जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
आंदोलन

कोपरगावातील…या पुतळ्याच्या अनावरणासाठी आंदोलन !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अधिकृत शासकीय अनावरण करण्याच्या रास्त मागणीसाठी आज अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यासमोर सत्यशोधक लहुजी क्रांती सेनेच्या वतीने,’आमरण उपोषण आंदोलन’ सुरु करण्यात आले आहे.त्यामुळे सत्ताधारी कार्यकर्त्यांचे धाबे दणाणले आहे.

दरम्यान यापूर्वी कोपरगाव येथील सत्यशोधक अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यास टाळाटाळ करणाऱ्या राजकीय नेत्यांचा निषेध नोंदवून लोक स्वराज्य आंदोलनाचे अध्यक्ष अड्.नितीन पोळ यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी केली होती.त्याचे स्मरण झाले आहे.

कोपरगाव येथे गेल्या दहा बारा वर्षा पासून अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णकृती पुतळा व्हावा यासाठी समाजातील विविध संघटना नेते यांनी विविध पद्धतीने अर्ज,विनंत्या आंदोलने केली मागील दिड वर्षांपूर्वी नियोजित जागेवर पुतळा बसवण्यात आला मात्र नगर पालिकेचे विसर्जन झाल्याने पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण न करता पुतळा झाकून ठेवला अखेर समाज बांधवांचा उद्रेक होऊन मागील वर्षी पुतळा समाज बांधवांनी आंदोलन करून खुला केला मात्र एक वर्ष होऊन गेले तरी पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण केले नाही.कोपरगाव तालुक्यातील राजकीय नेत्यांनी निवडणुकीत समाजाच्या मतांवर डोळा ठेऊन समाज बांधवांची दिशाभूल केली गेली.राजकीय नेत्यांनी जाणीव पूर्वक समाज बांधवांमध्ये वाद तेवत ठेऊन पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण होऊ दिले नाही असा या समाजातील कार्यकर्त्यांचा आरोप आहे.

दरम्यान या असंतोषाचा उद्रेक नुकताच पाहायला मिळाला आहे.कोपरगाव शहरातील सत्यशोधक लहुजी क्रांती सेनेच्या वतीने नितीन शिंदे यांनी आज सकाळी अकरा वाजता,’आमरण उपोषण आंदोलन’ सुरु करण्यात आले आहे.

सदर प्रसंगी संघटनेचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष आदींसह बहुसंख्यने कार्यकर्ते उपस्थित होते.त्या आंदोलनास अनेक कार्यकर्त्यानी पाठींबा दिला आहे.

दरम्यान यापूर्वी कोपरगाव येथील सत्यशोधक अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यास टाळाटाळ करणाऱ्या राजकीय नेत्यांचा निषेध नोंदवून लोक स्वराज्य आंदोलनाचे अध्यक्ष अड्.नितीन पोळ यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी केली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close