आंदोलन
बांग्लातील अत्याचार…या शहरात मुक मोर्चा !
न्यूजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
बांगलादेशात अराजकता माजल्यानंतर हिंदू समाजावर मोठ्या प्रमाणात अन्याय,महिलांवर अत्याचार होत आहेत.अनेक मंदिरांची नासधूस होत आहे.या बाबीची केंद्रातील मोदी सरकारने गंभीर दखल घेऊन कठोर पावले उचलावीत,अशी मागणी कोपरगातील सर्व हिंदू संघटनांनी केली असून आज मुक मोर्चाचे आयोजन केले होते त्यावेळी योगेश महाराज करंजीकर यांनी ही मागणी केली आहे.
सदर प्रसंगी कोपरगाव नगरपरिषदेचे माजी अध्यक्ष विजय वहाडणे,माजी शहराध्यक्ष कलविंदर दडीयाल,योगेश वाणी,ऋषिकेश बारहाते,संतोष पवार,मनोज जाधव,मयूर खैरनार,रवी आहेर,कृष्णा काथे,रविराज पवार,राकेश धुमाळ,विश्वास आहेर,रोहन कहार,साईराज लकारे,ओम ढोबळे,कार्तिक बागुल,मयूर विधाटे,चैतन्य ढुमणे,प्रवीण चव्हाण सुशांत खैरे,संतोष सुपेकर,ज्ञानेश्र्वर ठाणगे आदींसह बहुसंख्येने नागरिक,महिला उपस्थित होते.
त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”सन -१९७२ साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या खंबीर नेतृत्वाखाली भारत सरकारने पाकिस्तानला धडा शिकवून बांगलादेशाची निर्मिती करण्यात मोठा वाटा उचलला होता.परंतु याच बांगलादेशात अलीकडे राजकीय अराजकता माजल्यानंतर तेथील हिंदू समाजाला मोठ्या प्रमाणात लक्ष्य बनविले जात आहे.हिंदू कुटुंबीयांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात हिंसाचार होत असून मंदिरांचीही नासधूस केली जात आहे.ही बाब तमाम भारतीयांच्या दृष्टीने अस्वस्थ करणारी संतापजनक ठरली आहे.देशात मोठ्या प्रमाणावर असंतोष पसरला आहे.त्याला कोपरगाव तालुका अपवाद राहिला नाही त्यामुळे केंद्रातील मोदी सरकारने या प्रश्नावर वेळीच कठोर पावले उचलून बांगला देशातील हिंदू समाजावरील वाढते अन्याय अत्याचार थांबवावेत.त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतःची आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा पणाला लावावी अशी मागणी या शिष्टमंडळाने कोपरगाव तहसीलदार महेश सावंत यांचेकडे निवेदन देऊन केली आहे.
प्रारंभी सदर मुक मोर्चाच्या समर्थकांनी आधी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे मैदानापासून आपल्या मोर्चास सुरुवात करून तो संभाजी चौक,राम मंदिर रोड मार्गे तहसीलदार वळवला होता.त्यासाठी कोपरगाव शहर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी आपल्या सहकाऱ्यांना घेऊन चोख बंदोबस्त ठेवला होता.कुठेही अनुचित प्रकार घडला नाही.दरम्यान शेवटी आपले मनोगत व्यक्त करून मोर्चेकऱ्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन तहसीलदार महेश सावंत यांचेकडे सुपूर्त केले आहे.