आंदोलन
“निळवंडेचे पाणी सोडले जात नाही तो पर्यंत आपले ‘उपोषण’ सोडले जाणार नाही”-इशारा
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
उत्तर नगर जिल्ह्यातील अवर्षण ग्रस्त १८२ दुष्काळी गावांना वरदान ठरणाऱ्या निळवंडे धरण प्रकल्पाच्या कालव्याद्वारे लाभक्षेत्रातील दुष्काळी गावांतील पाझर तलावात प्रस्तावित चाऱ्याद्वारे पाणी सोडले जात नाही तो पर्यंत आपले ‘आमरण उपोषण’ सोडले जाणार नाही असा स्पष्ट इशारा आंदोलनकर्ते ऍड.योगेश खालकर यांनी आज रांजणगाव देशमुख येथील एका कार्यक्रमात बोलताना दिला आहे.
सदर प्रसंगी निळवंडे कालवा कृती समितीचे मार्गदर्शक नानासाहेब जवरे,कार्याध्यक्ष गंगाधर रहाणे,सचिव कैलास गव्हाणे,सिकंदर इमानदार,कौसर सय्यद,भिवराज शिंदे,बाळासाहेब गोर्डे, प्रकाश गोर्डे,रवींद्र वर्पे,संतोष वर्पे, सुखलाल गांगवे,धनजन वर्पे,शिंदे,रावसाहेब मासाळ,प्रा.सीताराम कोल्हे,सुखदेव खालकर,
रामनाथ पाडेकर आदी प्रमुख कार्यकर्त्यांसह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
निळवंडे डाव्या कालव्याची दुसरी चाचणी बंद करण्याआधी लाभक्षेत्रातील सर्व पाझर तलाव,के.टी.वेअर प्रस्तावित चाऱ्यांच्या माध्यमातून भरून देऊन दुष्काळी पट्टयातील शेतकऱ्यांचे पशुधन वाचवून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था जलसंपदा विभागाने प्राधान्याने करावी अशी महत्वपूर्ण मागणी घेऊन रांजणगाव देशमुख या ठिकाणी आज सकाळी १० वाजता ऍड.योगेश खालकर, डॉ.अरुण गव्हाणे,माजी सरपंच कैलास रहाणे,गजानन मते,मनेगाव ग्रामपंचायत सरपंच अण्णासाहेब गांगवे,संजय बर्डे आदी कार्यकर्त्यांनी ‘आमरण उपोषण’ गत दोन दिवसांपासून सुरू ठेवले असून या आंदोलनाला पाठींबा व्यक्त करण्यासाठी परिसरातील शेतकऱ्यांनी तळेगाव मार्गे कोपरगाव-संगमनेर मार्गावर ‘रास्ता रोको आंदोलन’ आयोजित करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते.
सदर प्रसंगी आंदोलन कर्ते आदींनी निळवंडेचे पाणी प्रथम कोपरगाव तालुक्यातील पाझर तलावात पुंछ भागातून सोडून शिर्षस्थ भागात सोडावे ही प्रमुख मागणी लावून धरली आहे.
सदर प्रसंगी निळवंडे कालवा कृती समितीचे मार्गदर्शक नानासाहेब जवरे,कार्याध्यक्ष गंगाधर रहाणे,सचिव कैलास गव्हाणे,सुखदेव खालकर,सिकंदर इमानदार,कौसर सय्यद,भिवराज शिंदे,बाळासाहेब गोर्डे, प्रकाश गोर्डे,रवींद्र वर्पे,संतोष वर्पे, सुखलाल गांगवे,धनजन वर्पे,शिंदे,रावसाहेब मासाळ,प्रा.सीताराम कोल्हे,रामनाथ पाडेकर आदी प्रमुख कार्यकर्त्यांसह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
मात्र जो पर्यंत डांगेवाडी (काकडी) वेस-सोयगाव,बहदराबाद आदी पाझर तलावात पाणी प्रथम सोडले जात नाही पुंछ भाग ते शिर्षस्थळा पर्यंत पाणी जात नाही तो पर्यंत,”आमरण उपोषण” सोडले जाणार नाही असे बजावले आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,”आगामी निवडणुका पाहून स्थानिक नेत्याच्या पुढाकाराने पंतप्रधान नरेंद्र मोदी दि.२६ ऑक्टोबरला शिर्डीमध्ये येऊन त्यांच्या उपस्थितीत निळवंडे धरण प्रकल्पाचे लोकार्पणासह शिर्डी विमानतळाच्या विस्तारित इमारतीचे भूमिपूजन,साई संस्थानच्या शाळेचे उद्घाटन,महसूल भवन इमारतीचे भूमिपूजन,साईबाबा मंदिराच्या दर्शन रांगेचे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न केले आहे.मात्र यातील उत्तर नगर जिल्ह्यातील अवर्षणग्रस्त १८२ गावांना वरदान ठरणाऱ्या निळवंडे प्रकल्पाचा डावा कालवा १० तर उजवा कालवा २५ टक्के,वितरण व्यवस्था १०० टक्के अपूर्ण आहे.उजव्या कालव्याचे राहुरी तालुक्यात भूसंपादन अद्याप बाकी आहे.एकुणात हा प्रकल्प अद्याप जवळपास ३५ टक्के अपूर्ण असून सुद्धा या ५३ वर्ष प्रलंबित प्रकल्पाचे कामाचे लोकार्पण करण्याचा प्रस्थापित नेत्यांनी आगामी लोकसभा,विधानसभा,जिल्हा परिषद,पंचायत समित्यांच्या निवडणुका पाहून डाव आखला व त्यानुसार त्या कटाची अंमलबजावणी सुरू केल्याने त्याचे पडसात दुष्काळी भागात तीव्र स्वरूपात उमटले आहे.गत १४ ऑक्टोबर रोजी पाणी सोडून व एक टी.एम.सी.पाणी खर्ची पडले आहे व महिना उलटला तरी कोपरगाव तालुक्यातील पाझर तलावात एक थेंब पाणी आलेले नाही.त्यामुळे दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आगामी काळात दुष्काळाचा सामना कसा करायचा,पिण्याच्या पाण्याबरोबर,आपले पशुधन कसे वाचवायचे असे गंभीर प्रश्न निर्माण झाले आहे.या पार्श्वभूमीवर दुष्काळी भागात तीव्र स्वरूपाचे पडसात उमटले असून संगमनेर येथे कालवा कृती समितीने तर करुले संगमनेर येथे पाणी येत नसल्याने दुष्काळी ग्रामस्थांनी आंदोलन छेडले आहे.सर्वत्र प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध आंदोलन छेडले आहे.रांजणगाव देशमुख येथेही पडसाद उमटले असून आज संपन्न झालेल्या आंदोनात अनेकांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे.
सदर प्रसंगी प्रास्तविक ऍड.योगेश खालकर यांनी केले तर उपस्थितांना बाळासाहेब गोर्डे,धनंजय वर्पे,सुखलाल गांगवे,अनिल खालकर,शिवाजी शेंडगे,अमर देशमुख,कैलास रहाणे आदींनी उपस्थित जलसंपदा अधिकारी व महसूल अधिकाऱ्यांवर गलथान नियोजनावर चांगलेच तोंडसुख घेतले आहे.उपस्थितांचे आभार सचिन खालकर यांनी मानले आहे.