जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
आंदोलन

गोदावरीच्या शेती सिंचनासाठी शेतकऱ्यांचे होणार बंड !

न्यूजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

   गोदावरी कालव्याचे उन्हाळ आवर्तन १० मे रोजी सुटुनही अद्याप शेती सिंचनाच्या आवर्तनाबाबत नाशिक जलसंपदा विभाग तयार असल्याचे दिसत नाही परिणामी संतप्त शेतकऱ्यांनी आज सकाळी ८.३० वाजता वाकडी येथे हनुमान मंदिरात एका बैठकीचे आयोजन केले होते.या बैठकीत आंदोलनाची दिशा ठरविण्यात येऊन राहाता उपविभागास निवेदन देऊन जोरदार मागणी केली असता त्यांनी उन्हाळी आवर्तन देणार असल्याची माहिती दिली आहे.

  

राज्यातील बहुतांशी कालवे हे अस्तरीकरण झालेले असताना गोदावरी कालव्यांच्या अपवाद करण्यात आलेला आहे; परिणामी आज ७० टक्क्यातून अधिक पाण्याच्या अपव्यय होत आहे.खरे तर हे पाणी अपव्यय दाखवून त्यावर डोंगळ्याचा दरोडा सुरु असून त्यातून कोट्यवधी रुपयांची राजकीय नेते आणि अधिकाऱ्यांची चांदी होत आहे.त्यावर या बैठकीत चर्चा होणे अपेक्षित मानले जात आहे. 

  सदरचे सविस्तर वृत्त असे की,”दारणा धरण इंग्रजांनी शेती सिंचनासाठी बांधूनही वर्तमानकाळच्या इंग्रजांनी सदरचे पाणी नाशिक जिल्ह्यातील उद्योग आणि महानगरांना खिरापतीसारखे वाटून दिले आहे.वास्तविक महानगरे आणि उद्योगांना स्वतंत्र धरणे बांधणे गरजेचे असताना शेतीचे पाणी देऊन शेतकऱ्यांची होळी केली आहे.सन-१९५२ पासून पश्चिमीच्या पाण्याचे गाजर दाखवून शेतकऱ्यांना प्रत्येक निवडणुकीत निळवंडे धरणासारखे मूर्ख बनविण्याचे गोरख धंदे जोरात सुरू आहे.गोदावरी कालव्यांसाठी नाशिक जलसंपदा विभागाने पिकांची होळी केल्यावर दि.१० मे रोजी बिगरसिंचन पाणी आवर्तन दिले आहे.


  
   दरम्यान त्यांनी या पाण्यात शेती सिंचनेचे आवर्तन देणार का यावर काहीही भाष्य केलेले नाही.त्यामुळे ऊस,चारा व उन्हाळ पिके कशी वाचवायची याची चिंता शेतकऱ्यांना भेडसावत आहे मात्र नेते लोकसभा निवडणुकीच्या धुंदीतून अद्याप बाहेर आलेले नाही परिणामी त्यांची किंमत शेतकऱ्यांना चुकवावी लागत आहे.जलसंपदा विभागाने उन्हाळ शेती सिंचनासाठी ०७ क्रमांकाच्या फॉर्म भरून घेतला असला तरी त्यावर अद्याप निर्णय घेतलेला नाही.त्यामुळे उन्हाळ पिकांची होळी होणे क्रमप्राप्त आहे.त्यामुळे गोदावरी कालव्यांच्या लाभक्षेत्राखलील कोपरगाव,राहाता,श्रीरामपूर,निफाड आदी तालुक्यातील शेतकरी अस्वस्थ झाले आहे.त्यांनी या प्रकरणी एक घाव दोन तूकडे करण्यासाठी आज तातडीची बैठक राहाता तालुक्यातील वाकडी येथे हनुमान मंदिरात सकाळी ८.३० वाजता बोलावली होती.त्यात जलसंपदा विभागाच्या विरुद्ध मोठा संताप व्यक्त करून पाणी मागण्याचा निर्णय झाला होता.

दारणा धरण.

    या बैठकीस वाकडी,चितळी,रामपूर,जळगाव,गोंडेगाव,धनगरवाडी व पुणतांबा,कोपरगाव आदी परिसरातील शेतकऱ्यांना आवाहन केले होते.दरम्यान सदर बैठकीनंतर शेतकरी संघटित होऊन जलसंपदा विभागाच्या राहाता येथील कार्यालयात गेले होते त्या नंतर तेथील अधिकाऱ्यांनी जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलून उन्हाळ आवर्तन देण्याचा निर्णय जाहीर केला असल्याची माहिती शेतकरी समितीचे कार्यकर्ते रुपेंद्र काले यांनी दिली आहे.त्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close