आंदोलन
लोकशाहीर साठे पुतळ्याचे अनावरणाचे नियोजन करा-या नेत्याची सूचना
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरातील लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे शासकीय पद्धतीने अनावरण करण्यासाठी नियोजन करून मातंग समाजाच्या उर्वरित मागण्या तातडीने पूर्ण करा अशा सूचना आ.आशुतोष काळे यांनी कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांना दिल्या असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
कोपरगाव शहरातील सत्यशोधक लहुजी क्रांती सेनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी सत्यशोधक लहुजी क्रांती सेनेचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष फकिरा चंदनशिव व त्यांच्या सहकाऱ्यांचे कोपरगाव शहरातील लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ,’आमरण उपोषण आंदोलन’ सुरु असून या उपोषणकर्त्यांची आ.काळे यांनी भेट देऊन त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या त्या वेळी त्यांनी या सूचना केल्या असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
सदर प्रसंगी उपोषणकर्ते फकिरा चंदनशिव,मच्छिन्द्र शिरसाठ,दौलत शिरसाठ,अनिल जाधव,अनिल पगारे,रविंद्र डोलारे,अर्जुन मरसाळे,सुरेश मरसाळे,राहुल गायकवाड,मुख्याधिकारी शांताराम गोसावी,कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती उत्तमराव औताडे,शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख,सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश येसेकर,माजी नगराध्यक्ष पद्मकांत कुदळे,महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमचंद बागरेचा,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक अॅड. राहुल रोहमारे,राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील गंगूले,माजी नगरसेवक गटनेते विरेन बोरावके, मंदार पहाडे,कृष्णा आढाव,फकिर कुरेशी,दिनकर खरे,राजेंद्र वाकचौरे,अजीज शेख,सुनील शिलेदार,विद्यार्थी तालुकाध्यक्ष निखील डांगे,डॉ.तुषार गलांडे,बाबुराव खालकर,डॉ.अनिरुद्ध काळे आदींसह बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”सर्व समाजाच्या थोर महा पुरुषांचा मला अभिमान असून लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्याप्रती आदर आहे.त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे शासकीय पद्धतीने अनावरण व्हावे हि माझी मनापासून इच्छा होती व आजही आहे.त्यामुळे मागील वर्षी दि.०६ एप्रिल २०२२ रोजी राज्याचे मुख्यमंत्री अजित पवार पंचायत समितीच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या कर्मवीर शंकरराव काळे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण व विविध विकास कामांच्या लोकार्पण व शुभारंभासाठी कोपरगाव येथे आले असता त्यांच्या हस्ते लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे शासकीय पद्धतीने अनावरण करण्यासाठी नियोजन केले होते.मात्र यामध्ये काही व्यक्तींनी राजकारण आणून हे अनावरण त्यावेळी होवू दिले नाही.त्यामुळे असंख्य मातंग समाज बांधवांसह आपल्याला वाईट वाटले.परंतु मातंग समाजाच्या मागणीनुसार लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे शासकीय पद्धतीने अनावरण करण्यासाठी कोपरगाव नगरपरिषद प्रशासनाने योग्य नियोजन करावे.तसेच लोकशाहीर साठे खुले नाट्यगृहाच्या नूतनीकरणाचे काम तातडीने सुरु करून मातंग समाजाच्या इतर मागण्या तातडीने पूर्ण कराव्या अशा सूचना आ. काळे यांनी नगरपरिषद प्रशासनाला शेवटी दिल्या आहेत.