जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
आंदोलन

…तर ‘त्या’गुन्हेगारांचा जागेवरच बंदोबस्त,कोपरगावात संघटनांचा इशारा !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

कोपरगाव शहरात ‘लव्ह जिहाद’ प्रश्नी एवढा प्रचंड मोर्चा होऊनही जिहादी प्रवृत्ती अद्याप शमलेली दिसत नाही त्यामुळे पोलिसांनी याबाबत लक्ष देऊन शाळा,महाविद्यालये आदी ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवावा व महिला भिगिणींचे संरक्षण करावे.राहुरी तालुक्यातील घटना महिला व महाविद्यालयीन मुली सुरक्षित राहिल्या नाही याची साक्ष देत आहे.”त्या घटनेचा निषेध करताना या प्रवृत्तीचा संबंधित समाजाने नायनाट करावा अन्यथा आगामी काळात होणारा मोर्चा शांततेत होईल याची कोणीही खात्री देऊ शकत नाही या अप्रवृत्तीचा जागेवरच बंदोबस्त करू”असा इशारा कोपरगाव तालुक्यातील सकल हिंदू समाजाच्या वतीने नुकताच कोपरगावचे तहसीलदार संदीपकुमार भोसले यांना दिला आहे.

कोपरगाव शहरातील शाळा,महाविद्यालये,शिकवणी वर्ग,बस स्थानके,चित्रपट गृहे आदी ठिकाणी घडणाऱ्या ‘लव्ह जिहाद’च्या घटनांचा पोलिसांनी बंदोबस्त करावा.मुस्लिम समाजाने याची गंभीर दखल घेतली तर बरेच अन्यथा प्रत्येक वेळी शांततेत आंदोलन वा निषेध होईल याची कोणीही खात्री देणार नाही असे आवाहन करून या भावना शासनापर्यंत पोहचवाव्या अशी विनंती तहसीलदार,शहर आणि तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले व वासुदेव देसले आदींना केली आहे.व शेवटी कोपरगाव शहरातील बेकायदा दर्गे,मदरसे,मस्जिदी यांचेवर कारवाई करावी अशी मागणी शेवटी केली आहे.

कोपरगाव शहरात,’लव्ह जिहाद’च्या प्रकार उघड झाला असल्याने हिंदू संघटना खडबडून जाग्या झाल्या असल्याचे दिसून आले होते व त्यांनी मागील महिन्यात दि.२० जुलै २०२३ रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुर्णाकृती पुतळ्यासमोर सुमारे दीड लाख नागरिक,महिला जमून,’हिंदू जनाक्रोश मोर्चा’चे आयोजन केले होते.त्यातील एक आरोपी अद्याप फरार असतांना राहुरी तालुक्यातील लव्ह जिहाद व धर्मपरिवर्तनाची संतप्त घटना उघडकीस आली आहे.

नगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील उंबरे गावची घटना असून यात १० ते १५ अल्पवयीन मुलींना एका शिकवणीची शिक्षिका शिकण्याच्या माध्यमातून इर्फान पठाण नावाच्या माणसाला बोलवून या मुलींना बळजबरीने कुराण वाचायला लावत होती.मुस्लिम समाजाचे सण साजरे करायला लावत होती.मुस्लिम समाजाच्या इतर मुलांना बोलवून फोटो काढत होती.फोटो मॉर्फ करुन ‘लव्ह जिहाद’च्या माध्यमातून मुलींना पळवुन नेच्यांचे व त्यांचे काळेबेरे करण्याचे काम राजरोस सुरु होतं.एका मुलीने हिंमत करुन सगळा प्रकार पालकांना सांगितल्यावर हा बोभाटा झाला होता.त्याची सर्वत्र निंदा होत आहे.

कोपरगाव येथील ‘लव्ह जिहाद’घटनेतील तीन आरोपी इमरान आयुब शेख (वय-३१) मोबाईल शॉपी,रा.आयेशा कॉलनी,फय्याज वहाब कुरेशी (वय-४५)रा.कोपरगाव,सायन शहाबुद्दीन कुरेशी (वय-१९),रा.साठ,जुना पिठा इंदोर मध्यप्रदेश आदींना अटक केली होती तर अद्याप एक आरोपी छोटू उर्फ कलीम हा अटक करावयाचा बाकी असून त्यावर कारवाई झालेली नाही मात्र त्यावर कोणाही संघटनेने,’जनाक्रोश मोर्चा’नंतर ‘ब्र’ शब्द काढला नाही हे विशेष !

या प्रकरणी भाजपचे आ.प्रसाद लाड यांनी लव जिहादचे एक मोठे प्रकरण विधानसभेत उघडकीस आणले आहे.अ.नगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात,’लव जिहाद’ सुरू असल्याचा आरोप लाड यांनी विधानपरिषदेत बोलताना केला होता.तसेच या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दिले आहेत.त्याचे पडसाद जिल्ह्यासह राज्यात उमटत असून कोपरंगाव शहर त्यास अपवाद नाही.आज सकाळी हिंदुत्ववादी संघटना पुन्हा एकदा २० जुलै २०२३ नंतर एकत्र आल्या आहे.

त्यांनी आज कोपरगावचे तहसीलदार विजयकुमार भोसले यांना आपल्या मागण्याचे निवेदन दिले आहे.त्यात त्यांनी म्हटले आहे की,”कोपरगाव शहर आणि तालुक्यातील हिंदुत्ववादी जनतेने ‘लव्ह जिहाद’ व बळजबरीने धर्मांतरण या बाबत कडकडीत बंद ठेवून शहरात मोठा मोर्चा काढला होता.त्यामुळे तरी या अनूचित प्रकारास आळा बसेल अशी सामान्य माणसांची भावना होती.मात्र ती राहुरी तालुक्यातील उंबरे गावातील ‘लव्ह जिहाद’ आणि ‘धर्मांतरण’ घटनेने फोल ठरवली आहे.देशात धर्मांध शक्ती माजल्या असून त्या कोणालाही घाबरायला तयार नाही.आम्ही त्या घटनेचा निषेध करत असून त्या निमित्ताने कोपरगाव शहरातील शाळा,महाविद्यालये,शिकवणी वर्ग,बस स्थानके,चित्रपट गृहे आदी ठिकाणी घडणाऱ्या ठिकाणचा पोलिसांनी बंदोबस्त करावा.मुस्लिम समाजाने याची गंभीर दखल घेतली तर बरेच होईल अन्यथा प्रत्येक वेळी शांततेत आंदोलन वा निषेध होईल याची कोणीही खात्री देणार नाही असे आवाहन करून या भावना शासनापर्यंत पोहचवाव्या अशी विनंती तहसीलदार,शहर आणि तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले व वासुदेव देसले आदींना केली आहे.व शेवटी कोपरगाव शहरातील बेकायदा दर्गे,मदरसे,मस्जिदी यांचेवर कारवाई करावी अशी मागणी शेवटी केली आहे.

सदर निवेदनावर कोपरगाव नगरपरिषदेचे माजी अध्यक्ष विजय वहाडणे,शिवसेनेचे माजी जिल्हा उपाध्यक्ष कैलास जाधव,शहर प्रमुख सनी वाघ,माजी अध्यक्ष कलविंदर दडियाल,सुनील तिवारी,मनसेचे तालुकाध्यक्ष अनिल गायकवाड,भाजपचे शहराध्यक्ष दत्ता काले,भाजपचे चेतन खुबाणी,भाजपचे माजी शहराध्यक्ष विनायक गायकवाड,माजी नगरसेवक संतोष चवंडके आदींच्या सह्या असून मोठ्या संख्यने कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close