जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
आंदोलन

…या गावात विविध मागण्यांसाठी आंदोलन !

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)


    कोपरगाव तालुक्यातील राजकीयदृष्टया महत्वाच्या गणल्या गेलेल्या पोहेगाव ग्रामपंचायत बरखास्त करुन पोहेगाव खुर्द व बुद्रुक अशा दोन स्वतंत्र ग्रामपंचायती स्थापन कराव्या,विविध योजनांचा खर्ची पडलेला विकास निधी परत वसूल करावा आदी विविध मागण्यासाठी आजपासून ग्रामपंचायत हद्दीत शिवसेनेचे शाखा प्रमुख शिवाजी रोहमारे यांनी बेमुदत धरणे आंदोलन सुरु केले आहे.त्यामुळे या आंदोलनाची पोहेगाव  आणि परिसरात उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे.

बेमुदत धरणे आंदोलन करणारे शिवाजी रोहमारे,शिवदूत,शिवसेना भवन,मुंबई.

  

“पोहेगावात पोहेगाव खुर्द व पोहेगाव बुद्रुक अशी दोन स्वतंत्र गावे असून गावात मोठी लोकसंख्या वाढली असल्याने त्यासाठी दोन स्वतंत्र ग्रामपंचायती स्थापन होणे गरजेचे आहे”-शिवाजी रोहमारे,शिवदूत,शिवसेना भवन,मुंबई.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,पोहेगाव येथील हद्दीत दोन गावे असून त्यात पोहेगाव खुर्द व पोहेगाव  बुद्रुक अशी दोन गावे अस्तित्वात असून निव्वळ पोहेगाव असे गावच अस्तित्वात नसल्याचा दावा शिवसेनेचे कार्यकर्ते व आंदोलनकर्ते शिवाजी रोहमारे यांनी नुकताच केला आहे.विशेष म्हणजे त्यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की,गावात खुद्द ग्रामपंचायतीने अतिक्रमण केलेले आहे.व त्यावर अनधिकृत कामे करून शासनाचा निधी वाया घालवलेला आहे.ग्रामपंचायतीचा कित्ता गिरवत अनेकांनी ग्रामपंचायत हद्दीत नदी पात्रात व जिल्हा परिषद शाळेच्या जागेत अतिक्रमण करून व्यापारी संकुल बांधून ग्रामपंचायतीचा महसूल बुडवला असल्याचा अजब दावा केला आहे.व त्याचा वाणिज्यिक कारणासाठी वापर करत असल्याचे म्हटले आहे.वर्तमानात ग्रामपंचायतीने जिल्हा परिषद शाळेचा रस्ता बंद केला आहे.सदर रस्ता पूर्ववत सुरु करून गावात पोहेगाव खुर्द व पोहेगाव बुद्रुक अशा दोन स्वतंत्र ग्रामपंचायती स्थापन करण्याची महत्वपूर्ण मागणी केली आहे.

  सदरच्या आंदोलनाच्या प्रति ग्रामविकास मंत्रालय,उपविभागीय आयुक्त नाशिक,उपविभागीय अधिकारी शिर्डी,तहसीलदार संदीपकुमार भोसले,गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी आदींना पाठवल्या असून त्यांची दखल ९० दिवसात न घेतल्याने शिवाजी रोहमारे यांनी आज दि.१२ डिसेंबर सकाळी १० वाजेपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरु केलं आहे.त्यांना विरोधी ग्रामपंचायत सदस्यांनी पाठींबा दर्शवला असल्याची विश्वसनीय माहिती हाती आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close