जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
आंदोलन

‘त्या’नुकसान भरपाईसाठी कोपरगावात आंदोलन सुरु,शेतकऱ्यांचा मोठा सहभाग

न्यूजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

कोपरगाव तालुक्यात जून ते ऑगष्ट २०२२ दरम्यान मोठ्या प्रमाणावर पाऊस पडून त्यात शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते.तालुक्यातील पाच मंडलापैकी सुरेगाव आणि पोहेगाव या दोन मंडलातील शेतकऱ्यांना काही भरपाई मिळाली असून उर्वरित तीन मंडळातील शेतकऱ्यांना कृषी विभागाने अंगठा दाखविल्याने शेतकऱ्यांत मोठी नाराजी होती त्यातून कोपरगाव तहसील कार्यलयासमोर पूर्वलक्षी प्रभावाने मिळावी व भेदभाव करू नये यासाठी आज सकाळी ११ वाजता कोपरगाव तालुका शेतकरी समितीच्या वतीने,’आमरण उपोषण’ सुरु केले आहे.सदर आंदोलन संपूर्ण मागण्या पूर्ण होत नाही तो पर्यंत मागे घेणार नाही असे समितीच्या वतीने स्पष्ट केले आहे.

“पोहेगाव आणि सुरेगाव या दोन गटात अतिवृष्टी झाली असली तरी ती कोपरगाव,रवंदे,दहिगाव बोलका आदी अन्य तीन गटातही झालेली असून त्यासाठी त्यांनी ऑनलाईन पर्जन्यमान हा ७९.०१ मी.मी.निदर्शनास आणून दिले असून ती ‘अतिवृष्टी’असल्याचे सांगितले आहे.मात्र त्यावेळी असलेल्या महसुली अधिकाऱ्यांनी चुकीचे पंचनामे केल्यामुळे हा घोळ झाला आहे”-तुषार विध्वंस,कार्यकर्ते,कोपरगाव तालुका शेतकरी समिती.

अवकाळी पावसाने नुकसान झाल्याने राज्याचे कृषी मंत्री यांनी मदत देण्याची घोषणा केली होती.त्यात जिरायती शेती साठी १३ हजार ६०० रुपये हेक्टरी तर बागायतीसाठी २७ हजार रुपयांची तर बहुवार्षिक पिकासाठी ३६ हजार रुपये हेक्टरी मदत देण्याची घोषणा केली होती.त्यानुसार सरकारने दि.०८ सप्टेंबर २०२२ रोजी कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव आणि सुरेगाव या दोन मंडलातील शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात दि.३१ मार्च २०२३ रोजी नुकसान भरपाई वर्ग केली असली तरी अद्याप ६० टक्के शेतकरी बाकी असल्याचा आरोप आहे.तर उर्वरित कोपरगाव,रवंदे,दहिगाव बोलका आदी तीन मंडलातील २७ हजार शेतकरी मात्र मदतीपासून वंचित राहिले असून कृषी विभागाने त्याकडे कानाडोळा केला आहे त्यामुळे कोपरगाव तालुक्यात हा संताप व्यक्त होत आहे.

त्यावेळी राज्याचे महाआघाडीचे तत्कालीन कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी घोषणा करून जिरायती शेती साठी १३ हजार ६०० रुपये हेक्टरी तर बागायतीसाठी २७ हजार रुपयांची तर बहुवार्षिक पिकासाठी ३६ हजार रुपये हेक्टरी मदत देण्याची घोषणा केली होती.त्यानुसार सरकारने दि.०८ सप्टेंबर २०२२ रोजी घोषणा केली होती.त्या नुसार कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव आणि सुरेगाव या दोन मंडलातील शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात दि.३१ मार्च २०२३ रोजी नुकसान भरपाई वर्ग करण्यात आली होती त्यातील काही शेतकरी अद्याप बाकी आहे.तर उर्वरित कोपरगाव,रवंदे,दहिगाव बोलका आदी तीन मंडलातील २७ हजार शेतकरी मात्र मदतीपासून वंचित राहिले असून कृषी विभागाने त्या बाबतीत मौन पाळले असल्याचा आंदोलनकर्त्यांचा आरोप आहे.

दरम्यान या प्रश्नी आपण विधान सभेत हा प्रश्न लक्षवेधी पद्धतीने उपस्थित करून तो निकाली काढू असे आश्वासन आ.आशुतोष काळे यांनी दिले असल्याचे समजते तरी आंदोलनकर्ते आपल्या आंदोलनावर ठाम असल्याची माहिती हाती आली आहे.दरम्यान त्यात दोन गट निर्माण झाले असून सायंकाळी काय निर्णय घेणार याकडे तालुक्याच्या शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे.

दरम्यान सरकारने दि.२२ जून २०२३ रोजी दुसरा शासन आदेश (क्रं.सी.एल.एस.२०२३ प्र.क्रं.५२,म-३) अन्वये काढला असून त्यात नुकसान भरपाई साठी जास्तीत जास्त हेक्टरी १७ हजार रुपयांची रक्कम निश्चित केली आहे.त्यात फळबागा आणि ऊस क्षेत्र वगळले आहे.त्यामुळे सरकारची नियत उघड झाली असल्याचा आरोप आहे.त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई साठी अन्यायकारक रक्कम निश्चिती केली असल्याचा आंदोलनकर्त्यांनीं आरोप केला आहे.त्यांनी शासनाने सापत्नपणा न करता पहिल्या आदेशा प्रमाणेच नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली होती मात्र निवेदन देऊनही त्याकडे दुर्लक्ष केल्याने आज संतापून शेतकरी समीतीने आज आंदोलन सुरु केले आहे.व जो पर्यंत शासन शेतकऱ्यांना पूर्वाश्रमीची नुकसान भरपाई देण्याची घोषणा करणार नाही तो पर्यंत आपण आंदोलन मागे घेणार नाही असे जाहीर केले आहे.

“कोपरगाव तालुक्यात पहिल्या टप्प्यात पोहेगाव आणि सुरेगाव या दोन गटात ‘अतिवृष्टी’चा निकष लावला होता.व त्यासाठी केंद्राने राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधीतून विशेष आर्थिक तरतूद केली होती.व राज्य सरकारने त्यात भर घालून प्रति हेक्टरी जिरायती क्षेत्रास १३ हजार ६००,बागायती क्षेत्रास २७ हजार तर बहुवार्षिक पिकास ३६ हजार रुपयांची नुकसान भरपाई दिली होती.व अतिवृष्टीचे गांभीर्य पाहून त्यासाठी राज्य सरकारने आपल्या ‘राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून अतिरिक्त नुकसान भरपाई दिली होती त्यामुळे सदर रक्कम वाढली होती,मात्र नंतर झालेला पाऊस हा ‘सततधार’या व्याख्येत असल्याने तेवढी मदत मिळू शकली नाही,याबाबद आपण वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे मार्गदर्शन मागितले आहे”-संदीपकुमार भोसले,तहसीलदार कोपरगाव.

आज या आंदोलांत शेतकरी नेते पद्मकांत कुदळे,कार्यकर्ते तुषार विध्वंस,संतोष गंगवाल,प्रवीण शिंदे,नितीन शिंदे,विजय जाधव,सदाशिव रासकर,अनिल शेवते,श्री देवकर,सोपान देवकर,हरिभाऊ शिंदे,दिपक देवकर,शिवाजी शिंदे,अनिल चव्हाण,केशवराव सपकाळ,बाबासाहेब रासकर,आबासाहेब गिरमे,अँड योगेश खालकर,नंदकुमार बोरावके,संदीप देवकर,सुनील देवकर,अनिल गायकवाड,छबुराव शिंगाडे आदी कार्यकर्ते शेतकरी उपस्थित होते.

दरम्यान या आंदोलनामुळे तालुका प्रशासन गडबडले असून त्यांनी आज प्रशिक्षणार्थी नायब तहसीलदार अंकुश खोमणे यांना आंदोलनकर्त्यांना भेटण्यास पाठवले होते.त्यात आंदोलनकर्त्यांनी वरील मागण्या केल्या आहेत मात्र त्यासाठी ते असमर्थ ठरले असल्याचे दिसून आले आहे.व त्यासाठी त्यांनी तहसीलदार संदीपकुमार भोसले यांना भेटून वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली आहे.उशिराने तहसीलदार भोसले यांनीही आंदोलन स्थळी भेटून त्यांना वस्तुस्थिती स्पष्ट केली आहे.मात्र आंदोलनकर्ते आपल्या अटीवर ठाम असल्याचे दिसून आले आहे.

दरम्यान या बाबत आमचे प्रतिनिधी संदीपकुमार भोसले याना भेटले असता त्यांनी याबाबत शासन निर्णय लक्षात आणून देताना,”कोपरगाव तालुक्यात पहिल्या टप्प्यात पोहेगाव आणि सुरेगाव या दोन गटात ‘अतिवृष्टी’चा निकष लावला होता.व त्यासाठी केंद्राने राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधीतून विशेष आर्थिक तरतूद केली होती.व राज्य सरकारने त्यात भर घालून प्रति हेक्टरी जिरायती क्षेत्रास १३ हजार ६००,बागायती क्षेत्रास २७ हजार तर बहुवार्षिक पिकास ३६ हजार रुपयांची नुकसान भरपाई दिली होती.व अतिवृष्टीचे गांभीर्य पाहून त्यासाठी राज्य सरकारने आपल्या ‘राज्य आपत्ती प्रतिसाद निधी’तून अतिरिक्त नुकसान भरपाई दिली होती त्यामुळे सदर रक्कम वाढली होती असे स्पष्टीकरण दिले आहे.

दरम्यान वरील दोन गट वगळता कोपरगाव,रवंदे,दहिगाव बोलका या तीन गटांना मात्र नंतर झालेल्या पावसाचे वर्गीकरण हे ‘सततधार’असे झाले आहे.व त्यासाठी चोवीस तासात ६२ मी.मी.पाऊस आवश्यक असल्याचे मानले आहे.व त्यासाठी केवळ राज्य सरकार आपल्या राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून मदत करत असते.व त्याचे निकष अर्थातच कमी असून ते प्रति हेक्टरी जिरायती क्षेत्रास हेक्टरी ८ हजार ५०० तर बागायती क्षेत्रास १७ हजार तर बहुवार्षिक पिकास २२ हजार ५०० असे दिले आहे.यात अर्थातच केंद्राने निधी दिला नाही त्यामुळे हा फरक झाला असल्याची माहिती शेवटी तहसीलदार भोसले यांनी दिली आहे.

दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार तुषार विध्वंस यांनी सांगितले की,”पोहेगाव आणि सुरेगाव या दोन गटात अतिवृष्टी झाली असली तरी ती अन्य तीन गटातही झालेली असून त्यासाठी त्यांनी ऑनलाईन पर्जन्यमानाचा रास्त दाखला दिला आहे.त्यात पाऊस हा ७९.०१ मी.मी.दाखवला असल्याचे निदर्शनास आणून दिला असून तो ‘अतिवृष्टी’ लायक असल्याचे निदर्शनास आणून दिले आहे.मात्र त्यावेळी असलेले महसुली अधिकारी यांनी चुकीचे पंचनामे केले असल्यामुळे हा घोळ झाला असल्याचे विश्वसनिय माहिती हाती आली आहे.मात्र यावेळी राजकीय अनास्था झाल्याने हा पेच निर्माण झाला असल्याचे मानले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close