्ह्यातील नेते नगर नाशिकचा हिस्सा किती यावर तोंड उघडायला तयार नाही.

सदर प्रसंगी सदर लढ्यात कोपरगाव,राहाता,श्रीरामपूर,राहुरी,निफाड,नाशिक,नेवासा तालुक्यातील शेतकरी कार्यकर्ते आदींनी सहभाग नोंदवणे आवश्यक बनले आहे.इच्छुक सामाजिक कार्यकर्ते,शेतकरी आदींनी समितीशी संपर्क साधावा असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी केले आहे.

  यासाठी प्रवासी वळण योजनेद्वारे एकूण ३० योजना प्रस्तावित असून,यापैकी काही १४ योजना पूर्ण केल्या असल्याच्या घोषणा निवडणुका पाहून केल्या जात आहेत.त्याद्वारे १.३५ टीएमसी पाणी वळविले जाईल.११ भविष्यकालीन योजनांद्वारे ४.९८ टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यात वळविणे प्रस्तावित असल्याच्या घोषणा ऐकून शेतकऱ्यांना आता विट आला आहे.मुख्य म्हणजे प्रमुख उपसा वळण योजनेद्वारे जवळपास १५.५५ टी.एम.सी.पाणी वळविण्याचे प्रस्तावित आहे.यात प्रवरा खोऱ्यातील घाटघर जवळील हिवरा नाला तसेच साम्रद गावाजवळील साम्रद नाला येथे वळण बंधारे बांधून पश्चिमेकडे जाणारे पाणी पूर्वकडे वळविण्याची योजना आहे.या बंधाऱ्याद्वारे एकूण १२८७ द. ल.घ.फूट अतिरिक्त पाणी वळविणे शक्य होणार असून त्याचा निळवंडे प्रकल्पासाठी फायदा होणार असल्याचे बोलले जात आहे.
तर कोकणातून समुद्रात वाहून जाणारे १६७ टी.एम.सी.पाणी गोदावरी खोऱ्यात वळवून मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यात येणार आहे.तसेच वैनगंगा-नळगंगा योजनेअंतर्गत ४८० किमीचा बोगदा तयार करून वैनगंगा नदीचे पाणी थेट पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भात आणले जाणार आहे.यासोबतच पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यातील दुष्काळ हटवण्यासाठी त्या भागातली सर्व अपूर्ण सिंचन योजना पूर्णत्वास घेऊन जाण्याचा प्रयत्न असणार असल्याच्या घोषणा या भागातील शेतकऱ्यांना नवीन नाही.मात्र प्रत्यक्षात हा प्रकल्प कधी पूर्ण होणार याबाबत निळवंडे प्रकल्पासारखेच कोणीही नेता अथवा प्रशासकीय अधिकारी स्पष्ट बोलत नाही.त्यामुळं यावर एक घाव दोन तुकडे करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते नानासाहेब जवरे आणि विक्रांत काले यांनी निर्णय घेतला होता व त्या दृष्टीने कागदपत्र जमवणे अनेक वर्षांपासून सुरु ठेवले होते.त्याबाबत गतवर्षी तयारी पूर्ण झाली होती व त्यासाठी शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष अड्.अजित काळे यांच्याशी विचार विनिमय व एक बैठक छ.संभाजीनगर येथे संपन्न होऊन त्यावर नुकतीच निळवंडे (तथा ऊर्ध्व प्रकल्प-२) सारखी जनहित याचिका दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.त्या नुसार मुंबई उच्च न्यायालयाच्या छ.संभाजींनगर येथील कोर्ट क्रं.एकचे न्या.रवींद्र घुगे व न्या.वाय.जी.खोब्रागडे यांचे समोर गतवर्षी हि जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.
त्यामुळे उत्तरेतील ढोंगी पुढारी जागे झाले आहे. त्यांनी आता निळवंडे कालव्या सारखी कृतिशून्य नुसती कावकाव आरंभली आहे.


निळवंडे कालवा कृती समितीने निळवंडे धरणाच्या कालव्यांचा लढा यशस्वी केला आहे.त्यानुसार कालव्यांचे उच्च न्यायालयाचे आदेशाने काम पूर्ण होऊन चाऱ्यांचे काम वेगाने सुरू आहे.त्यामुळे हा लढा मार्गी लागल्याने गोदावरी खोऱ्यात शेतकऱ्यांच्या शेती सिंचनाचे पाणी वाढीच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.त्यामुळे आता राज्य शेतकरी संघटना आणि कालवा कृती समितीने यात नवीन संघर्ष कृती समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यासाठी नुकतीच सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या कार्यकर्ते यांचे मनोगत जाणून घेण्यासाठी त्यांची आणि शेतकऱ्यांची एक बैठक कोपरगाव शहरात आयोजित केली होती त्यात हा ‘उर्ध्व गोदावरी जल पुनर्स्थापना संघर्ष समिती’ स्थापन करण्याचा निर्णय झाला आहे.

“निळवंडे कालवा कृती समितीने निळवंडे धरणाच्या कालव्यांचा लढा यशस्वी केला आहे.त्यानुसार कालव्यांचे उच्च न्यायालयाचे आदेशाने काम पूर्ण होऊन चाऱ्यांचे काम वेगाने सुरू आहे.त्यामुळे हा लढा मार्गी लागल्याने गोदावरी खोऱ्यात शेतकऱ्यांच्या शेती सिंचनाचे पाणी वाढीच्या अपेक्षा उंचावल्या आहे.आता उर्ध्व गोदावरीचे पाणी गोदावरी कालव्यांच्या लाभक्षेत्रात भाजप सरकारच्या सहाय्याने मिळवून द्यावे”- सुभाष दवंगे,माजी तालुकाध्यक्ष, भा.ज.प.कोपरगाव.

  दरम्यान गोदावरी हे तुटीचे खोरे विपुल खोऱ्यात रूपांतरण करण्यासाठी या लढ्यासाठी शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष ऍड.अजित काळे हे आपली विधीसेवा मोफत पुरवणार असल्याची माहिती राजेंद्र खिलारी यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.

   सदर प्रसंगी निळवंडे कालवा कृती समितीचे संस्थापक पत्रकार नानासाहेब जवरे,सामाजिक कार्यकर्ते संजय काळे,जलतज्ञ राजेंद्र खिलारी,निळवंडे कालवा कृती समितीचे अध्यक्ष रूपेंद्र काले,कार्याध्यक्ष गंगाधर रहाणे,संजय गुंजाळ,सुभाष दवंगे,ऍड.दिलीप लासुरे,रंगनाथ रहाणे,उमेश धुमाळ,शिवाजी गायकवाड,नानासाहेब गाढवे,रमेश दिघे,मच्छिंद्र दिघे,पर्वत गव्हाणे,बाबासाहेब गव्हाणे,तानाजी शिंदे,सोन्याबापू उऱ्हे,ज्ञानदेव पाटील हारदे,उत्तमराव जोंधळे आदीसह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

सदर प्रसंगी शिर्डीचे खा.भाऊसाहेब वाकचौरे व जे लोकप्रतिनिधी या लढ्यात सकारात्मक मदत करतील त्यांची मदत घेण्याचे आवाहन केले आहे.

सदर प्रसंगी सदर लढ्यात कोपरगाव,राहाता,श्रीरामपूर,राहुरी,निफाड,नाशिक,नेवासा तालुक्यातील शेतकरी कार्यकर्ते आदींनी सहभाग नोंदवणे आवश्यक बनले आहे.इच्छुक सामाजिक कार्यकर्ते,शेतकरी आदींनी समितीशी संपर्क साधावा असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close