आंदोलन
…या गावाचा मराठा आरक्षणास पाठींबा !

न्यूजसेवा
कोपरगाव-(शिवाजी गायकवाड)
मराठा समाजाला सरकारी नोकऱ्यांत आरक्षण द्यावे अशी मागणी महाराष्ट्रात मराठा समाजातर्फे केली जात असून यासाठी मराठा समाजातील लोकांनी आंदोलने केली आहे.मनोज जरांगे यांना सरकारने दिलेली चाळीस दिवसांची मुदत संपल्याने त्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचे रणशिंग फुंकले आहे.त्यासाठी कोपरगाव शहर आणि तालुक्यात पाठिंबा मिळत आहे.संवत्सर येथील मराठा समाजातींल नागरिकांनी एकत्र येऊन आपला पाठींबा दिला असल्याची माहिती आमचे प्रतिनिधी शिवाजी गायकवाड यांनी दिली आहे.

मराठा समाजाच्या आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी स्थगित केलेले उपोषण दि.२५ऑक्टोबर पासून आंतरवली सराटी येथे पुन्हा उपोषण सुरु केले आहे.मराठा समाज बांधवांनी कोणतेही उग्र आंदोलन न करता जो पर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत लोकशाही मार्गाने साखळी उपोषण करावे असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे.त्या आवाहनाला प्रतिसाद देत मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाजाकडून साखळी उपोषण केले जात आहे.
कोपरगाव शहरात मराठा समाजाच्या वतीने आंदोलनाला पाठिंबा दिला जात असताना आज शहराच्या पूर्वेस साधारण सहा कि.मी.अंतरावर असलेल्या संवत्सर येथील नागरिकांनी आपला पाठींबा दिला आहे.त्यासाठी तेथील ग्रामविकास अधिकारी श्री अहिरे यांना निवेदन दिले आहे.

सदर प्रसंगी संवत्सर येथील ग्रामस्थानीं कोणाही समाज घटकांच्या भावना न दुखवता आंदोलन करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सदर प्रसंगी लक्ष्मण साबळे,ज्ञानेश्वर परजणे,भाऊसाहेब कासार,भरत बोरणारे,महेश परजणे,पांडुरंग शिंदे,दिलीप बोरणारे,मधुकर साबळे,डॉ.गिडमे,विवेक परजणे,तुषार बारहाते,नामदेव पावडे,बापू गायकवाड,संभाजी भोसले,आंनदराव बारहाते,अनिल काळे,चंद्रकांत लोखंडे,अनिल आचारी,सुधाकर परजणे,बाळासाहेब दहे,शेटे सर,गणपत रानोडे,राजेंद्र नवाळे,राजेंद्र वाकचौरे आदींची प्रमुख उपस्थिती लाभली होती.
सदर प्रसंगी प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून उपस्थित मान्यवर लक्ष्मण साबळे,ज्ञानेश्वर परजणे,भाऊसाहेब कासार,भरत बोरणारे,महेश परजणे,पांडुरंग शिंदे,दिलीप बोरणारे,मधुकर साबळे,डॉ.गिडमे,विवेक परजणे,यांनी मार्गदर्शन केले आहे.