जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
आंदोलन

बहुचर्चित अतिवृष्टी अनुदान मिळण्यास सुरुवात-…यांची माहिती

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

गेल्या वर्षी पावसाळ्यात राज्यात अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली होती.तर काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे शेतीचं नुकसान झालं होतं.या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारने भरपाई जाहीर केली होती.उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी २४ जुलै विधान परिषदेत घोषणा करून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली होती त्या विरोधात कोपरगाव तालुका कृती समितीने दोन-तीन वेळेस आंदोलन करून न्याय मागीतला होता त्यास अखेर यश आले असून सदरच्या रकमा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होऊ लागल्या असल्याची माहिती समितीचे कार्यकर्ते तुषार विध्वंस यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.

दरम्यान या अनुदान प्रक्रियेत तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांची ई.के.वाय.सी.भरणे बाकी असेल त्यांनी आपल्या जवळच्या आधारसेतू केंद्रामध्ये जाऊन आपली ई.के.वाय.सी.प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी,परिणामस्वरूप त्यांना नुकसान भरपाई मिळण्यास सोयीचे ठरणार असल्याचे आवाहन कोपरगाव तालुका शेतकरी कृती समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,”गेल्या वर्षी पावसाळ्यात राज्यात अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली होती.तर काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे शेतीचं नुकसान झालं होतं.या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारने भरपाई जाहीर केली होती.उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी २४ जुलै विधान परिषदेत घोषणा करून,’गेल्या वर्षी पावसाळ्यात अतिवृष्टी,पूर,गोगलगायींचा प्रादुर्भाव,सततचा पाऊस यामुळे शेतीपिकांच्या झालेल्या नुकसान भरपाईसाठी ८ हजार ६७७ कोटी रुपये तर यंदा मार्च आणि एप्रिल महिन्यात अवेळी पावसाने झालेल्या शेतीपिकांच्या नुकसान भरपाईसाठी ५१३ कोटी रुपयांचा निधी वितरीत करण्यास शासनाने मान्यता दिली असल्याची घोषणा केली होती.मात्र ती शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली नव्हती त्यामुळे सरकार विरोधात राज्यातील शेतकऱ्यांत अच्छा-खांसा राग होता.त्या विरुद्ध कोपरगाव येथील कोपरगाव तालुका शेतकरी कृती समितीच्या वतीने दि.३१ जुलै रोजी कोपरगाव तहसील कार्यालय बाहेर,’बेमुदत आमरण उपोषणा’ला सुरुवात केली होती.त्यावेळी कोपरगावचे तहसीलदार संदीपकुमार भोसले यांच्याशी शेतकरी कृती समितीशी चर्चा व त्यानंतर लेखी आश्वासन प्राप्त झाल्यानंतर ते उपोषण स्थगित करण्यात आले होते व त्यावेळी तहसीलदार भोसले यांनी लवकरात लवकर शेतकऱ्यांचा विदा हा सरकारी पोर्टलवर भरण्यात येईल व निधी मिळण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल असे आश्वासन दिले होते.त्या नंतर त्यावेळी उपोषण स्थगित केले होते.त्यानंतरही शेतकरी कृती समिती च्या वतीने तुषार विद्वांस व इतर सदस्य हे वारंवार प्रशासनाकडे जाऊन पाठपुरावा करत होते व त्यात कोपरगाव तहसील कार्यालयाचे तसेच इतर सर्व प्रशासकीय विभागाचे अधिकारी आदींनी सहकार्य केले होते.

  

दरम्यान काल दिनांक ०३ ऑक्टोबर पर्यंत जवळपास कोपरगाव तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांपैकी जवळपास २२ हजार शेतकऱ्यांचा विदा हा शासकीय पोर्टलवर भरून झाला होता.बहुतांश शेतकऱ्यांनी इ.के.वाय.सी.ची पूर्तता पूर्ण केली आहे.

त्यानंतर जवळपास महिना उलटून गेला तरी काही शासकीय त्रुटीमुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळत नसल्याने दिनांक २५ ऑगस्ट  पासून स्थगित उपोषण पुन्हा सुरू करण्यासाठी तहसीलदार यांना निवेदन दिले होते.तथापि तहसीलदार यांनी कृती समितीचे सदस्य प्रवीण शिंदे तसेच संतोष गंगवाल यांच्याशी तसेच विविध प्रशासनाचे अधिकारी यांची दि.२२ ऑगस्ट रोजी संयुक्तिक बैठक घेऊन येत्या आठ दिवसात सर्व शेतकऱ्यांना मदत मिळण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करणार असल्याची लेखी ग्वाही दिली होती.त्यामुळे  कृती समितीचे उपोषण पुन्हा एकदा स्थगित करण्यात आले होते.

दरम्यान काल दिनांक ०३ ऑक्टोबर पर्यंत जवळपास कोपरगाव तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांपैकी जवळपास २२ हजार शेतकऱ्यांचा विदा हा शासकीय पोर्टलवर भरून झाला होता.बहुतांश शेतकऱ्यांनी इ.के.वाय.सी.ची पूर्तता पूर्ण केली आहे.तहसीलदार यांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक ०३ ऑक्टोबर  पासून सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना मदत त्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे त्याबद्दल तहसीलदार त्यांचे प्रशासन तसेच इतर सर्व प्रशासकीय यंत्रणा यांचे कोपरगाव तालुका शेतकरी कृती समितीच्या वतीने जाहीर आभार मानले आहे.

दरम्यान या प्रक्रियेत ज्या शेतकऱ्यांची ई.के.वाय.सी.भरणे बाकी असतील त्यांनी आपल्या जवळच्या आधारसेतू केंद्रामध्ये जाऊन आपली ई.के.वाय.सी.प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी,परिणामस्वरूप त्यांना नुकसान भरपाई मिळण्यास सोयीचे ठरणार असल्याचे आवाहन कोपरगाव तालुका शेतकरी कृती समितीच्या वतीने पद्माकांत कुदळे,प्रवीण शिंदे, तुषार विद्वांस,संतोष गंगवाल,नितीन शिंदे,सदाशिव रासकर,अनिल शेवते,नरेंद्र गिरमे,योगेश गंगवाल,अनिल गायकवाड,किशोर टिळेकर आदींनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close