जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
आंदोलन

साईबाबा संस्थान व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह,ग्रामस्थ आक्रमक होण्याची चिन्हे !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

   श्री साईबाबा मंदिराचे चारही प्रवेशद्वारे खुले करून चारही प्रवेश द्वारात मोबाईल आणि चप्पल स्टँडची सोय करावी व चारही प्रवेश द्वाराजवळ सशुल्क दर्शन पास व्यवस्था करून गर्दीचे सर्वसमावेशक नियोजन करावे अशी महत्वपूर्ण मागणी शिर्डी येथील ग्रामस्थांनी एका निवेदनाद्वारे नुकतीच केली आहे.

शिर्डीतील आलेला साईभक्त काही तासात शिर्डीच्या बाहेर पडत असून त्यातून शिर्डीतील व्यापारी आणि ग्रामस्थ अस्वस्थ असल्याचे दिसत आहे.या पूर्वी हजार रूम व पाचशे रुमने शिर्डीकरांचे कंबरडे मोडले आहे.या उलट शेगाव येथील गजानन महाराज संस्थान मात्र उत्पन्न कमी असतानाही भक्तांच्या नियोजनाबाबत वरचढ ठरताना दिसत आहे.याबाबत साई संस्थान हाताची घडी तोंडावर बोट ठेवताना दिसत आहे; परिणामी ही अस्वस्था निर्माण झाली असल्याचे मानले जात आहे.


 
    शिर्डीत नुकतीच गुरू पौर्णिमा मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे.त्यासाठी देशभरातून मोठया संख्येने भाविक भक्त उपस्थित होते.मात्र शिर्डीतील आलेला साईभक्त काही तासात शिर्डीच्या बाहेर पडण्याची घाई करत असून त्यातून शिर्डीतील व्यापारी आणि ग्रामस्थ अस्वस्थ असल्याचे दिसत आहे.या पूर्वी हजार रूम व पाचशे रुमने शिर्डीकरांचे कंबरडे मोडले आहे.याबाबत शिर्डीकर ग्रामस्थांना वेगळे सांगण्याची गरज नाही.या उलट शेगाव येथील गजानन महाराज संस्थान मात्र उत्पन्न कमी असतानाही भक्तांच्या नियोजनाबाबत वरचढ ठरताना दिसत आहे.याबाबत साई संस्थान हाताची घडी तोंडावर बोट ठेवताना दिसत आहे.यावेळी त्याचा दाहक अनुभव आला असून त्या गर्दीचे नियोजन साईबाबा संस्थांकडून कोलमडले असल्याचे दिसून आले आहे.त्याचा प्रतिकूल परिणाम शिर्डीतील ग्रामस्थांच्या अर्थकारणावर होताना दिसत आहे.परिणामी शिर्डीतील ग्रामस्थांच्या अच्छी खांसी नाराजी आहे.या पार्श्वभूमीवर शिर्डी ग्रामस्थांनी एक बैठक आयोजित करून त्यासाठी उपाययोजना करण्याबाबत विचार विनिमय केला असून त्यासाठी शिर्डीतील अनेक मान्यवर उपस्थित होते.त्यात त्यांनी ही महत्वपूर्ण मागणी केली आहे.

   त्यात त्यांनी म्हंटले आहे की,”श्री साईबाबा मंदिराचे चारही प्रवेशद्वारे कोरोना महामारी मध्ये बंद करण्यात आले होते.त्यानंतर शिर्डी ग्रामस्थांनी वेळोवेळी उठाव केल्यानंतर प्रवेशद्वार क्रमांक तीन हे अंशतः खुले करण्यात आले होते.या प्रवेशद्वारातून फक्त काही ठराविक ग्रामस्थांना आंत प्रवेश दिला जात होता,मात्र सर्वसामान्य साईभक्तांना या प्रवेशद्वारातून आंत मध्ये जाण्यास मनाई करण्यात आली.तसेच दिव्यांग वयोवृद्ध साई भक्तांना शेजारील अडचणीच्या प्रवेशद्वाराने आत सोडले जाते व्ही.आय.पी.साई भक्तांना दोन क्रमांकाच्या प्रवेश द्वारातून आत बाहेर जाऊ दिले जाते.तर चार क्रमांकाच्या प्रवेशद्वारातून संस्थान कर्मचारी व अधिकाऱ्यांना आत व बाहेर जाण्यास मुभा आहे.तसेच प्रवेश द्वार क्रमांक एक कायमस्वरूपी बंद करून प्रवेशद्वार क्रमांक पाच ने भाविकांना बाहेर सोडले जाते.साईभक्तांना व ग्रामस्थांना मंदिर परिसरातील शनिदेव,महादेव गणेश मंदिर,दत्त मंदिर,नंदादीप,ध्यानमंदिर व गुरुस्थान आदी ठिकाणी दर्शनाला जाणे साठी संपूर्ण दर्शन रांगेतून समाधी मंदिर द्वारे वरील ठिकाणी जावा लागते.त्यामुळे एवढ्या मोठ्या दर्शन रांगेतून एकदा गेलेला भक्त पुन्हा आत जाण्यास धजावत नाही.शिर्डीत दोन दिवस मुक्काम करून पूर्वीप्रमाणे मंदिर परिसरात शांतपणे बसावे,बाबांचे नामस्मरण करावे,अशी अनेक भाविकांची मनस्वी इच्छा असते.परंतु चुकीच्या नियोजनामुळे भक्तांना एकाच दिवसात शिर्डीतून बाहेर जावे लागते.या प्रश्नी भाविकांची मोठी नाराजी दिसून येत आहे.त्याचा परिणाम शिर्डीतील व्यावसायिकांच्या अर्थकारणावर मोठ्या प्रमाणावर झाला आहे.या सर्व गोष्टी ग्रामस्थांनी वेळोवेळी साईबाबा संस्थान प्रशासनातील अधिकाऱ्यांना निदर्शनास आणून दिल्या आहेत.परंतु अधिकारी याबाबत योग्य तो निर्णय घेण्या ऐवजी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतांना दिसतात.तसेच साई उद्यान इमारतीत लाडू काउंटर व सशुल्क दर्शन पास व्यवस्था सुरू करावी,गर्दी कमी असतांना भक्तांना पूर्वीचे १६ गुंठे शेजारील गेटने दर्शनास सोडावे, जेणेकरून भक्तांना साई समाधीचे वेळेतच दर्शन होईल.तसेच चारही गेट मधून भाविकांना दर्शनासाठी  
आत बाहेर जाण्यास खुले करावे,या संदर्भात निवेदन देण्यासाठी शांततेच्या मार्गाने भव्य मोर्च्याद्वारे शुक्रवार दिनांक २६ जुलै रोजी सकाळी ठीक १० वाजता मारुती मंदिराजवळ उपस्थित रहावे असे आवाहन
शिर्डी व्यापारी संघटना व शिर्डी ग्रामस्थ यांच्या वतीने करण्यात आले आहे.त्यामुळे याबाबत शिर्डी साईबाबा व्यवस्थापन आणि ग्रामस्थ यांच्यात वाद निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close