जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
आंदोलन

चोर सोडून संन्याशाला फाशी-…या संघटनेचा आरोप

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)
 
   समृद्धी महामार्गावर नूकताच जांबरगाव टोल नाक्याच्या पुढे टेंपो ट्रॅव्हलर व ट्रकचा नुकताच भीषण अपघात होऊन त्यात परिवहन अधिकारी जबाबदार असताना त्या गुन्ह्यात ट्रक चालकास जबाबदार धरून त्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.हि गंभीर बाब असून निरपराध ट्रक चालकास गुंतविण्यात आले असल्याचा आरोप कोपरगाव ट्रक-चालक मालक ट्रान्सपोर्ट असोसिएशन यांनी वैजापूर येथील पोलीस निरीक्षक यांचे कडे निवेदन देऊन केला आहे.

  

सदर घटनेत खाजगी रस्ता वाहतूक नियंत्रण अधिकारी (आर.टी.ओ.) जबाबदार असून त्याला आरोपी क्रमांक एक करणे गरजेचे असताना उलट गुन्हा दाखल झाला आहे.त्या गुन्ह्यात आरोपी आर.टी.ओ.व छत्रपती ट्रॅव्हलर्स यांचे खाजगी भाडोत्री वाहन व त्यांचा खाजगी चालक हे जबाबदार आहेत.ट्रक चालकास विनाकारण बळीचा बकरा बनवला असल्याचा आरोप आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,”वैजापूर जवळील समृध्दी महामार्गावर हडस पिंपळगाव टोलनाक्याजवळ आर.टी.ओ.अधिकाऱ्यांनी दि.१४ ऑक्टोबर रोजी (एम.पी. ०९ एच.एच. ६४८३ क्रमांकाच्या) ट्रक चालकाला हात देऊन थांबवलं. यावेळी प्रवाशांच्या ट्रॅव्हल्स बस ट्रकला पाठीमागून धडकली आणि अपघात झाला.उभ्या ट्रकला ट्रॅव्हल्स बसने जोराची धडक दिल्याने भीषण अपघात झाला.या भीषण अपघातात यामध्ये १२ जणांचा मृत्यू झाला असून तर २३ गंभीर जखमी झाले आहेत.यामध्ये चार महिन्यांचा बाळाचा देखील समावेश आहे.

   सदर घटनेत खाजगी रस्ता वाहतूक नियंत्रण अधिकारी (आर.टी.ओ.) जबाबदार असून त्याला आरोपी क्रमांक एक करणे गरजेचे असताना उलट गुन्हा दाखल झाला आहे.त्या गुन्ह्यात आरोपी आर.टी.ओ.व छत्रपती ट्रॅव्हलर्स यांचे खाजगी भाडोत्री वाहन व त्यांचा खाजगी चालक हे जबाबदार आहेत.ट्रक चालकास विनाकारण बळीचा बकरा बनवला असल्याचा आरोप आहे.
   सदर वहातून नियंत्रक याने किरकोळ लाचेच्या स्वार्थासाठी हा उद्योग केला असल्याचा आरोप करून सदर ट्रक चालकास दोषमुक्त करावे अशी मागणी शेवटी कोपरगाव ट्रक-चालक मालक ट्रान्सपोर्ट असोसिएशन यांनी वैजापूर येतील पोलीस निरीक्षक यांचे कडे निवेदन देऊन केला आहे.

सदर निवेदनावर कोपरगावचे अध्यक्ष आयुब कच्छी,वैजापूर वाहतूक संघटनेचे अध्यक्ष शंकेश्वर मुळे,सचिन सोनवणे,राजेंद्र कोल्हे,वसीम सय्यद,किरण वैद्य,राजू अन्वर खान,विलास वाळुंज,नंदू वाळुंज आदींच्या सह्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close