जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
आंदोलन

परभणी संविधान प्रतिकृती विटंबना, कोपरगावात निषेध 

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी )
 
   परभणी येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या समोरील संविधान प्रतिकृती विटंबना प्रकरणी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे वतीने सोमवारी महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात आले असून अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव येथे राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे उत्तर विभागीय अध्यक्ष दिलीप कानडे यांचे नेतृत्वाखाली तहसीलदार महेश सावंत यांना आज निवेदन देण्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

  

सदर प्रसंगी तहसिलदार महेश सावंत यांनी निवेदन स्वीकारून शासनाला अहवाल सादर करण्याचे तसेच कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

   परभणी शहरात जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ असलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ भारतीय राज्य घटनेची प्रतिकृती बसवण्यात आली होती.मंगळवारी दिनाक १० डिसेंबर रोजी सायंकाळी एका व्यक्तीने राज्यघटनेच्या प्रतिकृतीला सुरक्षित ठेवण्यासाठी लावण्यात आलेली काच फोडल्यानंतर शहरात तणाव निर्माण झाला होता. घटनेची तीव्र प्रतिक्रिया राज्यात उमटली आहे.त्याला कोपरगाव शहर आणि तालुका अपवाद नाही.या घटनेचा निषेध व्यक्त होत असून त्याबाबत नुकताच राष्ट्रीय चर्मकार महासंघाने उत्तर विभागीय अध्यक्ष दिलीप कानडे यांचे नेतृत्वाखाली तहसीलदार महेश सावंत यांना आज निवेदन देऊन या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे.

  सदर निवेदनावर राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे उत्तर विभागीय अध्यक्ष दिलीप कानडे,अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष तथा माजी पंचायत समिती सदस्य अशोक कानडे,उत्तर विभागाचे युवा अध्यक्ष तुषार पोटे,राज्य कार्यकारणी सदस्य एम.डी.कानडे,उपजिल्हा अध्यक्ष देविदास कानडे,युवा जिल्हाध्यक्ष दत्ता दुशिंग,तालुका अध्यक्ष माधवराव पोटेसर,शहराध्यक्ष गणेश कानडे,जिल्हा सचिव संजय पोटे,जिल्हा कार्याध्यक्ष संजय सरवार,तालुका कार्याध्यक्ष अँड रमेश दुशिंग,युवा तालुका अध्यक्ष संतोष शिंदे,संतोष कानडे ,संतोष दळवी,सागर पोटे आदी पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहे.

याप्रसंगी सर्व पदाधिकारी यांचेसह मारुतीराव सरवार राकेश धाकतोडे,जगन्नाथ कानडे,संदेश कानडे,उमेश बारसे,संकेत कानडे,मोहित पोटे,विशाल अभंग आदीसह नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.

या प्रसंगी तहसिलदार महेश सावंत यांनी निवेदन स्वीकारून शासनाला अहवाल सादर करण्याचे आश्वासन दिले आहे.तसेच कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.यावेळी नायब तहसीलदार प्रफुल्लिता सातपुते,नायब तहसीलदार चंद्रशेखर कुलथे,बाळासाहेब फरताळे आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close