आंदोलन
भ्रष्टाचाराचे कुरण ठरलेल्या कर्मचाऱ्यास हटवा-…या ग्रामपंचायतीची मागणी

न्यूजसेवा
कोपरगाव -(नानासाहेब जवरे)
कोपरगाव तालुक्यातील बहादरपुर ग्रामपंचायत हद्दीत,’महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजने’च्या माध्यमातून ग्रामस्थांची रोहयो योजनेतील कर्मचाऱ्यांना हाताशी धरून आर्थिकदृष्ट्या लुटण्याचे काम भाजप (कोल्हे गटाचे) तालुकाध्यक्ष कैलास रहाणे यांनी केले असून त्याविरुद्ध वादळ उठलेले असताना आता नैऋत्ये कडील सात ग्रामपंचायतींनी ‘त्या ‘ कर्मचाऱ्यास कर्तव्यातून काढून टाका अशी मागणी केली असल्याची माहिती आमच्या प्रतिनिधीच्या हाती आली आहे.त्यामुळे हे प्रकरण कोणत्या थरास जाणार याकडे तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागून आहे.

दरम्यान एरव्ही दुसऱ्याच्या डोळ्यातील कुसळ लवकर दिसणाऱ्या कोपरगाव भाजपाने (कोल्हे गटास) अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही हे विशेष !शिवाय एरव्ही कोणत्याही किरकोळ विषयात लोकांना नादी लावण्यात माहिर असलेल्या सत्ताधारी आ.आशुतोष काळे गटाने या विषयाला पिंडाला कावळा शिवत नाही तसा अद्याप स्पर्श केलेला नाही.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण विकास योजना ही केंद्र सरकारची सरकारची योजना असून या अंतर्गत कामासाठी लाभार्थी कुशल-अकुशल रोजगार पुरविला जात आहे.यात १०० दिवसांपर्यत अंमलबजावणीची करण्याची केंद्र सरकारची योजना असून त्यास राज्य सरकार हमी देते.या अंतर्गत कामासाठी लाभार्थी कुशल-अकुशल रोजगार पुरविला जात आहे.यात १०० दिवसांपर्यत अंमलबजावणीची करण्याची केंद्र सरकारची योजना असून त्यास राज्य सरकार हमी देते.त्यात विहिरीस चार लाख रुपये अनुदान मिळत होते अत ते पाच लाख रुपये झाले आहे.त्यामुळे शेतकऱ्यांचा या योजनेसह गायगोठा या योजनांकडे मोठा ओढा आहे.मात्र या योजनेत अनेक दलाल निर्माण झाले असून ते ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना पंचायत समितीतील कर्मचाऱ्यांना हाताशी धरून नसले तरी काहीतरी खुसपट काढून कागदपत्रे कमी असल्याचे दाखवून दहा ते पंधरा हजार रुपये घेऊन राजरोस लुबाडताना दिसत आहे.त्यात कोण कोण सामील आहे हे अद्याप उघड झालेले नसले तरी यात मोठा रॅकेट असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.याबाबत बहादरपुर येथे सन- 2012 नंतर पुन्हा एकदा पहिला बार उडाला असला तरी हे एक हिमनगाचे टोक असून त्यातील अनेक मोहरे उघडे होण्याचं बाकी आहे.दरम्यान एका माहितीनुसार अद्याप रोहयो विहिरींसाठी दहा ते पंधरा हजार रुपये गोळा करण्याचे काम शेजारच्या गावात या सोकावलेल्या असामाजिक व भ्रष्टवृत्तीचे मनोभावे सुरू असल्याची जोरदार चर्चा ग्रामस्थात सुरू आहे.त्यामुळे हे भ्रष्टाचाराचे कूरण कोणाच्या जीवावर सुरु आहे याची जोरदार चर्चा कोपरगाव तालुक्यात सुरू आहे.

दरम्यान एका माहितीनुसार अद्याप रोहयो विहिरींसाठी दहा ते पंधरा हजार रुपये गोळा करण्याचे काम शेजारच्या गावात या सोकावलेल्या असामाजिक व भ्रष्टवृत्तीचे मनोभावे सुरू असल्याची जोरदार चर्चा ग्रामस्थात सुरू आहे.त्यामुळे हे भ्रष्टाचाराचे कूरण कोणाच्या जीवावर सुरु आहे याची जोरदार चर्चा कोपरगाव तालुक्यात सुरू आहे.
या प्रकरणी कोपरगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी कृष्णा पाठक यांनी संबंधित कर्मचारी आकाश गोसावी यास कारणे दाखवा नोटीस बजावली असली तरी त्यावर अद्याप काय कारवाई झाली हे गुलदस्त्यात आहे.मात्र दरम्यान या घटनेचे गांभीर्य आणखी उघड झाले असून यात जवळपास सात ग्रामपंचायतींनी आवाज उठवला असून त्यात पोहेगाव सह जवळके,अंजनापुर,शहापुर,रांजणगाव देशमुख,वेस-सोयगाव आदींसह बहादरपूर आदींनी तक्रार केली असून याबाबत कोपरगाव पंचायत समिती काय कारवाई करणार याकडे तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागून आहे.
दरम्यान एरव्ही दुसऱ्याच्या डोळ्यातील कुसळ लवकर दिसणाऱ्या कोपरगाव भाजपाने (कोल्हे गटास) अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही हे विशेष !शिवाय एरव्ही कोणत्याही किरकोळ विषयात लोकांना नादी लावण्यात माहिर असलेल्या सत्ताधारी आ.आशुतोष काळे गटाने या विषयाला पिंडाला कावळा शिवत नाही तसा अद्याप स्पर्श केलेला नाही त्यामुळे या पडद्यामागील युती (?) बाबत तालुक्यात तर्ककुतर्कांना उधाण आले आहे.