आंदोलन
कोपरगावात…या संघटनेचे आंदोलन !

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
अखिल भारतीय मुद्रांक संघटनेच्या वतीने फ्रॅंक पद्धती विरोधासह आपल्या विविध मागण्यासंबंधी आज कोपरगाव तहसील कार्यालयासमोर एक दिवशीय मुद्रांक विक्री बंद आंदोलन करण्यात आले आहे.

राज्यात तालुक्याच्या ठिकाणी स्टँप विक्रीसाठी मुद्रांक विक्रेते विशिष्ट कमिशनवर नेमलेले असतात.त्यावर मुद्रांक विक्रेते यांच्या कुटुंबाची गुजराण चालत असते.मात्र अलीकडील बदलत्या काळात सरकारने १०० व ५०० रुपयांचे स्टँप विक्रि बंद करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे त्यांनी हा आंदोलनाचा पावित्रा घेतला आहे.
त्यांनी आपल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की,”मुद्रांक शुल्क,मालमत्तेशी सबंधित कोणताही व्यवहार करताना हे मुद्रांक शुल्क भरावं लागतं.तुम्ही घर घेतलं किंवा व्यावसायिक वापरासाठी जागा घेतली तर स्टँप ड्युटी भरावी लागते.ही ड्युटी राज्यामध्ये महानगरं,शहरं,गावं यांच्यासाठी वेगवेगळी असते.त्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी स्टँप विक्रीसाठी मुद्रांक विक्रेते नेमलेले असतात त्याना सरकार विशिष्ट कमिशन देते व त्यावर मुद्रांक विक्रेते यांची व त्यांच्या कुटुंबाची गुजराण चालत असते.मात्र अलीकडील बदलत्या काळात सरकारने १०० व ५०० रुपयांचे स्टँप विक्रि बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.त्या ऐवजी सरकार फ्रॅकिंग पद्धती लागू करत आहे.त्यास मुद्रांक विक्रेते संघटना यांचा विरोध आहे.त्यामुळे कोपरगाव येथे आज सकाळी मुद्रांक विक्रेते संघटना यांनी या घटनेचा निषेध करून आज सरकारच्या विरुद्ध दंड थोपटले आहे.मुद्रांक विक्री बंद केल्यास मुद्रांक विक्रेते यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होईल असा आरोप केला आहे.
राज्यात एकूण ०३ हजार ५०० मुद्रांक विक्रेते असून त्यांच्या व्यवसायाशी बॉण्ड रायटर ऑपरेटर आदी अनेक लोक निगडित आहे.त्यांच्या उदर भरणाचा प्रश्न निर्माण होईल असा आरोप केला आहे.शेतकरी,कामगार,आदींना पीक कर्ज घेण्यास शहरात यावे लागणार आहे.त्यामुले त्यांचा वेळ व पैसा खर्च होऊन त्यांची आर्थिक अडचण होईल असा आरोप केला आहे.त्यामुळे सरकारने मुद्रांक विक्री बंद करू नये अशी मागणी केली आहे.
सदर निवेदनावर दिलीप बाबुराव कानडे,संजय उत्तमराव दुशिंग,कारभारी साळूबा पवार,प्रकाश शंकरराव गायकवाड,सूर्यकांत चांगदेव टेके,हनुमंत तुकाराम मेहेत्रे,श्रद्धा राजेंद्र वाघ,बाळासाहेब लक्ष्मणराव लोंढे आदींच्या सह्या आहेत.