निवडणूक
कोपरगाव तालुक्यात…या वि.का.सेवा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची निवडणूक संपन्न

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील नाटेगाव विविध सेवा सोसायटीच्या अध्यक्ष,उपाध्यक्ष पदाची निवडणूक नुकतीच पार पडली असून या निवडणुकीत काळे गटाचे गणेश वसंतराव मोरे यांची अध्यक्षपदी तर भारती राऊसाहेब पिंगळे यांची उपाध्यक्ष पदी बिनविरोध निवड झाली आहे.नूतन पदाधिकाऱ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
नाटेगाव वि.का.सेवा.संस्थेच्या निवडणुकीत अध्यक्ष पदासाठी गणेश वसंतराव मोरे व उपाध्यक्ष पदासाठी भारती राऊसाहेब पिंगळे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. या दोन्ही पदासाठी एकेक अर्ज मुदतीच्या आत दाखल झाल्यामुळे निवडणूक अधिकारी आर.एन गांगुर्डे यांनी गणेश वसंतराव मोरे यांची अध्यक्ष पदी तर भारती राऊसाहेब पिंगळे यांची उपाध्यक्ष पदी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.
राजकीय दृष्ट्या महत्वाच्या असलेल्या नाटेगाव सोसायटीची सत्ता मागील ३८ वर्षापासून काळे गटाच्या ताब्यात आहे.माजी आ.अशोक काळे व श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या निवडणुकीत काळे गटाचे १० सदस्य निवडून येवून पुन्हा एकदा सोसायटीवरील काळे गटाने सत्ता राखली आहे.सोसायटीच्या अध्यक्ष उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक नुकतीच पार पडली आहे.
या निवडणुकीत अध्यक्ष पदासाठी गणेश वसंतराव मोरे व उपाध्यक्ष पदासाठी भारती राऊसाहेब पिंगळे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. या दोन्ही पदासाठी एकेक अर्ज मुदतीच्या आत दाखल झाल्यामुळे निवडणूक अधिकारी आर.एन गांगुर्डे यांनी गणेश वसंतराव मोरे यांची अध्यक्ष पदी तर भारती राऊसाहेब पिंगळे यांची उपाध्यक्ष पदी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.निवडणूककामी सोसायटीचे सचिव दत्तात्रय वाघ यांनी मदत केली आहे.
यावेळी उपस्थित असलेल्या नवनिर्वाचित संचालकांनी व काळे गटाच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करीत जल्लोष केला.मोरे बाळू पोपट,मोरे सतीश कारभारी,मोरे अंबादास धोंडीबा,मोरे घमा सुकदेव,मोरे लीलाबाई तान्हाजी,मोरे रंजना रघुनाथ,मोरे संतोष इंद्रभान,भालके भरत छबुराव आदी सदस्यांसह काळे गटाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
सोसायटीचे नवनिर्वाचित अध्यक्ष,उपाध्यक्ष यांचे माजी आ.अशोक काळे व श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आशुतोष काळे यांनी अभिंनदन केले आहे.